' ‘लो वोह आ गया’ अरे कौन आ गया? अरे मार्केट मैं नया भगवान आ गया – InMarathi

‘लो वोह आ गया’ अरे कौन आ गया? अरे मार्केट मैं नया भगवान आ गया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘आज कल मार्केट मैं कोई नाय भगवान नही आया’ हा ‘ओह माय गॉड’ चित्रपटातील संवाद तुम्हाला आठवतच असेल. हे वाक्य आजच्या काळातल्या परिस्थितीशी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. रोज सकाळी उठल्यावर टीव्ही, वर्तमानपत्रे इथे आपल्याला एका तरी बुवा, बाबा, साधूची बातमी वाचायला, ऐकायला मिळते.

सोशल मीडियावर तर असे अगणित सो कोल्ड स्वतःला देव म्हणवणारे आपल्याला सापडतील. सत्य साई बाबांपासून, आसाराम बापू, राधे माँ, राम रहीम सिंग, निर्मल बाबा अशा अनेक खोट्या माफ करा स्वतःच स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या या बाबांमध्ये आता अजून एक नवीन नाव जोडले गेले आहे.

 

ramesh fefar 5

 

==

हे ही वाचा : या “साधू” महाराज ने पडद्यामागून भारतीय राजकारणात खूप मोठ्या उलथापालथ घडवून आणल्या आहेत…

==

रमेश फेफार या गुजरातमधील एका सरकारी अधिकाऱ्याने तो स्वतः विष्णूचा १० अवतार असल्याचा अजब गजब दावा केला आहे. गुजरातमधील सरदार सरोवर पुनर्वसन एजन्सी मध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या रमेश यांना ते विष्णूचा १० ‘कल्की’ अवतार असल्याचा जावईशोध लागला आहे.

रमेश मागील अनेक दिवसांपासून कामावर जात नसल्याने त्यांना ऑफिसने कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसला उत्तर देतांना रमेश यांनी हा खुलासा केला आहे, सोबतच त्यांनी सांगितले की, ” मी विष्णूचा १० वा अवतार असल्याने मी तपश्चर्या करण्यात व्यस्त आहे, म्हणूनच मी ऑफिसला येऊ शकत नाही.”

 

ramesh fefar 4

 

पुढे ते म्हणाले, “मी केलेल्या तपस्येमुळेच देशात चांगला पाऊस होत आहे. सोबतच या जगात खरे संत आणि महंत खूप कमी आई, त्यातलेच म्हणजे बाबा रामदेव. महाभारतात कौरवांच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी कृष्णाला ओळखण्यात जशी चूक केली तशीच चूक आज सर्व लोकं मला ओळखण्यात करत आहेत.”

या इसमाने इथेच न थांबता घरात बसल्या बसल्या सत्ययुगाची सुरुवात देखील करून टाकली आहे. याविषयी तो म्हणाला, “माझी एकच अतूट इच्छा आहे की आपल्या देशाला समजले पाहिजे की, सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. १६ सप्टेंबर २०१२ सकाळी साडेसात वाजता सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. हेच लोकांना समजावे ही माझी कळकळ आहे.”

 

puran inmarathi

 

 

==

हे ही वाचा : ८३ वर्षाच्या साधुने राम मंदिर निर्माणासाठी केलेली ही मदत थक्क करणारी आहे!

==

हिंदू मान्यतेनुसार आणि पुराणानुसार चार युग आते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर आणि श्रीकृष्णांच्या निधनानंतर कलियुगाची सुरुवात झाली. आणि कलियुगचे आयुष्य हे ४ लाख ३२ हजार वर्ष इतके आहे.

आता खरंच कलियुग सुरु होऊन ४ लाख वर्ष संपली का पुन्हा सत्ययुग सुरु होण्यासाठी? आणि मुख्य म्हणजे कलियुग संपून पुन्हा सत्ययुगच सुरु होणार का? रमेश यांचे वय ५० वर्ष आहे इतके वर्ष त्यांना ते ‘कल्की’ अवतार असल्याची जाणीव झाली नाही का? की ते बाजारातले बुवा, बाबा कमी होण्याची वाट बघत होते.

आता अचानक त्यांना जाणवले असेल की नवीन कोणीच बाबा नाहीये. लोकं कोरोनामुळे त्रस्त आहे. हीच योय वेळ आहे लोकांना गंडवण्याची. म्हणूनच त्यांनी ते विष्णूचा अवतार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली असावी.

 

ramesh fefar 2

 

रमेश यांनी त्यांच्या ऑफिसला दिलेले हे उत्तर आणि त्यात केलेले चित्रविचित्र दवे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

===

हे ही वाचा :  सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक ही रंजक बाब तुम्हाला नक्कीच ठाऊन नसेल

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?