' उदास वाटतंय? या ९ टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्याही नकळत ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतील…! – InMarathi

उदास वाटतंय? या ९ टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्याही नकळत ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतील…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादा दिवस असतो जेव्हा आपल्याला उगाच आनंदी, उत्साही आणि प्रफुल्लित वाटत असतं. आपण प्रसन्न असतो म्हणून सगळी कामं सुरळीत होत असतात. तर एखादा दिवस असा असतो जेव्हा उठल्यापासूनच आपली चिडचिड होत असते, राग येत असतो, निरुत्साही आणि मरगळल्यासारखं वाटत असतं. उठल्यापासून एकही काम नीट होत नाही. असं का होतं याचा आपण कधी विचार केलाय का?

आपल्या शरीरात हार्मोन्स असतात. मनात दुःख, आनंद, उत्साह, स्फूर्ती, भाऊकता अशा सगळ्या भावना निर्माण करणं आणि वेदनांची जाणीव करून देणं, हे या हॉर्मोन्सचं काम असतं.

प्रत्येक हार्मोनची आपल्या शरीरात एक पातळी असते. हॉर्मोन्सची पातळी वाढली किंवा घटली, की आपल्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बदल घडू लागतात.

असेच आपल्या शरीरात आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी काही हार्मोन्स महत्वाची भूमिका बजावतात.

डोपमीन, ऑक्सिटोसिन, सीरोटोनिन, एन्डोर्फिन हे हार्मोन्स त्यापैकी मुख्य हार्मोन्स आहेत. या हार्मोन्सचं शरीरात योग्य संतुलन राखण्यासाठी आपण खालील दिलेले हे उपाय करू शकतो.

 

happy hormones inmarathi

 

१. व्यायाम करणे

दररोज २५ ते ३० मिनिटे व्यायाम केल्याने आपल्या शरीरात सीरोटोनिन आणि एन्डोर्फिन हार्मोन्स निर्माण होतात. ज्यामुळे आपला मुड छान राहतो आणि आपल्याला सतत आनंदी व उत्साही वाटतं, शरीरात ऊर्जा निर्माण होते.

 

stretching exercise inmarathi

 

याशिवाय व्यायाम केल्याने रात्री नीट झोपही येते, ज्याने वजन नियंत्रणात राहतं, चेहऱ्यावर तेज येतं आणि मन शांत राहतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्हाला उदास वाटेल २० मिनिटे व्यायाम नक्की करून पाहा.

२. कोवळ्या उन्हाचा आनंद घ्या

सकाळच्या कोवळ्या उन्हात वेळ घालवल्याने आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची निर्मिती होते. याच ‘व्हिटॅमिन डी’चा उपयोग आपलं शरीर डोपमीन निर्मितीसाठी करतं.

व्हिटॅमिन डी युक्त अन्न ग्रहण करून सुद्धा तुम्ही हा साठा पूर्ण करू शकता, सूर्याचे कोवळे किरण, पक्षांचा चिवचिवाट, गार वातावरण यातून मिळणाऱ्या आनंदाचा साठा पूर्ण कसा कराल? त्यामुळे दररोज किमान १० मिनिटे तरी कोवळ्या उन्हात बसून निसर्गाचा आनंद घ्या.

 

sun-bath-featured-inmarathi

===

हे ही वाचा – अनेक गंभीर आजारांवरील एकच रामबाण, पण दुर्लक्षित उपाय!

===

३. चॉकोलेटची जादू

तुम्हाला ठाऊक आहे का, डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपल्या शरीरात एन्डोर्फिन हार्मोनची निर्मिती होते? होय, डार्क चॉकलेटने हॅपिनेस हार्मोन्सची पातळी वाढते आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागतं.

याशिवाय चॉकलेट ब्लडप्रेशर कमी करण्यात मदत करून, चॉकलेट खाण्याचे इतरही बरेच फायदे आहेत. मग रोज एक छोटं डार्क चॉकलेट खाणार ना?

 

girl eating dark chocolate

 

४. आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले कार्ब्स सुद्धा आपल्या शरीरातील सिरोटोनिनची पातळी वाढवून संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कारबिहायड्रेट्स ना टाळू नका. त्यांचा आहारात समावेश करून घ्या.

एखादं मफिन, केळी, ब्राउन राईस, ओट्स यांचं सेवन करून तुम्ही गुड कार्बोहायड्रेट्सची पातळी वाढवू शकता.

 

banana featured inmarathi

 

५. प्राण्यांशी किंवा लहान मुलांशी खेळा

एका संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे, की लहान मुलांशी किंवा पाळीव प्राण्यांशी जसे कुत्रा, मांजर, ससा, पक्षी यांच्याशी खेळाल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन आणि सिरोटोनिनची निर्मिती होते. ज्यामुळे आपण आपण आपल्या वेदना आणि दुःख विसरून आनंदी होतो.  दिवसातील १०-१५ मिनिटं जरी हे केलं तरी आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.

 

sunny leone with pets inmarathi

 

६. व्हिटॅमिन बी

शरीरात ‘व्हिटॅमिन बी’च्या कमतरतेमुळे ताण, मेमरी लॉस, हातापायात गोळे येणे हे त्रास उद्भवतात. त्याची पातळी व्यवस्थित असली की ते शरीरात हॅपिनेस हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते. म्हणून ‘व्हिटॅमिन बी’ची आपल्या शरीरात कधीच कमतरता होता कामा नये.

 

vitamin b inmarathi

 

व्हिटॅमिन बी आपल्याला हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथी, होल ग्रेन, कंदमुळं, डाळी यातून प्राप्त होतं.

===

हे ही वाचा – आहारात हे सोपे बदल करा आणि मिळवा तल्लख, तरतरीत बुद्धीमत्ता, वाचा!

===

७. गाणी ऐका

गाणी ऐकल्याने किंवा एखाद्या वाद्यावरील धून ऐकल्याने आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्सचा संचार होतो. जी गाणी ऐकून तुम्हाला शहारा येतो त्या गाण्यांमुळे डोपमीन निर्माण होते.

संशोधनानुसार जे संगीतकार गाणी, चाली बनवतात त्यांचा मूड चांगला असतो कारण शरीरात सिरोटोनिनची निर्मिती होत असते. त्यामुळे आता जेव्हा उदास वाटेल आपलं आवडत गाणं लावून एका, त्यांच्या सोबत गायलात तर आणखी उत्तम.

 

music-stress-reliever-inmarathi

 

८. रोमँटिक डेटवर जाऊन या

संशोधनानुसार आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालावताना आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि सिरोटोनिनची निर्मिती होत असते. ऑक्सिटोसिन हे उत्तेजक तर सिरोटोनिन हे प्लेजर हार्मोन म्हणून ओळखले जातात.

आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवल्याने आपल्या शरीरात हे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात सिक्रीट होतात. त्यामुळे जेव्हा केव्हा उदास, एकटं वाटत असेल तर एक रोमँटिक डेट नक्की होऊन जाऊ द्या.

 

amir khan and priety zinta inmarathi

 

९. हे पर्याय सुद्धा फायदेशीर

हे आनंदी राहण्याचे आणि हॅपी हार्मोन्सची पातळी वाढवण्याचे काही मोजके प्रकार झाले. याव्यतिरिक्त तुम्ही डान्स करू शकता, चित्रकला, छंद जोपासणं, पोहणं, चमचमीत पण हेल्दी खाणं, मेडिटेशन, आवडता सिनेमा पाहणं, कॉमेडी सिरीज पाहणं, बाहेर चालायला जाणं, सायकलिंग करणं, बागकाम, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं, एखादं वाद्य शिकणं, रात्री पुरेशी झोप घेणं, आपली व्यवस्थित दिनचर्या आखणं, आपल्या जोडीदाराबरोबर कुकिंग अशी आनंद देणारी कामं करू शकता.

 

dear zindagi alia shahrukh inmarathi

 

ज्यातून आपल्याला आनंद मिळतो असं वाटतं ते काम करा, पण आपल्या शरीरातील हार्मोनल पातळी उत्तम ठेवा. जर इतकं सगळं करून सुद्धा फरक पडत नसेल, तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, थेरपी आणि औषधं घ्या.

आपण आपल्या आनंदाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला प्राधान्य द्या.

===

हे ही वाचा – आळस देताना येणारी जांभई सुद्धा असते आरोग्यदायी…!! हे रहस्य माहित आहे का!?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?