' मोबाईलचं कव्हर पिवळं का पडतं? वाचा त्यामागची कारणं आणि त्यावरचे सोप्पे उपाय! – InMarathi

मोबाईलचं कव्हर पिवळं का पडतं? वाचा त्यामागची कारणं आणि त्यावरचे सोप्पे उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकालच्या आधुनिक जगात आपल्या सर्वांना नेहमी आवश्यक वाटणारे उपकरण म्हणजे मोबाईल… मंडळी आजकाल तर महागडे आणि ब्रँडेड मोबाईल घ्यायची फॅशनच आहे. एखादा मोबाईल खरेदी केला, तर अगदी पुढच्या महिनाभरात देखील तो आऊटडेटेड होऊ शकतो.

आपण फक्त मोबाईल घेऊनच थांबत नाही, तर नकळतपणे मोबाईलला नुकसान होऊ नये म्हणून आपण त्यासाठी कव्हर देखील वापरतो.

नवं असताना आकर्षक आणि स्वच्छ वाटणारं हे कव्हर काही दिवसांच्या वापरानंतर मात्र रंग बदलतं. त्याचा रंग पिवळा होऊ लागतो. अशी कुठली प्रक्रिया घडते ज्यामुळे मोबाईल कव्हरचा रंग पिवळा होतो आणि त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 

mobile cover color change inmarathi

 

सध्या अनेक मंडळी पारदर्शक कव्हर वापरतात अनेक मोबाइल कंपन्या नवीन मोबाईलसोबत देखील हे कव्हर ग्राहकांना मोफत देतात. हे मोबाईल कव्हर जेव्हा नवीन असतं, त्यावेळी अत्यंत आकर्षक वाटतं परंतु कालांतराने वापर झाल्यानंतर याचा रंग हळूहळू पिवळा होत जातो.

या मोबाईल कव्हरचा रंग पिवळा होण्या मागील कारण म्हणजे, हे मोबाईल कव्हर सिलिकॉनपासून तयार केलेलं असतं. मोबाईल कव्हर सिलिकॉन पासून तयार करतात कारण ते लवचिक असणं आवश्यक असतं. त्यासोबतच सिलिकॉन अगदी स्वस्त आहे आणि सिलिकॉनपासून तयार केलेलं हे मोबाईल कव्हर अनेक वर्षं टिकू शकतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

===

सिलिकॉनपासून तयार केलेलं हे मोबाईल कव्हर अधिक उपयुक्त जरी असलं, तरीही आपण वापरत असताना त्याची विविध प्रकारे हाताळणी होत असते.

कधी तुमच्याकडून नकळत काही द्रव पदार्थ या मोबाईल कव्हरवर पडतो, त्यावेळी तुम्हाला वाटतं की तुम्ही लगेच पुसून घेतला आहे त्यामुळे काही होणार नाही. परंतु त्या द्रव पदार्थामुळे अगदी कमी कालावधीत देखील मोबाईल कव्हरचं नुकसान होतं.

जास्त तापमानाच्या संपर्कात आल्यानंतर देखील याचा रंग हळूहळू बदलत जातो. थोडक्यात मंडळी हे लक्षात घ्या, की या मोबाईल कव्हरचा रंग बदलतो याचा अर्थ सिलिकॉन हळूहळू खराब होत आहे.

सिलिकॉनचं झालेलं हे नुकसान तुम्ही काही टिप्स वापरून कमी करू शकता. त्यामुळे मोबाईल कव्हर खराब झाले म्हणून फेकून द्यायच्या आधी आम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून पहा तुमच्या मोबाईल कव्हरचा पिवळा नाहीसा होण्यास मदत होईल.

 

clean mobile cover inmarathi

 

मोबाईल कव्हर स्वच्छ करण्याचे उपाय

१. भांडी घासण्याचा साबण

मोबाईलचे कव्हर साफ करण्यासाठी आणि त्याचा पिवळा रंग घालवण्यासाठी सर्वात उपयोगी उपाय म्हणजे ते कव्हर भांडी घासायच्या सोल्युशन आणि गरम पाणी यांच्या सहाय्याने साफ करणे.

सुरुवातीला तुम्ही भांडी घासायचं थोडसं सोलुशन वाटीभर गरम पाण्यात टाका, ते सोल्युशन कुठल्याही ब्रशच्या सहाय्याने एकत्र करा यासाठी तुम्ही तुमचा जुना टूथब्रश वापरलात तरी चालेल.

 

cleaning a mobile cover inmarathi

 

तयार झालेलं मिश्रण याच ब्रशच्या सहाय्याने मोबाईल कव्हरवर पसरवा आणि त्याला साफ करा. जो भाग जास्त प्रमाणात पिवळा दिसेल तो साफ करत असताना जास्त सोल्युशन वापरा जेणेकरून तो भाग योग्य पद्धतीने साफ होईल.

अशा पद्धतीने कव्हर साफ केल्यानंतर ते कव्हर परत मोबाईलला लावायच्या एखाद्या कपड्याच्या साहाय्याने पूर्णपणे कोरडे करून घ्या. महिन्याला किंवा आठवड्याला अशा पद्धतीने कव्हर साफ केल्यामुळे मोबाईल कव्हर पिवळ पडण्याचं प्रमाण कमी होईल.

===

हे ही वाचा – मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

===

२. बेकिंग सोडा वापरणे

मोबाईल कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता.

यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचं मोबाईल कव्हर स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि जिथे पिवळे डाग वाटत असतील त्या भागावर ती बेकिंग सोडा टाका.

 

baking soda inmarathi

 

आवश्यकता वाटल्यास गरजेनुसार कमी अधिक प्रमाणात बेकिंग सोड्याचा वापर करा. त्यानंतर एखादा जुना टूथ ब्रश घ्या, तो थंड पाण्यामध्ये बुडवा आणि टूथब्रशच्या मदतीने मोबाईल कव्हर बेकिंग सोड्यासहित स्वच्छ करा.

टूथब्रशच्या सहाय्याने कव्हर साफ केल्यानंतर ते कव्हर पाण्याने धुवून घेऊन या कपड्याच्या साहाय्याने ते कव्हर पूर्णपणे साफ करा. आता बघा त्या कव्हरवरील पिवळा रंग तुम्हाला नाहीसा झालेला दिसेल.

३. रबिंग अल्कोहोलचा वापर करा

मोबाईल कव्हर साफ करण्यासाठी तुम्ही रबिंग अल्कोहोलचा देखील वापर करू शकता. यासाठी मात्र तुम्हाला कुठलाही टूथब्रश वापरायची आवश्यकता नाही.

 

rubbing alchohol inmarathi

 

मायक्रो फायबर कॉटनपासून तयार झालेला कपडा अगदी थोड्याशा रबिंग अल्कोहोलमध्ये बुडवा. ज्या ठिकाणी पिवळा रंग गडद दिसत असेल त्या ठिकाणी या कपड्याच्या साहाय्याने स्वच्छ करा आणि कव्हर पूर्णपणे वाळवून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – सावधान! मोबाईल सॅनिटायझरने स्वच्छ करताय? थांबा; आधी हे वाचा, नाहीतर….

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?