' स्वतः एक उद्योजक असूनही दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचे चरणस्पर्श करणारी आदर्श ‘मूर्ती’ – InMarathi

स्वतः एक उद्योजक असूनही दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचे चरणस्पर्श करणारी आदर्श ‘मूर्ती’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हा देश काही हातावर मोजता येण्याइतके बिजनेसमन चालवतात असा आपला बऱ्याच लोकांचा समज आहे. अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा अशा काही मातब्बर लोकांची नावं यात प्रामुख्याने येतात. आणि या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त मान सन्मान मिळतो तो टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना!

टाटा आणि देशभक्ती हे समीकरण आपल्याला नवीन नाही. स्वतःचा आणि  कंपनीचा नफा बघताना त्यांनी कधीच आपल्या देशाला तोट्यात टाकले नाही.

 

ratan tata inmarathi

 

पाकिस्तानची गाड्यांची ऑर्डर रिजेक्ट करणे असो किंवा सत्तेत असलेल्या पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहून बाजू मांडणे असो, टाटांनी प्रत्येकवेळेस बिझनेसच्या आधी देशहित असाच विचार केला.

हे ही वाचा कोरोना संकटात “टाटा”कडून जे घडलं ते दाखवून देतं, की ते सर्वोत्तम उद्योजक आहेत!

म्हणूनच आज टाटा इंडस्ट्रीज हे भारतातच नव्हे तर जगभरात अभिमानाने घेतलं जाणारं सर्वात मोठं नाव आहे.

रतन टाटांचे आणि जमशेदजी टाटा यांचे कित्येक किस्से आपण ऐकले असतील. पण आज आपण भारतातल्या २ सर्वात मोठ्या आणि तितक्याच साध्या बिझनेसमनमधल्या एका रंजक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत.

टाटा आणि मूर्ती यांचे लागेबांधे :

काही काळापूर्वी भारतातल्या आयटी क्षेत्रातल्या अग्रेसर इन्फोसिस या कंपनीचे कर्ताधर्ता नारायण मूर्ती यांच्या हस्ते मुंबईतल्या एका मोठ्या समारंभात रतन टाटा यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेलं होतं!

हा सन्मान रतन टाटा यांना दिल्यानंतर नारायण मूर्ती यांनी वाकून रतन टाटा यांचा चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचा व्हीडियो बराच व्हायरल झाला होता. खुद्द टाटांनीसुद्धा याबाबतीत सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

 

tata murthy inmarathi

 

हा व्हिडिओ बघून हे दोन्ही उद्योजक किती साधे आहेत याची प्रचिती आली आणि सोशल मीडियावर याबाबत चर्चा होऊ लागली. पण फक्त ७ वर्षाहून मोठ्या असलेल्या रतन टाटा यांचे आशिर्वाद घ्यावेत असे मूर्तींना का वाटले असावे?

आज नारायण मूर्तीसुद्धा टाटांइतकेच प्रतिष्ठित उद्योजक आहेत तरी त्यांनी स्वपणा बाजूला ठेवून टाटांचे चरणस्पर्श का केले? ते आपण जाणून घेऊया!

रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे लागेबंधू हे आजचे नाहीत, तर टाटा इंडस्ट्रीचे चेअरमन जे.आर.डी टाटा होते तेव्हापासून यांचे सौख्य. त्या काळात मूर्ती यांच्या इन्फोसिसची स्थापनासुद्धा झालेली नव्हती.

 

murthy and tata inmarathi

 

त्या वेळेस नारायण मूर्ती यांची पत्नी आणि त्यांच्या उद्योगात त्यांना साथ देणारी त्यांची सहचारिणी सुधा मूर्ती यांनी पहिली नोकरी ही टाटा मोटर्समध्येच केली होती! टाटा मोटर्समधली पहिली महिला इंजिनीअर अशी त्यांची ओळख बनण्यामागे एक खास किस्सा आहे, तो आपण जाणून घेऊ.

जमशेदजी टाटा यांना एक पत्र लिहून सुधा मूर्तींना मिळाली होती नोकरी :

त्या काळात मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं, आणि त्यातूनही इंजीनीयरिंग हे क्षेत्र फक्त मुलांचंच आहे असा एक समज रूढ होता. या अशा परिस्थितित ६०० विद्यार्थ्यांमध्ये इंजीनीयरिंग पूर्ण करणारी पहिली पहिली महिला ठरल्या सुधा मूर्ती.

हे ही वाचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलणारी सुधा मूर्ती ह्यांची ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत!

त्यावेळेस टाटा मोटर्समध्ये एंजिनियर या पदासाठी भरती होत असे. पण महिला असल्यामुळे सुधा मूर्ती यांची या पदासाठी निवड नाही झाली.

त्यानंतर सुधा मूर्ती यांनी जे.आर.डी टाटा यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली. मग टाटा मधून सुद्धा मूर्ती यांना कॉल आला आणि एका खास इंटेरव्ह्यूनंतर टाटा मोटर्सच्या त्या पदावर पहिली महिला इंजिनियरची नियुक्ती करण्यात आली.

 

sudha murthy inmarathi

 

नारायण मूर्ती यांनी बरंच अपयश पचवल्यावर आपल्या पत्नीकडून १०००० रुपये घेऊन ६ जणांसोबत १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली.

इन्फोसिसच्या स्थापनेनंतर ३ वर्ष उलटली तेव्हा सुधा मूर्ती यांनी टाटा मोटर्समधली नोकरी सोडून आपल्या पतीसोबत इन्फोसिसला मोठं करायचा निर्णय घेतला. तेव्हा जे.आर.डी टाटा यांनी मनात कोणतीही अढी न ठेवता सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांना शुभेच्छा दिल्या.

 

Infosys-employees-to-get-50-million-shares-as-performance-incentives Inmarathi

 

यावरून आपल्याला अंदाज येईल की उद्योजक होण्याआधी एक चांगला माणूस बनणं फार गरजेचं आहे.

टाटा काय किंवा मूर्ती काय या दोन्ही परिवाराने कधीच आपला अहंकार मध्ये आणला नाही, आणि म्हणूनच जेव्हा मूर्ती टाटा यांचा चरणस्पर्श करतात तेव्हा आपल्याला जाणीव होते की भारताचं औद्योगिक भविष्य योग्य हातात आहे!

===

हे ही वाचा कम्युनिस्टांच्या विरोधात बोलले म्हणून नारायण मूर्तींना तुरुंगात टाकण्यात आलं होतं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?