' नवं नाव, नवं रूप – पबजीचे “नवे नियम”…! पण एक वेगळाच धोका शक्य….!! – InMarathi

नवं नाव, नवं रूप – पबजीचे “नवे नियम”…! पण एक वेगळाच धोका शक्य….!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पबजी – नाव ओळखीचे आहे ना? अर्थात… लहान मुलांनाही तुफान वेड लावलेला पबजी हा गेम सर्वाना आठवत असेलच. या मोबाइल गेमने लहान मुलांना आणि अवघ्या तरुणाईला अगदी आहारी नेले होते.

नंतर मात्र परिस्थिती बदलली. मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात भारताने चीनच्या ११८ अॅपवर बंदी आणली होती त्यात पबजीचा देखील समावेश होता.

 

PUBG 9 inmarathi

 

त्यावेळी हिरमुसलेल्या पबजीच्या फॅन्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पबजी गेम पुन्हा येतोय, हे तर आपल्याला ठाऊकच आहे.

‘Battlegrounds Mobile India’ या नावाने हा गेम भारतात परतत आहे. पबजी मोबाइल इंडियाने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून यासंदर्भातला एक टिझर पोस्ट केला होता.

PUBG Mobile ची मूळ कंपनी असलेल्या दक्षिण कोरियन Krafton कंपनीने भारतात Battle Royale Game लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र तारीख तशी अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अनेकांनी हा गेम गुगलवर सर्च करायला सुरुवात केली.

हा गेम गुगलवर शोधताना थोडं सावध राहायला हवं…!! कारण Battlegrounds Mobile India नावाने गेम APK च्या काही खोट्या लिंक तुम्हाला सापडतील. या लिंक तुमच्यासाठी आणि तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात.

==

हे ही वाचा : तुम्ही मोबाईलवर फुकट गेम्स खेळता आणि त्यांना तिकडं अब्जावधी रुपये मिळतात.

==

PUBG danger inmarathi

 

हा गेम परत येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर, काही लोकांनी अनेक खोट्या लिंक्स तयार करून इंटरनेटवर टाकल्या आहेत. जेव्हा तुम्ही Battlegrounds Mobile India नावाने सर्च करता तेव्हा तुम्हाला असंख्य लिंक्स सापडतील ज्या तुम्हाला हा गेम डाउनलोड करून देण्याचा विश्वास देतील. पण त्यातल्या अनेक लिंक्स खोट्याच आहेत.

अजूनपर्यंत तरी Krafton कंपनीने या गेमच्या कोणत्याही APK फाईलची अधिकृत घोषणा केली नाहीये.

या गेमसाठीचं रजिस्ट्रेशन सुरु झालेलं असलं, तरीही हा गेम कुठल्याही रूपात खेळण्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे हा गेम लवकर खेळायला मिळेल असा विचार करून अजिबातच फसू नका.

हे स्पष्ट आहे, की इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या लिंक्स खोट्या आहेत. अशा लिंक्स डाउनलोड करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या फोनसाठी घातक ठरू शकते. कारण कळत-नकळतपणे आपण या गेमला दिलेल्या परमिशनमुळे तुमचा डेटा त्यांना सहज मिळू शकतो.

या गेमचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन च करायचं आहे. Battlegrounds Mobile India या नावाशी मिळते जुळते अनेक पर्याय तुम्हाला तिथे उपलब्ध होतील.

अशा वेळी तुम्ही Battlegrounds Mobile India सोबत KRAFTON, Inc लिहिलेला पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला प्री रजिस्ट्रेशन निवडावे लागेल. प्री रजिस्ट्रेशन हे फक्त भारतीयांसाठीच असणार आहे.

 

PUBG 6 inmarathi

 

KRAFTON कंपनीच्या यावेळेची सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे, ती म्हणजे अॅप वापरणाऱ्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे. हा संपूर्ण डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी KRAFTON ने इतर कंपन्यांची मदत घेतली आहे.

Battlegrounds Mobile India या गेमच्या खेळाडूंचा संपूर्ण डेटा हा भारतीय डेटा सेंटरवर भारत सरकारच्या सर्व नियम आणि शर्तींनुसार स्टोअर होणार आहे.

या गेमचे प्री रजिस्ट्रेशन १८ मेपासून चालू झाले आहे. सध्या हे रजिस्ट्रेशन फक्त अँड्रॉइड युझर्ससाठीच चालू झाले असून, लवकरच आयफोनसाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे.

यावेळी या गेमसाठी नियम खूप कडक केले आहेत. शिवाय नियमांमध्ये अनेक मोठे आणि महत्वाचे बदल करण्यात आले आहे. याचं कारण म्हणजे, या गेमवर बंदी येण्यामागे, चीनचा या गेममध्ये असणारा सहभाग हा एकच मुद्दा नव्हता.

लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, गेम खेळताना लाखो रुपये उधळून त्यांनी केलेलं पालकांचं नुकसान या गोष्टींचा सुद्धा ही बंदी घालण्याआधी विचार करण्यात आला होता.

==

हे ही वाचा : ड्रीम ११ – फॅन्टसी गेमिंग… वाचा एका यशस्वी स्टार्टअपची घोडदौड!

==

PUBG 5 inmarathi

 

१८ वर्षांखालील मुलांसाठी नियम अधिक कडक असणार आहेत. रजिस्ट्रेशन करताना १८ वर्षांखालील मुलांच्या पालकांचा मोबाइल नंबर देखील द्यावा लागणार आहे.

शिवाय दिवसभरात हा गेम तीन तासच खेळता येणार आहे. याशिवाय या अॅपवरून प्रति दिवस रुपये ७००० पर्यंतच इन अॅप खरेदी करता येणार आहे.

 

PUBG 4 inmarathi

 

या नवीन गेममधे कमीतकमी हिंसा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही समोरच्याला हिट केल्यानंतर येणारे रक्त हे लाल ऐवजी हिरव्या रंगाच्या इफेक्टमध्ये दिसणार आहे.

हा गेम १८ वर्षांखालील मुलांनी खेळण्याच्या वेळेबाबतीत पालकदेखील कंट्रोल ठेऊ शकतील अशा सोयी देखील करण्यात आल्या आहेत, असं म्हटलं जात आहे.

कंपनीतर्फे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरमध्ये PUBG Mobile चा लोकप्रिय नकाशा SANHOK दिसत आहे. हा गेम १० जून २०२१ ला प्रदर्शित करण्यात येईल असे सांगितले जात आहे.

 

PUBG inmarathi

 

==

हे ही वाचा : आपल्या सगळ्यांचं बालपण मजेशीर करणा-या “मारियो” गेमची जन्मकथाही तितकीच रंजक आहे

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?