' हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले... पण त्यातली गाणी मात्र आजही तुमच्या ओठांवर असतील...

हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले… पण त्यातली गाणी मात्र आजही तुमच्या ओठांवर असतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

९० च्या दशकात सर्वोत्तम दहा गाण्यांचा ‘टॉप टेन’हा शो टीव्ही, रेडिओवर खूप लोकप्रिय झाला होता. मनोरंजनाची मोजकी साधनं असलेल्या त्या काळात लोक प्रत्येक आठवड्यातील गाण्यांच्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवून असायचे.

चित्रहार, छायागीतसारखे हिंदी गाण्यांचे कार्यक्रम तेव्हा पूर्ण कुटुंब एकत्र बसून बघायचे. चांगल्या गाण्याचे गायक, संगीतकार, सिनेमा हे सगळं तेव्हा चाहत्यांना तोंडपाठ असायचं.

९० च्या दशकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात लोकांनी चांगल्या गाण्यांना नेहमीच भरभरून दाद दिली. कित्येक गाणी तर अशी आहेत, की सिनेमे बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांपेक्षा अधिक तग सुद्धा धरू शकले नाहीत. पण, त्या सिनेमातील गाणी आज ३० वर्षांनंतर सुद्धा लोकांच्या प्ले लिस्टमध्ये आहेत.

सिनेमा सुपर फ्लॉप पण गाणी सुपरहिट अशी कित्येक उदाहरणं ९० च्या दशकात झाली आहेत. अनुराधा पौडवाल यांचं करिअर घडवण्यात सुद्धा याच काळातील ‘आयी मिलन की रात’च्या गाण्यांचा खूप मोठा वाटा आहे. “कितने दिनो के बाद है आयी…” सारख्या गाण्यांमुळे कॅसेट कंपनीला सुद्धा चांगले दिवस आले होते.

 

anuradha paudwal inmarathi

 

नवोदित कलाकारांनाच फक्त या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नव्हतं. शाहरुख खान च्या ‘दिल से’ची सुद्धा तीच परिस्थिती होती. सिनेमा अपेक्षे इतका मोठा हिट झाला नाही. पण, गाण्यांनी जो इतिहास केला तो सर्वश्रुत आहेच.

===

हे ही वाचा – एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात

===

अपेक्षित यश न मिळणाऱ्या आणि गाणी सुपरहिट ठरलेल्या ‘टॉप टेन’ सिनेमांची यादी केली तर या प्रमुख १० सिनेमांची नावं घेता येतील:

१. तुम बिन

“छोटी छोटी राते, लंबी हो जाते है” आणि “तुम बिन जिया जाये कैसे?” आणि “कोई फरीयाद” ही गाणी लोकांना इतकी आवडली, आवडतात की या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस यशाकडे कोणी बघितलंच नाही.

 

२. १९४२: अ लव्ह स्टोरी

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेला, कसौलीसारख्या छोट्या शहरात चित्रीकरण झालेला हा सिनेमा लोकांना टीव्हीवर बघतांनाच जास्त आवडला. बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या या सिनेमाची गाणे मात्र प्रचंड लोकप्रिय झाली होती.

“एक लडकी को देखा तो ऐसा लगा” आणि “कुछ ना कहो..” सारखी रोमँटिक गाणी असलेल्या या अल्बममध्ये “ये सफर बहोत है कठीन मगर… ना उदास हो मेरे हमसफर”सारखं अर्थपूर्ण गाणं सुद्धा होतं.

 

३. झंकार बिट्स

नावाप्रमाणेच संगीत हा विषय समोर ठेवून तयार केलेल्या या मल्टीस्टार सिनेमाचा खरा नायक संगीतकार होता. राहुल बोस, जुही चावलासारख्या प्रस्थापित कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता.

त्यातलं “तू आशिकी है” आणि “सुनो ना” सारखी गाणी प्रेक्षकांना खूप आवडले होते.

 

४. दहेक

अक्षय खन्नाच्या फ्लॉप सिनेमाच्या यादीतील हा सिनेमा केवळ “सावन बरसे, तरसे दिल…” या गाण्यामुळे आठवला जातो. सुंदर दिसलेली सोनाली बेंद्रे, मुंबईच्या पावसामुळे भेट न होऊ शकणारे दोन प्रेमी आणि श्रवणीय गीत यामुळे हे गाणं लोक कधीच विसरले नाहीत.

 

हा सिनेमा बघितलेल्या लोकांची संख्या विचारली तरी तो आकडा फार मोठा नसेल. पण, गाणं मात्र सर्वांनीच ऐकलेलं, बघितलेलं असेल.

५. यादे

सुभाष घई यांचा मोठी स्टारकास्ट असलेला यादे हा सिनेमा लोकांनी पहिल्याच दिवशी नाकारला. दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे हे कोणाला कळलंच नाही, प्रेक्षकांना फक्त “यादे, याद आती है” हेच गाणं खूप आवडलं.

 

सिनेमात पण हे गाणं इतक्यांदा वाजतं की तेच लक्षात राहतं.

===

हे ही वाचा – आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

===

६. करीब

बॉबी देओलच्या फ्लॉप सिनेमांपैकी एक असलेला ‘करिब’ हा केवळ “चोरी चोरी नजरे मिली”, “चुरा लो ना दिल मेरा” या गाण्यांमुळे लोकांच्या लक्षात आहे. मधुर संगीत, वेगळ्या पद्धतीने यमक जुळवण्याचा प्रयत्न लोकांना खूप आवडला.

 

७. सावरीया

रणबीर कपूर हा आज एक मोठा स्टार असला तरी त्याच्या करिअरची सुरुवात एका प्लॉपने झाली होती. ‘ओम शांती ओम’ सोबत स्पर्धा करणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसची स्पर्धा पूर्णपणे हरला.

सावरीया बघितल्यानंतर प्रेक्षकांना फक्त “जब से तेरे नैना” हे रणबीर कपूरचं टॉवेलवरचं गाणं लक्षात राहीलं. “ओ सावरिया” आणि “माशा अल्लाह” ही दोन गाणी सुद्धा एका ठराविक वर्गाला खूप आवडली.

 

 

संजय लीला भन्साली यांच्या सिनेमांपैकी हा सर्वात मोठा फ्लॉप समजला जातो. स्वतः संगीतकार असलेले संजय लीला भन्साली हे त्यांच्या सिनेमात चांगल्या गाण्यांसाठी नेहमीच आग्रही असतात.

८. झुम बराबर झूम

अभिषेक बच्चन आणि प्रीती झिंटाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर साफ आपटला. पण, या सिनेमातील “बोल न हलके हलके” आणि “झूम बराबर झूम” ही दोन्ही गाणी किती तरी दिवस चार्ट बस्टरच्या लोकप्रिय यादीत होती.

 

झूम बराबर झूम हे गाणं आधी दलेर मेहंदी यांनी गायलं होतं आणि नंतर ते शंकर महादेवन यांनी गायलं. या वादामुळे सुद्धा सिनेमाला एक प्रसिद्धी मिळाली होती. पण, त्यामुळे बॉक्स ऑफिसचे आकडे फारसे बदलले नाहीत.

९. बार बार देखो

सिनेमाचं नाव जरी ‘बार बार देखो’ असलं तरीही प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांची जोडी असलेल्या या सिनेमातील “काला चष्मा जचदा है” हे गाणं फक्त आबालवृद्धांच्या तोंडात बसलं.

 

कतरिना कैफच्या करिअरमधील लोकप्रिय पाच गाणी निवडली तर त्यामध्ये या गाण्याचा समावेश नक्कीच करावा लागेल. या व्यतिरिक्त, “सौ आसमानो को, और दो जहानो को…” हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं होतं.

१०. तमाशा

हा रणबीर कपूरचा अजून एक चित्रपट जो बॉक्स ऑफिसवर अगदीच फ्लॉप ठरला. पण, त्यातील काही गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. “अगर तुम साथ हो” हे गाणं आजवर तयार झालेल्या रोमँटिक गाण्यांच्या यादीत नेहमीच वरच्या स्थानावर असेल.

 

तमाशा या स्वतःच्या स्वप्नांचा शोध घेणाऱ्या तरुणाच्या कथेत “सफरनामा सवालो का” हे गाणं सुद्धा अगदी चपखल बसलं आणि प्रेक्षकांना हा सिनेमा अगदीच जवळचा वाटला.

===

हे ही वाचा – कोण म्हणतं सध्या बॉलिवुड अति बोल्ड आहे? या ६ गाण्यांनी एकेकाळी अनेकांची झोप उडवलेली

===

सुपर फ्लॉप सिनेमा आणि सुपरहिट गाणे ही यादी अजूनही फार मोठी आहे. त्यामध्ये ‘फितुर’मधील ‘तेरा फितुर’, शाहरुखच्या नवीन ‘दिलवाले’ मधील ‘गेरूवा’ आणि शाहिद कपूरच्या ‘शानदार’ मधील ‘गुलाबो’ यांचा सुद्धा समावेश करता येईल.

 

gulabo song inmarathi

 

या सर्व गाण्यांवरून हे लक्षात येतं की, आपण केवळ ट्युनवर गाण्याची लोकप्रियता ठरवत असतो. गाण्याचं चित्रीकरण, सिनेमाचं यश-अपयश हे आपल्यासाठी काहीच महत्वाचं नसतं. बॉलीवूड चं वेगळेपण टिकवून ठेवणारे असेच श्रवणीय गाणे उत्तरोत्तर तयार होत राहोत अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?