' महात्मा बसवेश्वर, साता-समुद्रापार ख्याती असलेलं व्यक्तित्व; अभूतपूर्व कार्याची गाथा! – InMarathi

महात्मा बसवेश्वर, साता-समुद्रापार ख्याती असलेलं व्यक्तित्व; अभूतपूर्व कार्याची गाथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही भले भले त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत.

असेच एक महापुरुष ९०० वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर. थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय.

 

mahatma-basweshwar-InMarathi

 

१२व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता.

अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला.

यासाठीच बरेचजण त्यांना १२व्या शतकातील पुरोगामी तर काहीजण विद्रोही महात्मा असेही म्हणतात.

महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते.

महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली.

महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.

 

basveshwar-maharaj-InMarathi

 

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला.  (जन्म तारीख आणि वर्ष या विषयी मतभेद आहेत पण खूप संशोधना अंती इतिहास संशोधक डॉ पी बी सावंत यांनी ११०५ हेच वर्ष ठरवले आहे)

दरसाल त्याच दिवशी देशभरात बसवजयंती साजरी केली जाते, खास करून कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक) येथे ही जयंती जोरदार साजरी केली जाते. १९१३ मध्ये कर्नाटक गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी दावणगेरे (कर्नाटक) येथे पहिली सार्वजनिक बसव जयंती साजरी केली.

महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

 

basveshwar-maharaj-1 InMarathi

 

मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे.

कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.

श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

बसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.

 

basveshwar-maharaj-2 InMarathi

 

बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.

तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.

असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.

 

basveshwar-maharaj-marathipizza03
shivalingappa-mysoreartgallery.in

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते.

वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली.

मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.

basveshwar-maharaj-marathipizza04
en.wikipedia.org

 

दोन वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरन संध्येच्या भाषणात याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरवही केला होता.

basveshwar-maharaj-marathipizza04
hindustantimes.com

 

आता परत हे मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्या नुकतेच २३ भाषेत रूपांतरित झालेलं असून येत्या २८ एप्रिल २०१७ रोजी बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे “वचन साहित्य” देशाला समर्पित करण्यात येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?