' पांढऱ्या मीठापेक्षा "हे मीठ" आहे शरीरासाठी जास्त फायदेशीर! वाचा

पांढऱ्या मीठापेक्षा “हे मीठ” आहे शरीरासाठी जास्त फायदेशीर! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लहानपणी गोळेवाल्या भैयाची गाडी आली की आपण सगळेच घरातून किंवा खेळात असलो तर खेळ टाकून तडक त्या गाडीकडे धाव घेत असू. लाल, पिवळ्या, जांभळ्या रंगाच्या काळ्या बाटल्या, काडीला बर्फाच्या गोळ्याचा थर त्यावर आपल्याला हवा तो फ्लेवर आणि नंतर भैया हमखास एक गोष्ट टाकायचा ती म्हणजे काळ मीठ…

आजकाल कोणत्याही सोड्याच्या गाडीवर गेलात तर सोड्यात घालणारी  हमखास गोष्ट म्हणजे काळे मीठ.जेवताना हे मीठ सामान्यतः अशाच लोकांकडे आढळून येते.

आपल्या रोजच्या जेवणाला चव देण्याचे काम हे मीठ करते. मिठाशिवाय जेवण कोणीच खाऊ शकत नाही. मात्र असे असूनही हेच मीठ अति खाल्ले तर शरीराराला त्रासदायक देखील ठरते. ते म्हणतात ना ‘अति तिथे माती’.

मात्र मागच्या काही वर्षांपासून डॉक्टर, आहारतज्ज्ञ आदींच्या सांगण्यावरून अनेकांनी त्यांच्या आहारात पांढऱ्या मिठाऐवजी काळया मिठाचे सेवन करायला सुरुवात केली आहे.

 

black salt 2 inmarathi

 

पांढऱ्या मिठापेक्षा काळ्या मिठाचे आरोग्यासाठी अधिक फायदे आहेत.

काळ्या मीठात सोडियमचे प्रमाण कमी असून, हे मीठ अँटिऑक्सिडंट आहे. त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असातात.

काळे मीठ शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात फायदेशीर ठरते. नैसर्गिक रक्त पातळ करणारा घटक म्हणून काळे मीठ काम करते. सोबतच रक्तदाबालाही नियंत्रणात ठेवते. शरीरातील ब्लड ग्लुकोज कमी झाल्यावरही काळे मीठ उपयुक्त आहे.

 

black salt 1 inmarathi

 

हे ही वाचा – सावधान: हे पदार्थ सतत खाल्ल्याने तुम्ही तिशीतच चाळीशीतल्या दिसू शकता…

काळ्या मिठामुळे आपली पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

 

black salt 3 inmarathi

 

सांधेदुखी, पायांच्या दुखण्याचा त्रास होत असल्यास काळे मीठ गरम करून पायांना शेक घेतल्यास आराम मिळण्यास मदत होते.

 

black salt 8 inmarathi

 

पोटदुखीचा खूप गंभीर स्वरुपात त्रास होत असेल तर काळ्या मिठासह ओवा हळू हळू चावून खाल्यास फायदा होतो.

 

black salt 5 inmarathi

 

नियमित स्वरुपात सॅलेड किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये काळ्या मिठाचा उपयोग केल्यास तुमच्या गॅस, अपचन तसंच बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

 

black salt 6 inmarathi

 

टॉमेटोच्या रसात काळे मीठ घालून १५ मिनिटे केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल सोबतच केस दाट होतील.

 

black inmarathi

 

कोमट पाण्यामध्ये काळे मीठ टाकून आंघोळ केल्यास कोरडी त्वचा, त्वचेला खाज सुटण्याची समस्या कमी होते. यामुळे सोरायसिस यासारख्या त्वचा विकारांपासून आपली सुटका होण्यास मदत मिळते.

 

bath featured inmarathi

 

 

रोजच्या जेवणात देखील अनेक लोक चवीपरीने मीठ खातात. अगदी जेवणात मीठ घातले असताना देखील वरून मीठ टाकणारे लोक असतात. अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स सांगत असतात की रोजच्या जेवणात शक्यतो मीठ कमी खा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?