' उसाच्या रसाचा गोडवा आता पन्ह्यात सुद्धा...एका मराठी दाम्पत्याचा भन्नाट शोध

उसाच्या रसाचा गोडवा आता पन्ह्यात सुद्धा…एका मराठी दाम्पत्याचा भन्नाट शोध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल व्यवसायाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत, देशात आज अनेक ठिकाणी नवनवीन स्टार्टअप्स दिसून येत आहे, अगदी सर्वसामान्य व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तेच व्यवसाय नव्या रूपात आणताना दिसून येत आहे.

अगदी टपरीवर मिळणार चहा आता थेट दुकानांमध्ये मिळू लागला आहे, टपरीवरचा पानी कम चहा आता थेट कुल्हडमध्ये मिळू लागला आहे. स्टार्टअप्सच्या नवनवीन कल्पनांना ग्राहक देखील चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.

इच्छा तिथे मार्ग ही म्हण आपण नेहमी ऐकतो. त्याची उदाहरणे आजूबाजूला पाहतो. हीच म्हण सार्थ करून दाखवली आहे पुण्याच्या दातार दांपत्याने. तीही एक वेगळी वाट निवडून.

 

startups inmarathi

 

१३ वर्षे आयटी कंपनीत काम केल्यावर देखील यांत्रिक व रुळलेला मार्ग सोडून त्यांनी क्रिएटिव असा स्वत:चा व्यवसाय सुरू केला तो ही एकदम हटके स्टाईल चा..काय होती त्यामागची प्रेरणा? असा कोणता व्यवसाय त्यांनी सुरू केला ? जाणून घेऊ त्यांच्या या प्रवासाची कहाणी..

मिलिंद आणि कीर्ती दातार हे आयटीमध्ये काम करणारे पुण्यातील आयटीयन्स. जवळपास १३ वर्षे या क्षेत्रात काम करणारे. आयटी पार्क संस्कृतीप्रमाणे ते ही बर्‍याचदा ऑफिस मधील कॅफेटेरिया मध्ये चहा, कॉफी घेणारे.

 

milind inmarathi

हे ही वाचा – अमेरिकेमध्ये राहणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी!

अशातच मित्रांबरोबर कॉफी घ्यायला गेलेल्या मिलिंद यांना कॉफीला मिळणारे वेटेज आपल्या देशी आणि स्थानिक पेयांना का मिळत नाही? हा प्रश्न पडला आणि त्यातूनच एका वेगळ्या कल्पनेचा जन्म झाला. तो म्हणजे ऊसाचा रस बाटलीबंद पद्धतीने विक्री करण्याचा.

कल्पना तर वेगळी होती पण त्यावर बराच अभ्यास करणे गरजेचे होते. मिलिंद सांगतात, जेव्हा जेव्हा ते एखाद्या कॉफीशॉप मध्ये जात असत तेव्हा तिथली स्वच्छता, आणि हायजिन पाहून नकळत ते या कॉफी शोप्स आणि आपल्याकडची ज्यूस सेंटर्स यांची तुलना करू लागत.

त्यांच्या हे लक्षात आले की स्वच्छता आणि हायजिन हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे लोक ह्या देशी पेयांकडे पाठ फिरवतात. पण जर या स्वादिष्ट, आरोग्यदायी देशी पेयांना स्वच्छता आणि हायजिन ची जोड मिळाली तर ती ही तेव्हडीच लोकांच्या पसंतीस उतरतील जशी या मॉडर्न शोप्स मधील कॉफी.

 

sugarcane shops inmarathi

 

यातूनच त्यांनी निर्णय घेतला ऊसाच्या रसाची विक्री या कॉफी प्रमाणे नवीन फॉर्म मध्ये करण्याचा. ऊसाच्या रसाचा व्यवसाय अजूनही असंघटित आहे.

स्वच्छतेचा अभाव असल्याने ग्राहक रस घेण्यास फारसे उत्सुक नसतात.. पण याचे स्वरूप थोडे बदलले तर ऊसाचा रस हा एक चांगला पर्याय होवू शकतो. अशी खूणगाठ मिलिंद यांनी बांधली.आणि त्यानंतर सुरू झाला नवीन स्टार्ट अप चा प्रवास.

या नंतर आपल्या पत्नीशी चर्चा करून त्यांनी ऊसाच्या रसाच्या व्यवसायाची प्राथमिक माहिती जमा करण्यास सुरवात केली. काही वर्षांनंतर पतिपत्नी दोघांनी नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला. त्यातून मग ऊसाच्या रसाची निर्मिती आणि मार्केटिंग करणार्‍या ‘केनबोट ‘ ची सुरवात झाली.

या व्यवसायाशी संबंधित समस्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की अस्वच्छतेबरोबरच ऊसाच्या रसाचे गाळप करणारी लोखंडी मशीन्स ही देखील एक समस्या आहे.

ही मशीन्स देखील स्वच्छतेच्या निकषावर उतरली तरीही खूप फरक पडू शकतो. यातून मग नवीन क्रश मशीन्स बनवण्याचे ठरले. मिलिंद यांनी विकसित केलेली ही मशीन्स जास्त क्षमतेची तर आहेतच पण त्यावर वेष्टण किंवा कवरिंग असल्याने ती हायजिन सांभाळणारी व जास्तीत जास्त शुद्ध रस तयार करणारी आहेत. या विकसित मशिनमध्ये ऊसातील ५० टक्के रस एकाच वेळी गाळप होतो त्यामुळे चिपाडांचा कचरा ही जास्त होत नाही.

 

milind 5 inmarathi

 

प्लस ही मशीन्स आकाराने लहान असल्याने कमी जागेत बसू शकतात. मशिन्सची रचना देखील अशी करण्यात आली आहे की त्याच्या स्वच्छतेसाठी पाण्याची ही आवश्यकता नाही.

मशीन मधील आयओटी तंत्रामुळे रोज काढल्या जाणार्‍या ऊसाच्या रसाचे प्रमाण देखील मोजता येऊ शकेल, इंटरनेटद्वारे देखरेख करता येईल व रसाचे गाळप देखील सहजपणे करता येईल. याचबरोबर ऊसचे गळप करण्याआधी ऊस सोलण्यासाठी देखील त्यांनी एक मशिन विकसित केले आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय घट झाली.

या स्टार्टअप उद्योगाला महाराष्ट्रातील अनेक शेतकरी ही जोडले गेले जे वर्षभर दर्जेदार ऊसाचा पुरवठा करू शकतील. मिलिंद सांगतात, “आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, कारण वर्षभर एकाच चव आणि उच्च दर्जा आम्ही राखला. ऊसचे वान देखील काळजीपूर्वक निवडले.”

Canectar Foods Pvt Ltd. या मिलिंद यांनी सुरू केलेल्या कंपंनीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या आयटी पार्क मध्ये ऊसाच्या रसाची विक्री करणारी आऊटलेट्स सुरू केली. जिथे दर महिन्याला जवळपास ४५ हजार ग्लास ऊसाचा रस विकला गेला.

किर्ती सांगतात व्यवसायाला सुरवात केली आणि लगेच कोविडचा उद्रेक झाला. लॉकडाऊनमुळे आम्हाला आमचे आऊटलेटस तातडीने बंद करावे लागले. अनेक नव्या येवू घातलेल्या योजना बंद कराव्या लागल्या.

 

milind 4 inmarathi

 

हे संकट असे होते की ज्याची कधी कल्पना देखील केली नव्हती. त्यातच ऊसाचा रस नाशवंत असल्याने कॅन रसचा प्रयोग ही अयशस्वी ठरला. येणार्‍या अशा अनेक अडचणींमुळे पुन्हा आयटी क्षेत्रात पट जाण्याचं विचार ही मनात आले. पण तोवर या वाटेवर खूप पुढे आलो होतो आणि माघारी फिरणे अवघड होते.

थोड्या अभ्यासानंतर असे कळले की कैरीचे पन्हे जर ऊसाच्या रसात मिसळले तर ते नैसर्गिक प्रीझर्वेटीव चे काम करते. तसेच ते नैसर्गिकरित्या पौष्टिकही भरपूर आहे. पन्ह्यात साखर न घालता ऊसाचा रस मिसळला तर ते ऊसाच्या रसास गोडवा देईल व पन्हयाची चव टिकवून ठेवेल. या कल्पनेतून तयार झाले. ‘ऊसपन्हे’.

 

milind 3 inmarathi

हे ही वाचा – महाराष्ट्राच्या सुपुत्राने लावलेला शोध आज ८ देशांमध्ये वापरला जातोय!

जे कोणत्याही संरक्षकाशिवाय कॅन मध्ये विकता येते. याबरोबरच हळद, ऊसाचा रस , मिरपूड, आणि इतर घटक मिसळून एक एनर्जी ड्रिंक तयार केले जे कोविड सारख्या साठीच्या आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. अनेक आहार तज्ञांनी या पेयची शिफारस केली आहे.

या पेयाला ‘बिग बास्केट ‘ सारख्या ई – कॉमर्स व ऑनलाइन बिझनेस प्लॅटफॉर्म वर देखील खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलने ही या पेयची शिफारस केली आहे.

पुण्याबरोबरच कंपनीची ही पेय उत्पादने मुंबईत देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जवळपास १ कोटी रुपयांची गुंतवणूक करून, ‘ए आय एम कॅटलिस्ट’ या सरकारी उपक्रमाच्या मदतीने ‘अटल इनोवेशन मिशन’अंतर्गत हा ऊसाच्या रसाच्या निर्मितीचा स्टार्टअप बिझनेस सुरू करण्यात आला.

स्टार्टअप द्वारे नवीन व्यवसाय सुरू करून त्याचा ब्रँड विकसित करणे अवघड आहे. दातार दांपत्याला यासाठी आठ वर्षे लागली. जो आता दरमहा ७ ( सात ) लाख रुपयांची मिळकत करून देतो.

एक वेगळा आणि सुनियोजित विचार आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातो. पण त्यासाठी संपूर्ण अभ्यास,संसशोधन,चिकाटी आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असते.हेच दातार दांपत्याची सक्सेस स्टोरी आपल्याला सांगते..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?