Chechnya Republic – इथे समलैंगिक लोकांचा अमानुष छळ केला जातो !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

The Chechen Republic किंवा Chechnya हा पूर्व युरोपातील एक देश आहे. हा देश रशियाचा फेडरल सब्जेक्ट म्हणजेच रशियाचा राजकीय विभाग आहे(केंद्रशासित प्रदेश आहे ). रशिया एकूण ८३ केंद्रशासित प्रदेशांत विभागला गेला आहे. हा देश North Caucasus मध्ये कॅस्पियन समुद्राजवळ वसलेला आहे. ह्या देशाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा देश समलैंगिक लोकांविरुद्ध उभा ठाकला आहे. आज जिथे बाकी देश समलैंगिक लोकांना त्यांचे हक्क देण्याचा विचार करत आहेत, तिथे ह्या देशात त्यांना त्रास दिला जातो. त्यांना एकतर देश सोडून जाण्यास सांगितले जाते किंवा त्यांचा वाईट प्रकारे छळ केला जातो.

The-Chechen-Republic-marathipizza
breitbart.com

LGBT rights बद्दल सध्या सगळ्या जगात आंदोलने सुरु आहेत. त्यांनाही सामान्य व्यक्तीसारखे सगळे हक्क मिळावेत, त्यांनाही सामान्य आयुष्य जगता यावं म्हणून त्यांच्या संघटना जगात सगळीकडे आंदोलने करीत आहेत. समलैंगिकता ही विकृती किंवा मानसिक आजार नसून त्यांची लैंगिकताच तशी असल्याने त्यांना भिन्नलिंगी लोकांबद्दल आकर्षण न वाटता समलिंगी लोकांबद्दल आकर्षण वाटते आणि हे जगाने मान्य करायला हवे अशी त्यांची मागणी आहे.

समलैंगिक असणे हा गुन्हा मानला जाऊ नये, त्यासाठी शिक्षा होऊ नये व त्यांनाही सामान्य लोकांसारखे आपापल्या आवडीने सामान्य आयुष्य जगता यावे, जगाने त्यांना ते आहेत तसे स्वीकारावे व त्यांच्या बाबतीत कुठलही भेदभाव, दुजाभाव केला जाऊ नये ह्यासाठी LGBT च्या देशविदेशातल्या संघटनांचे त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न व प्रसंगी आंदोलन सुरु असताना Chechenya ह्या देशात मात्र त्यांना स्वीकारलेच जात नाही. नव्हे , समलैंगिकता हा गुन्हा मानून त्यांना शासन केले जाते.

The-Chechen-Republic-marathipizza01
inosmi.ru

ह्या देशात जगातला पहिला कन्संट्रेशन कॅम्प तयार केला गेला आहे जिथे समलैंगिक लोकांचा छळ केला जातो.

डेली मेलच्या रिपोर्ट प्रमाणे,

काही दिवसांपूर्वी ह्या कॅम्प मध्ये १०० समलैंगिक पुरुषांना कैद करून ठेवले होते ज्यातील तिघांना मारून टाकण्यात आले. ह्या कॅम्प मध्ये काही समलैंगिकांना एकतर वीजेचे झटके दिले जातात किंवा इतके अमानुषरित्या मारले जाते की त्यांचा जीव जाईल.

The-Chechen-Republic-marathipizza02
ibtimes.co.uk

Novoya Gazetaon च्या रिपोर्टप्रमाणे,

ह्या देशात अनेक ठिकाणी असे कॅम्प तयार केले गेले आहेत जिथे समलैंगिकांना एकतर मारले जाते किंवा त्यांच्याकडून देश सोडून जाण्याचे शपथपत्र घेतले जाते. ह्यापैकीच एक कॅम्प Argun शहरामध्ये आर्मीच्या जुन्या हेडक्वार्टर मध्ये तयार केला आहे.

ह्यातील सत्य पडताळून पाहण्यासाठी रशियातील काही लोकांना विचारले असता रशियाच्या LGBT नेटवर्कच्या Svetlana Zakharova ने सांगितले की,

समलैंगिक पुरुषांना थांबवून ठेवण्यात आले होते आणि त्यांना सर्वबाजूंनी घेरले होते आणि ह्या नेटवर्क मधील लोक त्यांना सोडवण्याचे व वाचवण्याचे काम करीत होते. त्यांच्या नेटवर्क मधील काही लोकांनी ते शहर, ती जागा सोडून जाण्याचा निर्णय घेतला व ते निघून गेले. त्या कॅम्प मध्ये ३० ते ४० लोकांना एकत्र एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते आणि त्या कॅम्पमधील लोक त्यांना खूप मारहाण करीत होते. काही लोकांना वीजेचे झटके सुद्धा देण्यात येत होते. ह्याशिवाय हे सगळे सुरु असताना त्यांना समलैंगिक समूहातील इतर लोकांची नावे विचारण्यात येत होती. अधिकाऱ्यांनी ह्या अटक केलेल्या लोकांना सोडण्यासाठी blackmail केले व सुटकेसाठी मोठी रक्कम मागण्यात आली. काही लोकांना परत परत अटक करून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले. काहींना स्टिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. काहींना अनेक दिवस ह्या कॅम्प मध्ये ठेवण्यात आले.

The-Chechen-Republic-marathipizza03
winq.com

दिवसातून अनेकदा त्यांना विचारपूस व तपास करण्याच्या नावाखाली मारहाण होत असे. ह्या सगळ्यात त्यांचे फोन सुरु ठेवण्यात आले होते कारण ह्या अधिकाऱ्यांना आणखी समलैंगिक लोकांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करायची होती. अनेक पुरुषांना तर फक्त समलैंगिक असल्याच्या संशयावरून अटक करून त्यांना मारहाण करण्यात आली व अमानुष छळ करण्यात आला.

रशियाच्याच Amnesty International च्या Alexander Artemyev ने सांगितले की,

त्यांच्या हातात फक्त रशियाच्या अधिकाऱ्यांशी ह्याचा तपास करण्याबद्दल विनंती करणे इतकेच आहे. ह्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. सरकारच्या ह्या अमानवी कृतीपुढे ते हतबल आहेत. Chechenya मध्ये समलैंगिक लोकांबरोबर इतका क्रूर व्यवहार केला जात आहे कि ते ह्याबाबतीत पुढे येऊन बोलण्यास किंवा आपल्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत.

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे तिथले राष्ट्रपती Razman Kadyrov ह्यांनी समलैंगिकांवर ही अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण औपचारिक दृष्ट्या सरकार म्हणते आहे की अश्या कुठ्ल्याशी प्रकारच्या अटकेशी सरकारचा संबंध नाही किंवा अशा प्रकारच्या समलैंगिकांना अटक करून त्यांचा अमानुष छळ झाल्याच्या घटना घडल्याच नाहीत.

The-Chechen-Republic-marathipizza04
fourtwonine.com

जगभरात ह्या घटनेने पडसाद उमटले. अनेकांनी ह्याची निंदा केली. मानवी अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या ह्या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला. युके आणि युएस ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन ह्यांना ह्या प्रकारात लक्ष घालण्यास व तपास करण्यास सुचवले आहे. ह्या आधी सुद्धा Chechenya चे राष्ट्रपति Razman Kadyrov ह्यांच्यावर मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचे अनेक आरोप आहेत.

समलैंगिकता हा आजार आहे की हि गोष्ट काहींच्या बाबतीत नैसर्गिक आहे हा वादाचा विषय असला तरी अशा प्रकारे कुठल्याही जीवाचा छळ करणे, त्यांचा जगण्याचा हक्क नाकारणे (मग तो माणूस असो कि प्राणी) हे निंदनीय आहे आणि अमानुष आहे.

माणुसकी सगळ्यात मोठी आहे पण हल्ली लोकांना माणुसकीचा वारंवार विसर पडतोय हे एक भयाण वास्तव आहे!

हे देखील वाचा: (तृतीयपंथ्यांशी निगडीत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?