' राज ठाकरेंवरच्या त्या भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते "मी शिवसेना सोडतो"

राज ठाकरेंवरच्या त्या भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई, इथूनच भारताचं खूपसं अर्थकारण चालतं. तिथं असणारी फिल्मसिटी कितीतरी लोकांचा रोजगार आहे. इतर छोटे छोटे उद्योगधंदे, फिल्मसिटी, मोठ्या मोठ्या मिल्स यामुळे मुंबईत आलेला कुणीही बेरोजगार रहात नाही. उपाशी मरत नाही.

या मायानगरीने कितीजणांना पोटात घेतले आहे.. आणि किती जणांचा घास गिळला आहे याची मोजदादच नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दाक्षिणात्य लोकांच्या मुंबईवर असलेल्या वर्चस्वाला आव्हान देत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली. उठाव लुंगी बजाव पुंगी हा मंत्र म्हणतच शिवसेना मोठी झाली आणि मराठी माणसाच्या अस्मितेला जाग आली.

 

balasaheb 2 inmarathi

 

मराठी माणूस जागा झाला आणि शिवसेनाही प्रस्थापित झाली. बघता बघता शिवसेना पक्ष म्हणूनही चांगलाच मजबूत झाला. बाळासाहेब हे किंगमेकर होते. त्यांनी कोणतेही राजकीय पद घेतले नाही. पण त्यांच्याच शब्दावर एकंदरीत राजकीय पक्ष आपलं काम करायचा.

शिवसेनेचा रिमोट बाळासाहेबांच्या हातात आहे अशी खरपूस टीका पण विरोधी पक्षनेते करत. पण त्याला जराही दाद न देता शिवसेनेचे कामकाज बाळासाहेबांच्या शब्दांवरच चालत राहिले.

अगदी बाँबस्फोट प्रकरणात अडकलेला संजय दत्तला सुद्धा, सुनिल दत्त यांनी बाळासाहेब ठाकरेंकडं आपलं वजन खर्ची घालून सोडवला. याशिवाय बरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. मग ते छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडणं असो की राज ठाकरेंनी केलेली घणाघाती टीका असो.

 

हे ही वाचा –

 

uddhav and raj inmarathi

 

आज उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी बनून उभे राहिले आहेत पण एके काळी या राज ठाकरेंवर इतकी भयंकर टीका झाली होती की बाळासाहेब ठाकरे म्हणाले “मी शिवसेना सोडतो!”

आता ताजं ताजं प्रकरण म्हणजे सुशांत सिंग राजपूत याची हत्त्या की आत्महत्या? यातही आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे का अशा नाना चर्चांना जोर चढला होता.

तसंच काही वर्षांपूर्वी रमेश किणी या सामान्य माणसाचा सिनेमा थिएटरमध्ये झालेला मृत्यू अशीच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून गेला होता.

काय होतं रमेश किणी प्रकरण?

रमेश किणी हा लक्ष्मीचंद शहा यांच्या तीन मजली इमारतीमध्ये राहणारा भाडेकरू होता. शहांना ती इमारत विकायची होती. त्यासाठी ती जागा रिकामी करावी असा तगादा शहांनी लावला होता. परंतू रमेश किणी आणि त्याची पत्नी शैला किणी यासाठी अजिबात तयार नव्हते.

शीला किणी यांनी शहांबद्दल तक्रार दाखल केली की शहा त्यांच्यावर जागा रिकामी करण्यासाठी भयंकर दबाव आणत आहेत.

पण शिवसेना आणि राज ठाकरे यांचा खूप प्रभाव असल्याने ही तक्रार गंभीरपणे घेतली गेली नाही. जुलै १९९६ मध्ये रमेश किणी गायब झाले आणि पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांचा मृतदेह सापडला आणि तिथूनच गोंधळ सुरू झाला.

 

kini murder case inmarathi

 

मुंबईत राहणारे किणी पुण्यात जाऊन सिनेमा थिएटरमध्ये मरणं ही गोष्ट संशयास्पद होती. एका पोस्टमाॅर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलं होतं किणी हृदयविकाराच्या धक्क्याने गेले, दुसरा रिपोर्ट सांगत होता की त्यांनी आत्महत्या केली.

शीला किणींनी आक्रोश करत झाल्या प्रकारात रमेश किणी यांचा घातपात घडवून आणण्यामागे राज ठाकरेंवर आरोप केला.

सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी तर पोस्टमाॅर्टेम रिपोर्ट गडबड आहे असं सणसणीत विधान केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या रिपोर्टमध्ये रमेश किणी यांचा मेंदू गायब झाला होता.

सेना, ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला. बाळासाहेबांना प्रचंड कोडं पडलं कुणाची बाजू खरी? सत्तेत शिवसेना असल्याने न्याय राज ठाकरेंनाच मिळणार हे स्पष्ट होतं. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.

राज ठाकरेंनी दावा केला की या प्रकरणात त्यांचा कसलाही हात नाही. निव्वळ त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात यावी म्हणून त्यांचं नाव यात गोवलं आहे. केवळ त्याने आत्महत्या केली म्हणून मला अटक कशी काय करु शकता?

 

raj thackrey inmarathi

 

ही केस पार सुप्रीम कोर्टात गेली. पण तिथंही तपासात कांहीही निष्पन्न झालं नाही. जनतेच्या भावना रमेश किणी यांच्या मृत्यूबाबत अतिशय तीव्र होत्या म्हणून हाय कोर्टाने हा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी सूचना केली होती.

पोलिसांनी रमेश किणी यांच्या खिशात आत्महत्या करण्याबाबत लिहीलेली चिठ्ठी सापडली असं सांगितलं. पुढे लक्ष्मीचंद शहा, त्यांचा मुलगा यांची कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

विद्यार्थी सेनेचा नेता आशुतोष राणे आणि शहा पिता पुत्रांना अटक केली पण नंतर त्यांचीही मुक्तता करण्यात आली. राज ठाकरेंवर मात्र कसलीही कारवाई केली नाही.

२०११ मध्ये‌ शीला किणी एकाकी अवस्थेत मरण पावल्या. २०१४ मध्ये‌ राज ठाकरेंनी‌ लक्ष्मीचंद शहा यांच्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत उभी केली.

 

sheela kini inmarathi

 

आज बरोबर दहा वर्षांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरे यांचं नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

किणी असोत की सुशांत सिंग राजपूत यांच्या बाबत काय घडलं ते जनतेला कधीच खरं समजणार नाही. पण असे प्रसंग घडतात आणि कशावर विश्वास ठेवावा हे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे मात्र नक्की.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?