' चाणक्यांनी दिले आहेत महामारीच्या संकटापासून वाचण्यासाठीचे हे ६ कानमंत्र...!!

चाणक्यांनी दिले आहेत महामारीच्या संकटापासून वाचण्यासाठीचे हे ६ कानमंत्र…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महामारीत किंवा एखाद्या रोगाची साथ आल्यावर मनुष्याचं वागणं कसं असावं, काय करावं आणि काय करायला नको हे सगळं आचार्य विष्णुगुप्त चाणक्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलंय.

विष्णुगुप्त चाणक्य यांना कौटिल्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. आपलं परखड व्यक्तिमत्व, राष्ट्रभक्ती, ज्वलंत वक्ता, शास्त्र – शस्त्रात पारंगत असलेले शिक्षक, राजकारण तसेच अर्थव्यवस्था तज्ज्ञ म्हणून आजही संपूर्ण भारतभर ते आदरणीय मानले जातात.

 

chanakya inmarathi

 

एका शिक्षकाच्या ओटीत ज्ञान रुपी नदी खळ खळ वाहत असते, ती जशी परिपक्व विचारांचे अंकुर फुलवू शकते तसेच विराट रूप धारण करून आपल्या पुरात सबंध राष्ट्र वाहून नेऊन उध्वस्त सुद्धा करू शकते. ‘एक शिक्षक जर राष्ट्र घडवू शकतो तर राष्ट्राचा विध्वंस सुद्धा करू शकतो, त्यामुळे राष्ट्रहितासाठी शिक्षकांनी एका हातात पुस्तक तर एका हातात खड्ग धारण केलंच पाहिजे’ हे विचार त्यांनी भारतीय समाजात पेरण्याचा ध्यास घेतला होता.

‘तुम्ही राजाचे नाही तर आपल्या राष्ट्राचे ऋणी आहात’ हे न विसरता, राजा चुकत असेल तर त्याला मार्गावर आणायला सुद्धा प्रजेने सज्ज असायला पाहिजे या त्यांच्या मतावर ते ठाम होते आणि त्यांनी तसंच केलं.

सत्तांध आणि आपल्या सत्तेच्या जोरावर प्रजेचे हाल करणाऱ्या, कपटी, भ्रष्टाचारी धनानंदाला समजावण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. सगळे प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा त्यांनी पाटलीपुत्रचं राजकारण स्वतःच्या हातात घेतलं.

चंद्रगुप्तसारखा शासक घडवण्यापासून, पटलीपुत्राच्या मदमस्त प्रशासनाला नेस्तनाबूत कारण्यापर्यंतच कुटील राजकारण त्यांनी केलं, फक्त आणि फक्त राष्ट्रहितासाठी.

 

chanakya and chandragupta inmarathi

 

===

हे ही वाचा – आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं स्वतःत रुजवून घेतलीत तर जीवनात अशक्य काहीच नसेल

===

भारतीय राजकारणातील एक मौल्यवान रत्न आणि राजकारण पद्धतीत आणि धोरणांत क्रांती घडवून आणणाऱ्या आचार्य चाणक्यांनी अनेक ग्रंथ आणि पुस्तकांची रचना केली. त्यातील एक पुस्तक आजही अनेकांना प्रेरणा देतंय, योग्य मार्गदर्शन करतंय.

आपल्या अनुभवांचा पुढील पिढ्यांना फायदा व्हावा, त्यांनी त्या चुका करू नयेत, ज्या आपण केल्या म्हणून त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी ‘चाणक्य नीती’ नावाचं एक पुस्तक आचार्यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या प्रयतेक समस्येचं उत्तर लिहून ठेवलेलं आहे.

याकाळात जसंच्या तसं जरी आपल्याला ते अवलंबता आलं नाही, फक्त आचार्यांच्या दृष्टिकोन आत्मसात जरी केला तरी आपल्या समस्यांचं समाधान आपण शोधू शकतो.

या पुस्तकात अर्थव्यवस्थेपासून, मनुष्याचं प्रत्येक प्रसंगात वर्तन कसं असावं, कोणत्यावेळी काय क्रिया करावी, राहणीमान आणि सवयी कशा असाव्या, सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी काय दिनचर्या असावी हे सगळे विषय या पुस्तकात सापडतात.

 

chanakya niti inmarathi

 

एखादी महामारी थैमान घालू लागली की मनुष्याच्या विचारांची दिशा काय असावी, त्याचा त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा, सुरक्षिततेच्या अनुषंगाने काय काय पावलं उचलावीत हे सुद्धा चाणक्यनितीत दिलेलं आहे. चाणक्य म्हणतात –

१. सतर्कता बाळगणे

आचार्य म्हणतात जेव्हा एखादी महामारी थैमान घालते आणि मृत्यू तांडव सुरु होतो तेव्हा प्रत्येक नागरिकाने अत्यंत सतर्क आणि सजग राहणं गरजेचं आहे. आपण आपल्या क्रियांकडे लक्ष ठेऊन, जे जे नियम पाळायला सांगितले आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेच आहे.

 

queue with social distancing inmarathi

 

२. जागरूक असणे

प्रत्येक नागरिकाने महामारी विषयी स्वतःला जागरूक करून घ्यायला हवं. यासाठी संपूर्ण माहिती गोळा करून तिचा अभ्यास केला पाहिजे. जेणेकरुन आपण कोणतीही चुकीची पावलं उचलणार नाही. ज्यामुळे आपल्या आणि आपल्या आप्तस्वकीयांवर कोणतंही संकट कोसळणार नाही.

 

beware inmarathi

 

३. विलगीकरणाचा अवलंब करणे

महामारीच्या काळात कुठेच एकत्र गोळा न होता, स्वतःच्या घरात सुरक्षितपणे विलग राहायला पाहिजे. समाजात वावरल्याने रोग अधिक पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठेही गर्दी न करता, एक योग्य अंतर राखलं पाहिजे. गरज असेल तरच घराबाहेर गेलं पाहिजे.

 

stay home stay safe inmarathi

 

जोपर्यंत महामारीचा प्रकोप संपूर्ण पणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत जनसंपर्क टाळला पाहिजे.

===

हे ही वाचा – आश्चर्य वाटेल, पण आर्य चाणक्यांची “ही” सूत्रं वापरून कित्येक लोक श्रीमंत झालेत…!

===

४. राजाचं ऐकणे

राजाचं ऐकण्याचा अर्थ हाच, की प्रशासनाद्वारे जारी केलेल्या सर्व नियमांची त्वरित अंमलबजावणी करून समस्त नागरिकांनी त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायलाच हवं.

 

rules inmarathi

 

राजा नेहमी प्रजेच्या हिताबद्दलच विचार करतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी वेळी राजाचं म्हणणं डावलून स्वैराचार करू नये. सध्याच्या काळात राजा या शब्दाऐवजी शासन-प्रशासन हे शब्द वापरणं अधिक चपखल ठरेल.

५. अफवांवर विश्वास ठेवू नये

महामारीच्या वेळी पॅनिक होऊन अनेक जण अनावधानाने सुद्धा अफवा उठवतात. यामुळे चुकीची माहिती समाजात पसरते. अनेक अफवा, अंधश्रद्धा, नकारात्मक वार्ता समाजात पसरण्याची दाट शक्यता असते.

 

fake fact inmarathi

 

लोकांनी या सगळ्या विषयांकडे आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून दुर्लक्ष केले पाहिजे. राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या देशाच्या नागरिकांची सेवा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर, आरोग्य अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे.

महामारीविषयी अनेक चुकीच्या बातम्या पसरतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

६. स्वच्छता राखणे

 

house cleaning featured inmarathi

 

महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे महामारीसोबत अनेक छोटे मोठे आजार सुद्धा आपलं डोकं वर काढत असतात.

या गोष्टीची काळजी घेण्यासाठी स्वच्छता राखली पाहिजे, घरातीलच नाही तर रस्ते, मोकळी मैदानं, भांडी, स्वतःच्या शरीराची व्यवस्थित स्वछता राखली गेलीच पाहिजे. नाहीतर महामारीबरोबरच इतर अनेक रोगांना सामोरं जावं लागेल. ज्यामुळे आरोग्यसेवा आणि समाजावरचा ताण अधिक वाढेल.

या सहा गोष्टींचं पालन केलं, तर महामारीतही आपण स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेऊन व्यवस्थेवर येणारा ताण रोखू शकतो.

===

हे ही वाचा – चाणक्यांची ११ सूत्रे, काही धक्कादायक तर काही त्रासदायक!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?