' करोना संसर्ग आणि आपला रोजचा टूथ ब्रश...! हे नातं समजून घ्या...अन्यथा...!

करोना संसर्ग आणि आपला रोजचा टूथ ब्रश…! हे नातं समजून घ्या…अन्यथा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. एक कोटीपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले असून, असंख्य लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. २०२० वर्षाच्या तुलनेत २०२१ वर्षातील दुसरी लाट अधिक जीवघेणी आणि भयावह आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांना एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा पुन्हा झाला, किंवा लस घेऊनही कोरोना झाला. या न दिसणाऱ्या जीवघेण्या विषाणूंसोबत लढताना आपल्याला स्वच्छतेची अधिकाधिक काळजी घेणे खूपच जास्त आवश्यक होऊ लागले आहे.

==

हे ही वाचा : दात घासण्याव्यतिरिक्त “टुथपेस्ट”चे हे फायदे आहेत दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांचं उत्तर

==

covid hygine in marathi

 

आता कोरोना संक्रमणाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे. जे लोकं कोरोनातून बरे झाले आहेत त्यांनी कोरोना झालेला असतांना वापरलेला टूथब्रश बरे झाल्यानंतर वापरू नये.

तज्ज्ञांच्या मते कोरोना संसर्गबाधित व्यक्तीचा टूथब्रश हा कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरु शकतो. इतकेच नव्हे तर या संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनाही टूथब्रशच्या माध्यमातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

 

toothbrush 6 in marathi

 

कोरोनाचा फैलाव रोखण्यास लस जरी प्रभावी ठरत असली तरी लस घेतल्यानंतरही कोरोना होणारच नाही हे अजून कोणीही खात्रीने सांगू शकत नाही. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची असंख्य उदाहरण समोर आली आहेत.

यासर्व गोष्टींमुळे सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे. आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला नाही अशा लोकांसोबतच जी लोकं या कोरोना संसर्गातून बरे झाले आहे त्यांनीही काळजी घ्यायला हवी.

 

indian guy brushing inmarathi

 

कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर नवा टूथब्रश वापरल्यामुळे तुम्ही स्वतःला तर कोरोनाच्या दुसऱ्या संसर्गापासून वाचवतातच सोबतच एकच वॉशरूम वापरणाऱ्या तुमच्या परिवारालाही तुम्ही या भयानक संसर्गापासून वाचवतात. कोरोना संसर्ग झाल्यानंतर २० दिवसांनी टूथब्रश बदलणे खूपच महत्वाचे आहे.

डॉ. मदान यांच्या माहितीनुसार टूथब्रशवर वाढणारे विषाणू श्वसनमालिकेतील वरच्या भागाला संसर्ग करण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात. यापासून वाचण्यासाठी रुग्णाने माऊथवॉश किंवा बेटाडिनच्या गूळण्या करायला गरजेचे आहे.

==

हे ही वाचा : तुमच्या नकळत आरोग्यावर घाला घालणा-या या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर नंतर पश्चाताप करावा लागेल

==

toothbrush 7 in marathi

 

जर घरात माऊथवॉश नसेल तर गरम सलाइन वॉटरच्या सहाय्यानं गूळण्या केल्या तरी तोंडाच्या आतील भागाची स्वच्छता आणि सुरक्षितता राखली जाते. सोबतच दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार हा विषाणू खोकताना, शिंकतांना, बोलताना, ओरडाताना, हसताना तोंडावाटे, नाकावाटे बाहेर पडलेले बारीक शिंतोड्यांमधून पसरू शकतो. विषाणूजन्य पृष्ठभागाला चुकून हात लागला आणि तो हात न धूताच चेहरा, डोळे, नाकाला लागल्यास विषाणूचा संसर्ग होतो.

 

toothbrush 8 in marathi

 

याव्यतिरिक्त संसर्गबाधित व्यक्तीद्वारे बाहेर पडलेला विषाणू हवेत काही काळ राहातो आणि जर ती जागा पुरेशी हवेशीर नसेल, कोंदट असेल तर सोबतच्या व्यक्तीलाही संसर्गाची बाधा होते.

त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर आपला टूथब्रश फेका आणि स्वतःला आणि परिवाराला या भयावह संसर्गापासून वाचवा.

==

हे ही वाचा : कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या डॉक्टरने जे केलंय ते सर्व “कोरोनायोद्धयांची” परिस्थिती दर्शवतं…

==

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?