' देशाभोवती इस्राईलचं अदृष्य सुरक्षा कवच : आयर्न डोम : थक्क करणारं तंत्रज्ञान!

देशाभोवती इस्राईलचं अदृष्य सुरक्षा कवच : आयर्न डोम : थक्क करणारं तंत्रज्ञान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेले २ ते ३ दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत की इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला वाद किती विकोपाला गेला आहे.

हमास या आतंकवादी संघटनेने इस्राईलवर डागलेली रॉकेट्स आणि इस्राईलच्या आर्मीने त्याला दिलेलं प्रत्युत्तर आणि एकंदरच त्यावरून चिघळलेलं स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिति आपण काही सोशल मीडिया आणि इतर समाज मध्यमांवर बघत आहोत.

 

israel hamas attack inmarathi

 

हमासने सोडलेल्या डझनभर रॉकेट्समुळे कित्येक निष्पाप नागरिकांना जीव गमावला आहे. पण तरीही आपल्या नागरिकांची सुरक्षा करू पाहणारं इस्राईलसुद्धा हार मानायला तयार नाही.

हमासने सोडलेली रॉकेट्स इस्राईल हवेतच संपवायचं काम करतंय. त्यासाठी त्यांनी नेमकं कोणतं तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत.

तत्पूर्वी इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातल्या वादामागची पार्श्वभूमी नेमकी काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया.

===

हे ही वाचा इस्त्राइल – पँलेस्टाईन वादामागचं कारण समजून घेणं भारतीयांसाठीही महत्वाचं आहे!

===

हा वाद नेमका कशासाठी?

इस्राईल आणि फिलिस्तिनी लोकांचा भूभाग असलेला वेस्ट बँक यांच्यात बऱ्याच वर्षांपासून विवाद आहेत आणि दिवसेंदिवस ते वाद आणखीनच विकोपाला जात आहेत. तिथले मुस्लिम आणि ज्यू धर्मीय लोकांमध्ये खूपच तणाव आहे.

शिवाय या दोन्ही भूभागांच्या मध्यावर जेरूसलेम नावाचं शहर आहे. या शहरात टेंपल माऊंट म्हणून ओळखली जाणारी एक वास्तु आहे आणि याच आवारात अल-अकसा ही मशीदसुद्धा आहे. या दोन्ही वास्तूच्या बाहेर एक मोठी भिंत पण आहे जी इस्राईली लोकांसाठी खूप पवित्र आहे.

 

jerusalem inmarathi

 

जेरूसलेम या शहरावर फिलीस्तिनी लोकं आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतायत त्यांचं म्हणणं असं आहे की हे शहर म्हणजे त्यांच्या भविष्यातली राजधानी आहे. तर इस्राईलने ईस्ट आणि वेस्ट जेरूसलेमवर खूप आधीच वर्चस्व मिळवलेलं आहे.

यावरूनच या दोघांमध्ये सतत तणावाचं वातावरण असतं. काही २ दिवसांपूर्वी इस्राईली आर्मीवार फिलीस्तिनी लोकांनी केलेल्या दगडांच्या हल्ल्यामुळे हा वाद आणखीन चिघळला आणि हळू हळू परिस्थिति हाताबाहेर गेली

आपल्या फिलीस्तिनी बांधवांवर अन्याय होतोय म्हणून गाजा स्ट्रिप इथल्या (जिथे फिलीस्तिनी लोकांचं आणि तिथल्या आतंकवादी संघटनांचं वर्चस्व आहे) हमास या आतंकवादी संघटनेने इस्राईलवर हवाई हल्ला करायला सुरुवात केली.

हजारो रॉकेट्सचा वर्षाव हमासकडून होत होता, त्यांचं मूळ लक्ष होतं जेरूसलेम, पण आपण व्हीडियोजमध्ये पाहिल्याप्रमाणे ही रॉकेट्स हवेतच नष्ट केली जात होती. यामागे आहे इस्राईलची सर्वोत्कृष्ट सुरक्षा सिस्टिम जिला Iron Dome असंही म्हणतात.

 

iron dome inmarathi

काय आहे हे Iron Dome?

१६ एप्रिल २००१ ची ती घटना. इस्राईलच्या दक्षिणी भागात सेडेरोत नावाचं एक शहर आहे, गाजाच्या बॉर्डरला लागून असलेल्या या शहराची लोकसंख्या ही फक्त ३०००० इतकीच. या दिवशी या शहरावर गाजाकडून एक होममेड रॉकेट लॉंच करण्यात आले.

याआधी कधीच हमासने असा हल्ला केला नव्हता. याआधी ती लोकं सुसाइड बॉम्बरचा वापर करत असत. यानंतर हमासचा हा हिंसाचार सुरूच राहीला. ४ ते ५ वर्षात त्यांनी चांगल्या दर्जाची रॉकेट्स इस्राईलवर सोडायला सुरुवात केली.

===

हे ही वाचा जगातील सर्वात धाडसी इस्राईलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी!

===

२०११ पर्यंत त्यांनी इस्राईलची राजधानी तेल अविव आणि जेरूसलेम या दोन्ही शहरांना टार्गेट करून तिथेसुद्धा मृत्यूचं तांडव करायला सुरुवात केली होती. हमासची वाढती शक्ति पाहून इस्राईल हातावर हात ठेवून बसला असता तर आज कदाचित त्यांचं जगाच्या नकाशावरचं अस्तित्वच पुसलं गेलं असतं!

 

hamas inmarathi

 

२००६ पासूनच इस्राईलने या रॉकेट अटॅकवर काहीतरी ठोस पाऊल उचलून हमासला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलं. एकंदरच नागरिकांचा दबाव आणि वाढते हल्ले पाहता २००७ मध्ये इस्राईलच्या रक्षा मंत्रालयाने खास कवच बनवायला सुरुवात केली. याला म्हणतात Missile defence system!

लाखो करोडो रुपये खर्च करून ही सिस्टिम तैनात करायला इस्राईलवर बराच दबाव होता. अमेरिकेनेसुद्धा इस्राईलला दूसरा मार्ग अवलंबायचा सल्ला दिला होता. पण तरीही इस्राईलने त्यांचं संशोधन सुरूच ठेवलं!

यामध्ये सर्वात पहिले पुढाकार घेतला तो म्हणजे इस्राईलच्या “Rafael Advance Defense system या कंपनीने. हे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी तब्बल ७००० करोड रुपयांची गरज इस्राईलला होती.

तेव्हा अमेरिका पुढे आली आणि तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबमा यांनी १५०० करोड अमेरिकी डॉलरचा फंड पास केला आणि तो सबसिडी म्हणून इस्राईलला देऊ केला.

 

barack-obama-rmarathipizza00

 

इस्राईलवर सततचे होणारे हल्ले थांबायला हवेत आणि एकूण जगातच शांती प्रस्थापित व्हावी म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचललं होतं.

इस्राईलची ही सगळी मेहनत फळाफुलाला आली २०११ मध्ये. जेव्हा इस्राईलवर डागलेलं एक रॉकेट त्यांनी हवेतच नष्ट केलं, आणि या विकसित तंत्रज्ञानाचं नाव होतं Iron Dome!

२०१२ मध्येसुद्धा हमासने इस्राईलच्या राजधानी तेल अविवला निशाणा बनवता येईल अशी व्यवस्था करून ठेवली होती. इराणच्या मदतीने हमासकडे लॉन्ग रेंजची रॉकेट्स पोहोचली होती.

हमासने त्याचा वापर करून हमासची रॉकेट्स हवेतच नष्ट केली. याचं सगळं श्रेय जातं ते या Iron Dome ला.  तब्बल ८०%  ते ९०% यशस्वी असलेलं हे तंत्रज्ञान इस्राईलची सर्वात मोठी ताकत बनलं!

हे Iron Dome नेमकं कसं काम करतं?

हे Iron Dome बॅटरीवर चालतं. आपल्या नॉर्मल चार्ज करणाऱ्या बॅटरीवर नाही, तर रॉकेट कंट्रोल करणाऱ्या बॅटरीवर. या बॅटरीचे तीन प्रमुख भाग आहेत, रडार कंट्रोल सेंटर आणि लॉंचर!

 

iron dome works inmarathi

 

जेव्हा कधी शत्रू हवाई हल्ला करतो तेव्हा त्याच्या रॉकेटला ट्रॅक करण्याचं काम हे रडार करतं. रॉकेट कुठून लॉंच केलं आणि कुठे कोसळणार आहे याची सगळी माहीती रडार कंट्रोल सेंटरला देतं.

या रॉकेटचं काय करायचं ते कंट्रोल सेंटर ठरवतं. रॉकेट जर कोणत्याही सुमसान जागेवर किंवा रिकाम्या जागेवर कोसळणार असेल तर त्या रॉकेटला ते काहीच करत नाही. पण हेच रॉकेट जर लोकांच्या वस्तीवर कोसळणार असेल तर मात्र कंट्रोल सेंटर ती सूचना पुढच्या लॉंचरला देतं.

कंट्रोल सेंटरच्या मदतीने एक इंटरसेपटर हवेत लॉंच केलं जातं आणि ते बरोबर हवेतल्या रॉकेटचा शोध घेऊन तिथे जाऊन ब्लास्ट होतं ज्यामुळे होणारी जीवितहानी टळते आणि ते रॉकेटही हवेतच नष्ट होतं.

या बॅटरीचे हे ३ प्रमुख भाग एकत्र एकाच ठिकाणी तैनात नसतात शिवाय ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतात.

 

iron dome 2 inmarathi

 

काही जाणकारांच्या मते Iron Dome तितके प्रभावशाली नाही आहेत जितकं इस्राईल दावा करतं. काळानुसार त्यांची क्षमतासुद्धा कमी झाली आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की ते आता आधीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे.

===

हे ही वाचा इजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं!

===

इस्राईलच्या या Iron dome ची किंमत ऐकाल तर आणखीनच धक्का बसेल. या सिस्टिममधून एक रॉकेट नष्ट करण्यासाठी तब्बल ६५ लाख इतका खर्च होतो, काही तज्ञांच्यामते हा आकडा चुकीचा आहे. या Iron Dome च्या मदतीने एक रॉकेट नष्ट करायची किंमत ही दीड करोड इतकी आहे!

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी पॅलेस्टाईनविरोधात हीच रणनिती कायम ठेवली आहे. आतंकवादी संघटनांशी संवाद नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या Iron Dome च्या मदतीने इस्राईल बरेचसे हल्ले थांबावण्यात यशस्वी झाला आहे.

 

bejamin netyanahu inmarathi

 

पण तब्बल ७ वर्षांनी १० मे रोजी झालेल्या वादानंतर एकंदरच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. हमासच्या बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून, कित्येक इस्राईली लोकसुद्धा यात हकनाक बळी पडले आहेत. कित्येक लोक जखमी झाले आहेत.

ही परिस्थिती कधी पूर्ववत होईल आणि इस्राईलवर होणारे हे अतांकवादी हल्ले कधी थांबतील हे येणारा काळच ठरवेल, पण यावर मात करणाऱ्या आणि इस्राईलच्या लोकांना शक्य होईल तितकं सुरक्षित ठेवणाऱ्या Iron Dome आणि इस्राईलच्या राष्ट्रभक्तीला एक सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?