' सावधान : डिलीव्हरीनंतर 'हा' सकस आहार घेतला नाही तर....

सावधान : डिलीव्हरीनंतर ‘हा’ सकस आहार घेतला नाही तर….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आई होणं हे स्त्रीला मिळालेले एक दैवी वरदान आहे. प्रत्येक स्त्रिचा हा अनुभव खास असतो, अविस्मरणीय ठरतो. बाळाला जन्म देणं म्हणजे बाईचा नवा जन्म! असं म्हणतात ते खरचं आहे. कारण मोठ्या त्रासातून एक स्त्री तिच्या बाळाला जन्म देते.

indian mother inmarathi

 

यादरम्यान तिच्या शरीराची संपूर्ण झीज झालेली असते. नऊ महिन्यांचे वेगवेगळे नियम आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रसुती अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढताना आईच्या शरीरात अनेक बदल होत असतात.

डिलिव्हरीनंतर स्त्रियांना लवकर बरं होण्यासाठी आहाराचा खूप मोठा वाटा असतो. योग्य आणि सकस आहारच महिलांना लवकर बरे होण्यास खूप फायदेशीर ठरतो.

==

हे ही वाचा : गर्भवती महिलांनी कोरोना संकटात “ही” काळजी घेणं त्यांच्यासह बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे

==

सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलांच्या शरीराची जास्त झीज होते. डिलीव्हरीनंतर स्त्रियांना बरं होण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो. हा काळ सुखाचा, आनंदाचा, मातृत्व साजरं करण्याचा असला तरी या काळात योग्य काळजी घेतली तर भविष्यात आईला कोणताही त्रास होत नाही.

 

kareena inmarathi

 

मात्र याच काळात आहाराची योग्य काळजी घेतली गेली नाही तर महिलांना भविष्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत डिलिव्हरीनंतर स्त्रियांनी कोणता आहार घ्यावा ज्यामुळे शरीराची झीज वेळेत भरून येईल.

भाज्या 

भाज्यांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर, व्हिटॅमिन्स आदी मुबलक प्रमाणात असतात. पालेभाज्या खाणे हे खूप आवश्यक असते.

त्यातही मेथीची भाजी खाणे हे नुकतेच डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी खूप आवश्यक असते. मेथीच्या भाजीमुळे स्त्रियांना दूध येण्यास खूप मदत होते. म्हणूनच प्रसुतीनंतर आईला मेथीचे लाडू आवर्जून दिले जातात.

 

vegetables in marathi

 

कोरडी धान्ये आणि कडधान्ये 

मोड आलेल्या धान्यांमध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू आदी धान्ये खावी. सोबतच मूग, मसूर ह्या पचायला हलक्या डाळींचा जेवणात देखील समावेश करावा.

भाकरी, पोळी, शिरा, उपमा, गंजी आदी अनेक गोष्टींचे सेवन देखील फायदेशीर ठरते.

 

dhanye in marathi

 

चटण्यांचा वापर 

आहारात पौष्टिक चटण्या दिल्या जातात. आरोग्याच्या दृष्टीने भाकरीसह या चाटण्यांचा आस्वाद घ्यावा असाही सल्ला दिला जातो.

मात्र या चटण्यांचा अतिरेक नको, कारण या काळात तिखट खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतं. मात्र सौम्य चटण्यांचा आहारात समावेश करता येईल.

 

chatani inmarathi

 

तीळ, जवस, खुरसणी या प्रकारांना प्राधान्य दिलं जातं.

==

हे ही वाचा : सिझेरियन डिलिव्हरी खरंच गरजेची असते का? जाणून घ्या, यामागची १० कारणं

==

दुधाचे पदार्थ

स्तनदा मातांना दुधाची गरज असते. तसंच हाडांना बळकटी येणंही गरजेचं असतं.

दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने दूध पिणे फायद्याचं ठरतं.

 

milk featured inmarathi

 

सोबतच चांगले तूप खाणे देखील आवश्यक आहे. तुपामुळे स्नायूंना बळकटी येऊन त्यांची झीज भरून निघण्यास मदत होते.

 

milk ghee in marathi

 

ड्रायफ्रुटस

प्रसूतीनंतर आईला दूध येण्यासाठी सुकामेवा फायदेशीर ठरतो.

 

dryfruit inmarathi

 

यात आळीव, खजूर, अंजीर, मनुके, बीट, गूळ, शेंगदाणे, बदाम, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू यांचा समावेश करावा. यामुळे शरीरातील कमी झालेली रक्ताची पातळी देखील भरून निघते.

भरपूर पाणी पिणे

 

water-health-inmarathi05

 

उकळून कोमट केलेले पाणी याकाळात पिणे चांगले असते. दिवसभरात किमान १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीर डिहायड्रेड होत नाही आणि शरीरातील अशुद्धी देखील युरीनद्वारे बाहेर टाकली जाते.

==

हे ही वाचा : पाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ

==

मांसाहार

डिलिव्हरीनंतर महिला पायासूप, मटण, अंडी हे खावू शकता. यातून महिलांना कॅल्शियम, प्रोटीन आणि भरपूर खनिजे मिळतील.

 

paya soup inmarathi

 

अर्थात मांसाहार घेताना त्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?