' पापी असाल, तर या धबधब्याच्या धारेखाली उभे राहूनही कोरडेठाक रहाल… – InMarathi

पापी असाल, तर या धबधब्याच्या धारेखाली उभे राहूनही कोरडेठाक रहाल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाप- पुण्य या मानवी जीवनातील दोन अनन्यसाधारण असलेल्या पैलूंवर आज समस्त संसाराचा गाडा चालतोय. जगातील कोणताही धर्म असो, पाप आणि पुण्य हे दोन विषय त्याचा आधार स्तंभ असल्याचे तुम्हाला आढळून येतील.

पाप काय पुण्य काय याच्या अनेक व्याख्या अनेक थोर संतांनी महापुरुषांनी केल्या आहेत. पण सगळ्यात सोपी व्याख्या तुकाराम महाराजांची आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचले. त्यांचे हे अभंग समाज प्रबोधनाचं कार्य आजही करत आहेत. त्याच अभंगांपैकी, कलियुगात एक अत्यंत महत्त्वाचा सिद्ध होणारा अभंग आहे “पुण्य पर उपकार पाप ते परपीडा”.

पाप आणि पुण्याची इतकी सोपी व्याख्या जगात कोणीच केलेली नसेल. आपला हिंदू धर्म हा कर्मांच्या आधारावर चालतो. चांगली कर्म म्हणजेच पुण्य आणि वाईट कर्म म्हणजे पाप.

 

stone balance inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – २७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा!

===

त्यानुसार पुण्यात्मा म्हणजेच सत्कर्म करणारे आणि दुरात्मा म्हणजेच दुष्कर्म करणारे, अशा दोन माणसांच्या प्रवृत्ती ठरतात. पण तुम्हाला जर सांगितलं, की एक असा धबधबा आहे जो पुण्यात्मा आणि दुरात्मा यांच्यातला फरक ओळखून फक्त पुण्यवंतांवरच आपलं पाणी पडू देतो तर आपला विश्वास बसेल का? नाही ना? पण हे खरंय. जाणून घेऊया कुठे आहे हा धबधबा आणि काय आहे त्याचं रहस्य.

 

vasudhara waterfall inmarathi

 

धबधब्याबद्दल थोडंसं…

देवभूमी उत्तराखंड हे अनेक रहस्यमयी आणि चमत्कारिक मंदिराचं, ठिकाणचं, राज्य आहे. भारतातील मुख्य तीर्थक्षेत्रे म्हणजेच बद्रीनाथ, केदारनाथ सुद्धा उत्तरखंडातच आहेत. यामुळे आणि तिथल्या सुखद, शांत आणि स्वच्छ वातावरणामुळे तिला देवभूमी म्हणण्यात येत असावं.

याच उत्तराखंडात, बद्रीनाथ तिर्थक्षेत्रापासून जवळपास ८ किलोमीटर अंतरावर एक धबधबा आहे. या धबधब्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, की फक्त पुण्यवान लोकांनाच या धबधब्यातील पाण्याचा स्पर्श होतो आणि पापी मनुष्यांवर एक थेंब सुद्धा पाणी पडत नाही. या धाबधब्याचं नाव आहे ‘वसुधारा’ धबधबा.

पुराणानुसार वसुधारा धबधब्याजवळच, पाच पांडवांपैकी असलेल्या सहदेवाने आपले प्राण त्यागले होते. हा धबधबा एका ४०० फूट उंच असलेल्या पर्वतावरून खाली कोसळतो. जमिनीवर आदळेपर्यंत त्याच्या धारा, आकाशातून अनेक सुंदर मोती बारसावेत अशा भासतात.

या धबधब्याच्या आसपासचं वातावरण इतकं प्रसन्न आहे, की आपल्याला जीवंतपणेच स्वर्ग पाहिल्याची अनुभूती होते. हा धबधबा इतका उंच आहे, की जवळून पाहिल्यास एका दृष्टीत संपूर्ण धबधबा दिसणे अवघड होते. वसुधारा आकाशाला भिडल्याचा भास होतो.

 

vasudhara inmarathi

===

हे ही वाचा – जगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत!

===

सुप्रसिद्ध धबधबा

फक्त भारतातूनच नाही तर इतर देशांमधूनही पर्यटक वसुधारा धबधबा बघायला येतात आणि त्याखाली आवर्जून उभे राहतात. आपण पापी आहोत की पुण्यवान आहोत हे जाणून घेण्याची इच्छा त्यांना होत असते.

असं म्हणतात की या धाबधब्याचं पाणी अनेक जडीबुटिंना स्पर्श करून खाली येतं, त्यामुळे त्या सगळ्या जडीबुटिंचे अर्क त्यात उतरतात. म्हणून या धबधब्याखाली उभं राहून त्याच्या धारा जो अंगावर घेतो तो माणूस रोगमुक्त होतो असंही म्हटलं जातं.

बद्रीनाथला आलेले श्रद्धाळू वसुधाराला भेट देतातच. जर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल, की आपण किती पुण्यवान किंवा किती पापी आहोत तर या धबधब्या खाली जाऊन उभं राहावं असं मानलं जातं.

धबधब्याचं पाणी तुमच्या अंगाला शिवलं तर समजावं आपण पुण्यात्मा आहोत, पण ते पाणी जर तुमच्या अंगावर पडलं नाही, त्याच्या एका थेंबाचा सुद्धा जर तुम्हाला स्पर्श झाला नाही तर तुम्ही पापी आहात, अशी मान्यता येथे आहे. ही पाप पुण्यबद्दलची माहिती तिथले गावकरी देतात, त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या पुराणांमध्ये वसुधारा धबधब्यांची काही वर्णनं आहेत.

 

vasudhara falls inmarathi ]

 

सगळीच चांगली कामं होताना जसे काही अडथळे येतात, तसंच इथे सुद्धा होतं. कारण या धबधब्याजवळ पोहोचण्याचा मार्ग काही सोपा नाही. तिथे जायला कोणतीही मोटार गाडी नाही, की बग्गी नाही की घोडे नाहीत.

बद्रीनाथ ते माणा इथपर्यंतच आपल्याला एखादं वाहन मिळेल, पण तिथून संपूर्ण यात्रा आपल्याला पायीच करावी लागते. सर्वात आधी आपल्याला माणा गावापासून ट्रेकिंग करून, अनेक खडतर वाटा, झाडा-झुडपांना पार करून वसुधारा धबधब्याजवळ पोहचावं लागतं.

जर तुम्हाला तुमचा ट्रेक अजून रोमांचक करायचा असेल, तर तुम्ही अलकनंदा नदीच्या मार्गाने जाऊ शकता. त्या मार्गाने सुद्धा धबधब्यापर्यंत पोचणं वेगळा नौभाव देणारं ठरतं.

बद्रीनाथ, केदारनाथ या उत्तराखंडातील चार धाम यात्रा करून भाविक आजकाल या धबधब्याला सुद्धा भेट द्यायला लागले आहेत.

 

kedarnath temple Inmarathi

 

पाप-पुण्य जाणून घेण्यासाठी म्हणून नाही, तरी ४०० फूट उंचावरून कोसळणाऱ्या धाबधब्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी या धबधब्याला भेट द्यायला काहीच हरकत नाही. तिथलं शांत, थंड आणि प्रदूषणमुक्त वातावरण आपलं मन प्रफुल्लित करून आपल्याला जगण्याची एक नवीन ऊर्जा प्रदान करेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – महाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?