' ही ८०० वर्ष जुनी मशीद एका विचित्र कारणामुळे 'अडीच दिवसांची झोपडी' म्हणून प्रसिद्ध आहे

ही ८०० वर्ष जुनी मशीद एका विचित्र कारणामुळे ‘अडीच दिवसांची झोपडी’ म्हणून प्रसिद्ध आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विविधतेने नटलेल्या भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळी संस्कृती, निरनिराळ्या प्रकारच्या वास्तू आणि त्यांची आगळ्यावेगळ्या पद्धतीची नावं असं सगळंच पाहायला मिळतं. ही भारतीय संस्कृतीची खासियतच आहे असं म्हणायला हवं. असंच एक भन्नाट नाव असणारी एक वास्तू राजस्थानातील अजमेर इथे उभी आहे.

अजयमेरू, हे राजस्थानचे पूर्व शासक अजयसिंह चौहाण यांच्या नावाने ओळखले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन, ते ठिकाण अजमेर नावाने ओळखले जाऊ लागले.

याच अजमेरमधील अजमेर शरीफ दर्ग्यापासून फक्त ५०० मीटर अंतरावर, तारागढ किल्ल्याच्या पायथ्याशी अजमेर शहरामध्ये एक ८०० वर्ष जुनी इमारत आहे जी पर्यटकांमध्ये एका विचित्र नावासाठी प्रसिद्ध आहे. या इमारतीला ‘अढ़ाई दिन का झोंपड़ा’ असं म्हटलं जातं.

 

dhai din ka jhonpra inmarathi

 

असं मानलं जातं की ही राजस्थानमधील सर्वात जुनी मशीद आहे.

===

हे ही वाचा – तब्बल ७ वेळा उध्वस्त होऊनही दिमाखात उभी असलेली आपली राजधानी

===

विचित्र नावामागचं रहस्य काय?

या मशिदीला हे असं वेगळं आणि काहीसं विचित्र वाटणारं नाव का पडलं असावं? नक्की काय कथा लपली आहे या नावामागे ते जाणून घेणं फारच रंजक आहे.

असं म्हणतात, की या मशिदीचे निर्माण कुतुबुद्दीन ऐबक द्वारा केलं गेलं. या ठिकाणी ‘सरस्वती कंठाभरण महाविद्यालय’ हे संस्कृत महाविद्यालय आणि विष्णु मंदिर अस्तित्वात होतं.

हिंदूंच्या या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी उध्वस्त करून, शिल्लक उरलेल्या अवशेषातून केवळ अडीच दिवसात या मशिदीची निर्मिती केली गेली.

 

dhai din ka jhonpra 1 inmarathi

 

महाविद्यालय का उध्वस्त केलं?

या विद्यालयाचे निर्माण विग्रहराज चतुर्थ उर्फ विशालदेव किंवा बीसलदेव याने केलं होतं. विशालदेव हा शकंभरी चहमाना वंशाचा राजा होता. आजही मशिदीच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला असलेल्या शीलालेखावर या विद्यालयाचं नाव दिसून येतं.

तसेच भिंतीवर विग्रहराज रचित हरकेली या नाटकातील काही प्रसंगांचे अंश मिळाले आहेत. हे विद्यालय सरस्वती देवीला अर्पित असून मुख्य मंदिरात देवीची मूर्तीदेखील होती.

११९२ मध्ये महमद घोरीने तराईच्या प्रदेशात पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला तेव्हा पृथ्वीराजची राजधानी तारागढ जिंकण्यासाठी तो या प्रदेशात आला होता.

येथील जनतेच्या मनात भय उत्पन्न व्हावे म्हणून त्याने आपला सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याला शहरातील सर्वात प्राचीन आणि सुंदर इमारत नष्ट करून त्या जागी मशीद उभी करण्याची आज्ञा दिली आणि त्यासाठी अवधी दिला अडीच दिवसांचा.

 

qutub uddin aibak inmarathi

===

हे ही वाचा – मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

===

नावामागच्या दंतकथा

ऐबकाने जुन्या मंदिराचा ढाचा तोच ठेवत काही बदल करून या मशिदीची निर्मिती केली. त्याला देण्यात आलेल्या अडीच दिवसांच्या कालावधीत त्याने या मशिदीची निर्मिती पूर्ण केली. यामुळेच या मशिदीचे नाव अढ़ाई दिन का झोंपड़ा असं पडलं असल्याचं मानलं जातं.

दुसरी एक मान्यता अशीही आहे, की इथे १८ व्या शतकापासून दरवर्षी अडीच दिवस चालणार्‍या उरूसामुळे या जागेचे नाव ‘अढ़ाई दिन का झोंपड़ा’ असं पडलं.

ख्वाजा मोईउद्दीन चिश्तीच्या दर्शनाला आलेले फकीर या मशिदीत मुक्कामाला असत. पण इतर राजस्थानी राजांनी या इमारतीकडे दुर्लक्ष केले.

मराठा सरदार दौलतराव सिंधीया यांनी मात्र मशिदीच्या केंद्रास्थांनावरील घुमट परत बनवला व तेथील अवशेष उचलून नेण्यास मज्जाव केला. याचा उल्लेख तेथील एका शिलालेखातही आहे. नंतर पुरातत्व खात्याला तेथे हिंदू मंदिराचे अनेक पुरावे व मौल्यवान वस्तु मिळाल्या. ज्या आज अजमेर येथील संग्रहालयात आहेत.

या मशिदीचे डिझाईन हेरात येथील अबु बक्र याने केले होते,जो घोरी बरोबर आला होता. इमारतीमध्ये एकूण ३४४ खांब असून आता केवळ ७० खांब योग्य स्थितीत आहेत.

 

dhai din ka jhonpra pillars inmarathi

 

चौकोनी आकाराच्या या इमारतीच्या प्रत्येक कोपर्‍यात एक बासरीच्या आकाराचा घुमट बांधलेला आहे. भारतीय शैलीतील १६ खांबांवर या इमारतीचे मुख्य छत उभारलं गेलं आहे.

संपूर्ण इमारत हिंदू स्थापत्य शैलीत बांधली गेली होती. जिची नंतर मोडतोड करून अर्धी मूल रूपात व उरलेली अर्धी अरबी-फारसी शैलीत बनवली गेली.. तीच इमारत आज इंडो- इस्लाम शैलीचे वारसा स्थल म्हणून घोषित केलेली आहे.

एका संस्कृत महाविद्यालयाचे रूपांतर मशिदीत होऊन ती अढ़ाई दिन का झोंपड़ा म्हणून ओळखली जाणे, हा केवळ काळाचाच महिमा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?