' फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच! – InMarathi

फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

“फिटनेस” गेल्या दशकात हा शब्द जास्त प्रचालीत झाला असून अनेक नवनवीन पद्धतींनी आपण आपलं शरीर निरोगी ठेवण्याचे प्रयत्न कारतो आहोत.

व्यायाम करणं, जेवणाचं पथ्य, आपलं रुटीन चेकअप सगळं अगदी मनापासून करतो. ह्यासाठी गरज पडली तर तज्ज्ञांची मदतही घेतो जिमला जातो, हार्ट बिट पासून आज किती खाल्लं, कसं खाल्लं, ह्या सगळ्यांचं निरीक्षण ते तज्ज्ञ करत असतात.

 

fitness inmarathi

 

काही जण घरच्या घरीच व्यायाम करून किंवा डायट करुन जमेल तसा प्रयत्न करत असतात. पण आपण नेमका जो प्रपंच चालवलाय तो किती यशस्वी होतोय, आपली प्रगती किती होतेय, याचं तर मोजमाप काही जवळ असायला हवं ना?

मग वजन यंत्र घरी येतं, बीपी, शुगर तपासण्याची यंत्र घरी येतात, आणि त्याच सोबत आज दिवसभर आपला हार्ट रेट कसा होता, आपण किती पाऊलं चाललो हे सगळं मोजण्यासाठी एक छोटासा फिटनेस बँड सुद्धा घरी येतो.

 

fitness band inmarathi

 

आजकाल व्यायाम सुरु करणाऱ्यांचा हा नियमच झालाय कि एक तरी फिटनेस बँड आपल्या हाताला लागलेला असावा. त्याचे अनेक फायदे देखील आहेत, पण शेवटी ती पण एक टेक्नॉलॉजीच  आहे. जितके फायदे आहेत त्या उलट थोडेफार का असे ना तोटे हि असतीलच ना?

===

हे ही वाचा तुम्ही सुदृढ ‘दिसता’ पण या १३ सवयी तुम्हाला आतून पूर्ण पोखरून काढतात!

===

आज आपण फिटनेस बँडचे कोणीही न सांगणारे तोटे पाहणार आहोत.

१) दिशाभूल होणे –

 

fit girl inmarathi

 

एका सामान्य व्यक्तीला दिवसाच्या इतर हालचालींव्यतिरिक्त १०००० पावलं चालण्याची गरज असते. हे चालणं बाहेर फिरायला जाऊन, व्यायाम करून सायकलिंग करून होणं अपेक्षित असतं.

घरातल्या घरात सुद्धा आपली हालचाल होते लोकेशन थोडंफार बदलतं त्यामुळे हे फिटनेस बँड आजच्या दिवसाचा फिरण्याचा कोटा पूर्ण झाल्याचं दर्शवतात आणि आपण निर्धास्त राहतो.

आपण आपल्या ध्येयाच्या थोडंदेखील जवळ आलेले नसतो पण मनाचं समाधान करून बसतो आणि आपली उगाच दिशाभूल होते.

२) चुकीचा कॅलरी काऊंट –

 

calaorie count inmarathi

 

फिट रहायचं असेल तर आपलं डायट सुद्धा त्यात एक महत्वाची भूमिका बाजावतं. त्यामुळे आपण दिवसभरात किती कॅलरीज घेतल्या याची नोंद करुन ठेवणं आवश्यक असतं.

आजकालच्या फिटनेस बँडमध्ये ते मोजून घेण्याची सोय असते. पण प्रॉब्लेम हा आहे की फिटनेस बँड एक यंत्र आहे, ते सॉफ्टवेअरवर चालतं. त्यामुळे त्याच्या डेव्हलपरने त्यात एका पोळीच्या जितक्या कॅलरीज टाकल्या असतील तितक्याच मोजल्या जातात.

पण वास्तवात फुलका, तेल लावलेली पोळी यांचे कॅलरी काऊंट्स वेगवेगळे असतात. असं इतरही पदार्थांच्या बाबतीत होतं. म्हणून या फिटनेस बँड्सवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही.

३) आनंद हिरावला जाणे –

 

no happiness inmarathi

 

अनेक फिटनेस बँड वापरणाऱ्या लोकांच्या निरीक्षणावरून असं समोर आलंय की आपल्याला हळू हळू या फिटनेस बँडची सवय होते आणि काही दिवसांनी आपण सोप्या मार्गाने आपल्या फिटनेस गोलकडे वाटचाल करण्याऐवजी आपण त्याचा धसका घेऊन बसतो व जेव्हा रिलॅक्स व्हायचं, आनंद लुटायचा त्या क्षणी ते करत नाही.

ज्यामुळे आपली चिडचिड सुरु होते आणि त्यामुळेच आपला आनंद हिरावला जातोय ही भावना मनात घर करून बसते.

४) अनावश्यक अतिरेक –

 

over exercion inmarathi

 

या फिटनेस बँड्समुळे अनेकांना व्यायामाचं ‘व्यसन’ लागल्याचं निदर्शनात आलंय. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकादायकच असतो.

अति व्यायाम केल्याने सुद्धा सांधेदुखी, स्नायूंना इजा होणे, हृदयावर अत्याधिक ताण येऊन हृदय कमजोर होणे अशा अनेक उलट प्रकिऱ्या घडू लागतात.

===

हे ही वाचा घरबसल्या व्यायाम कसा करावा हे सुचत नसेल तर या ८ टिप्स नक्की फॉलो करा

===

त्यामुळे फिटनेस बँड वापरत असाल तर त्यामुळे आपण कोणताही अतिरेक तर होत नाहीये ना ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

५) फिटनेस बँडवर संपूर्णपणे अवलंबून असणे –

 

fitness band use inmarathi

 

काही लोक फिटनेस बँडवर इतकी अवलंबून असतात, त्यांना त्यातील आकड्यांची मोजमापाची इतकी सवय झालेली असते की एखाद वेळेस ते फिटनेस बँड घरी राहीलं आणि ते बाहेर गावी गेलेले असले की त्यांना व्यायाम करणे शक्य होत नाही, आपल्या डाएटची काळजी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याचं सगळं रुटीन विस्कळीत होतं.

६) वेळ वाया घालवणे –

 

fitness band addiction inmarati

 

असंसुद्धा निदर्शनास आलंय की लोक हे फिटनेस बँड घालून जिमला जातात व तिथे पूर्ण लक्ष देऊन जीव ओतून व्यायाम करण्याऐवजी दर 10-15 मिनिटांनी या बँडकडे बघत बसतात.

आपण किती व्यायाम केला, आपल्या किती कॅलरीज जाळल्या, ह्यांकडेच त्यांचं लक्ष असतं. ज्यामुळे व्यायामाची लय तुटून जाते. हृदयाची वाढलेली गती मधेच कमी होते, ज्यामुळे त्या व्यायामाचा हवा तसा फायदा होत नाही.

७) ताण येणे –

 

fitness stress inmarathi

 

व्यायाम करताना एक सकारात्मक दृष्टिकोन हवा. आपल्याला कोणाशीही स्पर्धा करायची नसते हे लक्षात ठेवणंसुद्धा गरजेचं असतं. व्यायाम हसत खेळत केला जायला हवा. पण कधी कधी याच्या अगदी उलट होताना दिसून येतं,

आपला फिटनेस बँड आपल्याला जे टार्गेट देतो ते पूर्ण करण्याची एक वेगळीच जिद्द आपल्यात येते. शरीर नको म्हणत असतानाही आपण ओढून ताणून व्यायाम करतो. आणि त्याचाच नंतर आपल्याला ताण जाणवायला लागतो.

८) इतर धोके –

 

health experts inmarathi

 

कोणताही व्यायाम सुरु करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. आपल्याला कोणता रोग आहे का, हृदयविकार आहे का, ब्लडप्रेशर कसे आहे, शुगर किती आहे हे सगळे तपासून आपल्याला डायट आणि व्यायाम प्रकार सुचवले जातात.

आपण घरच्या घरी व्यायाम करतो आणि सगळं निरीक्षण करायला हे फिटनेस बँड वापरतो तेव्हा ते बँड हे कोणतेच विकार, शारीरिक तक्रारिंची नोंद घेत नाही, त्यामुळे योग्य सल्ला तर दूर पण आपण काहीतरी अगदी उलट करून मोकळे होतो.

जर फिटनेस बँड वापरत असाल तर पूर्णपणे त्याने दर्शविलेल्या अकड्यांवर, टार्गेट वर अवलंबून न राहता डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायाम करा. फिटनेस बँडची सवय लावून न घेता, हे यंत्र आपल्याला फक्त योग्य मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यक म्हणून आणलंय हे ध्यानात असू द्या.

===

हे ही वाचा करोनाच्या संकटात जीमवर अवलंबून राहण्यापेक्षा घरच्या घरी फिटनेस टिकविण्यासाठी हे व्यायामप्रकार करा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?