' मुलांच्या भविष्याची चिंता वाटतेय? बचतीचे हे मार्ग तुम्हाला नक्कीच चिंतामुक्त करतील… – InMarathi

मुलांच्या भविष्याची चिंता वाटतेय? बचतीचे हे मार्ग तुम्हाला नक्कीच चिंतामुक्त करतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचा २०२० चा महागाई निर्देशांक म्हणजेच “inflation index” ६.२ % इतका होता. महागाई निर्देशांक, दर वर्षी किती टक्क्यांनी महागाई वाढते आहे याचे एक निर्देशक असते. म्हणजेच आज जी वस्तू १०० रुपयांची आहे ती पुढच्या वर्षी किती रुपयांनी महागेल याचा अंदाज आपल्याला या निर्देशांकांवरून बांधता येतो.

भारतात एक मोठा गट मध्यमवर्गीयांचा आहे, ज्यांना वाढत्या महागाईचा मोठा फटका बसतो. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, औषधं, वैद्यकीय सेवा, हे सगळं तर महागतं आहेच, पण जसजसं राहणीमान बदललं आणि ‘lifestyle inflation index’ वाढत चाललाय, तसतसा आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा वाढतोय.

वाढत्या स्पर्धेमध्ये आपली मुलं मागे पडू नयेत म्हणून आणि एक स्टेटस सिम्बॉल म्हणून सुद्धा मुलांना high class शाळांमध्ये शिकायला घालायची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तो खर्च अवाढव्य वाढतो आहे. यामुळे इतर साध्या शाळांचे खर्च आणि फी सुद्धा वाढली.

आता मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल, तर मुलांना चांगल्याच शाळांमध्ये घालणं गरजेचं असतं. पण या चांगल्या शाळांमध्ये शिकवताना पालकांचे खिसे मात्र संबंध रिकामे होत आहेत.

 

education and money seesaw inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – उत्पन्न कमी असो वा अधिक: या ५ प्रकारे बचत केलीत तर आर्थिक स्थैर्य हमखास मिळेल!

===

पुढे उच्चशिक्षण चांगल्या कॉलेजमधून घ्यायचं असल्यास ते कर्ज काढतायत किंवा आपला रिटायरमेंटचे पैसे सुद्धा मुलांसाठी खर्च करतायत. पण हे सगळं करण्यापेक्षा आज आम्ही ज्या टिप्स सांगणार आहोत, त्यामुळे मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचं तुमचं टेन्शन बरंच कमी होईल आणि तुम्ही एक निर्धास्त जीवन जगू शकाल.

अशी करता येईल बचत

१. वेळेची किंमत

वेळेची किंमत ओळखा आणि जास्त वेळ न दवडता, सुरुवातीपासूनच, म्हणजे मुल होण्या आधीपासूनच बचत करून गुंतवणूक करणे सुरु करा.

म्हणजे तुम्हाला कमी पैशांची longterm SIP करून, निवेश रक्कम वाढवता येईल आणि मुलं कॉलेजात जाण्यापूर्वी तुमच्या हातात एक मोठी रक्कम तयार असेल.

 

sip investment inmarathi

 

२. गुंतवणूक करण्याचे योग्य पर्याय निवडा

mutual funds, शेयर्स, यांसारखे कमी जोखीम असणारे पर्याय आज उपलब्ध आहेत. अगदीच शून्य रिस्क असलेल्या पर्यायांमध्ये पैसे न गुंतवता या पर्यायांमध्ये पैसे गुंतवा. जितकी रिस्क जास्त तितके रिटर्न्स सुद्धा जास्त मिळू शकतात. त्यामुळे जास्त रिस्क किंवा अगदीच कमी रिस्क असलेले पर्याय टाळून, योग्य सल्ला घेऊन आणि अभ्यास करून मध्यम रिस्क असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा.

 

 

mutual-funds-inmarathi

 

चक्रवाढ म्हणजेच पैशाच्या कम्पाऊंडिंगचा फायदा घ्या आणि आपल्या पैशाला सुद्धा पैसे कमावू द्या.

३. वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवा

तुम्हाला आर्थिक संतुष्टी आणि सिक्युरिटी असावी म्हणून योग्य प्रमाणात म्युच्युअल फंडस्, शेयर मार्केट, फिक्स डिपॉजिट, सरकारी बॉण्ड्स अशा ठिकाणी थोडे थोडे पैसे गुंतवा.

४. गुंतवणुकीचे पुनरावलोकन

आपला ‘इन्व्हेस्टमेंट गोल’ काय आहे आणि आपण ज्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातून आपल्याला सध्या किती फायदा होतो आहे, आपलं लक्ष गाठण्यासारखे रिटर्न्स मिळतायत का? हे दर वर्षी तपासणे आवश्यक आहे.

शिक्षणाचा खर्च, हॉस्टेल इत्यादींचे खर्च दर वर्षी किती वाढतायत आणि आपली मुलं कॉलेजात जाईपर्यंत किती वाढलेले असतील याचा अभ्यास करा.

या वाढत्या खर्चात आणि आपण साठवत असलेल्या पैशात काही तफावत आढळून आली, तर आपल्याला आपली निवेश करण्याची रक्कम वाढवणे गरजेचे आहे का हे तपासा.

 

investment inmarathi

 

आपला पोर्टफोलिओ म्हणजेच आपण गुंतवणूक केलेले पर्याय योग्य रिटर्न्स देत नसतील तर आपण पर्याय बदलावे का याचा तज्ज्ञांकडून सल्ला घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

===

हे ही वाचा – म्युच्युअल फंड ठरू शकतो बचतीचा उत्तम पर्याय! कसा ते जाणून घ्या…

===

मुलांचाही सहभाग गरजेचा

मुलं सुद्धा या बचतीचा, गुंतवणुकीचा खूप महत्त्वाचा घटक आहेत. मोठं झाल्यावर त्यांनी उथळपट्टी करू नये, हट्टीपणा करून तुमचं बजेट बिघडेल असं वागू नये यासाठी तुम्हाला लहानपणापासूनच त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागेल.

हसत खेळत आणि आनंदी वातावरण ठेऊन मुलांना पैशांबद्दलचं महत्त्व पटवून द्यावं लागेल. बचतीसाठी जागरूक करावं लागेल.

खालील टिप्स वापरून तुम्ही ते नक्कीच करू शकता.

१. मुलांना बचत करायला शिकवा

आवश्यकता आणि आवड यांतला फरक आपल्या मुलांना समजावून सांगा. ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्याच वस्तूंवर मुलांना पैसे खर्च करायला शिकवा. सरळ नकार देण्यापेक्षा, अनावश्यक वस्तूंवरील खर्च कसे टाळावे आणि त्या वस्तूंची आपल्याला का गरज नाही हे त्यांना समजावून सांगा.

वाचलेले पैसे आपण कोणत्या महत्त्वाच्या कामात वापरू शकतो हे सांगा. याने मुलांना बचतीचं महत्व पटेल आणि आपण सुद्धा बचत करावी ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल.

 

piggy bank inmarathi

 

२. मुलांना खर्चाची नोंद ठेवायला शिकवा

या टीपची तर बऱ्याच मोठ्यांना सुद्धा गरज आहे. आपल्याकडे पैसे किती आहेत आणि आपण काय काय खर्च करून, शेवटी आपल्या पाशी किती पैसे उरतात याचा पत्ताच अनेकांना नसतो. त्यामुळे गुंतवणूक तर दूर, पगारातून बचतही होत नाही.

 

savings inmarathi featured

 

त्यासाठी सगळ्यांनीच आपल्या खर्चाची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना सुद्धा ही सवय लावा. त्यांना पॉकेटमनी दिला की ते पैसे त्यांनी कुठे खर्च केले ते लिहून ठेवायला सांगा. यामुळे आपण मिळवतो किती आणि आपले खर्च किती आहेत याची जाणीव आपल्याला होते. मुलांमध्येही समजूतदारपणा येतो.

३. बचतीचे ध्येय

आपल्या मुलांना दर आठवड्याला किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम तुमच्या पाशी जमा राहिली पाहिजे असे एक सेव्हिंग गोल द्या.

खर्च कसे, कुठे कमी करायचे, काय घ्यायचे काय नको, पुढच्या वेळी काय घ्यायचे हे सगळे मुलांनाच ठरवू द्या. याने मुलांचा सेविंग सेन्स वाढेल आणि त्यांना आवश्यक व अनावश्यक खर्चातील फरक आपोआप कळेल.

 

piggy bank inmarathi

 

४. उदाहरण बना

मुलं भरपूर निरीक्षण करत असतात. तुम्ही जसे वागाल ती सुद्धा तशीच वागतील. त्यामुळे जर मुलांना बचत शिकवायची असेल, सय्यम आणि काटकसर शिकवायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला ते सगळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे आधी स्वतःला चांगल्या सवयी लावा आणि मुलांपूढे उत्तम आदर्श ठेवा. बचतीची सवय त्यांना आपोआप लागेल.

आपली बचत करताना, फायनान्शियल गोल पूर्ण करताना आपल्या परिवाराला सुद्धा त्यात सहभागी कारण तितकंच आवश्यक आहे. सगळ्यांनी मिळून केलं की सगळं शक्य असतं.

 

investments inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – खिशात पैसे टिकत नाहीत? या ‘हमखास’ यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?