' या वेबसाईट्स आणि अँप्सने मिळते लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती – InMarathi

या वेबसाईट्स आणि अँप्सने मिळते लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. असंख्य लोकांना कोरोनाची लागण होत असून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोरोनातून वाचण्यासाठी आपल्याकडे लस हे एकच शस्त्र उपलब्ध आहे.

नुकतेच सरकारने १८-४५ वयोगातील नागरिकांना देखील लसीकरण सुरु केले आहे. त्यासाठी नोंदी करणे आणि आपला स्लॉट आणि ठिकाण निवडणे आवश्यक आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे या आवश्यक गोष्टींना मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहे.

हे ही वाचा : कोरोनाची दुसरी लस घेण्यास उशीर झाला तर? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

 

covid vaccine inmarathi

 

या समस्यांवर मार्ग म्हणून काही विशेषज्ञांनी कोविनसोबतच इतर काही अँप आणि वेबसाइट्स उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यावर देखील लसींची उपलब्धता, वेळ आणि ठिकाण आपण नोंदवू शकणार आहोत. पाहूया या अँप आणि वेबसाइटची नावे.

 

पेटीएम व्हॅक्सिन स्लॉट फाउंडर :

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमने COVID-19 Paytm Vaccine Finder तयार केले आहे. यात इनबिल्ट असणाऱ्या मिनी अँप स्टोअरमध्ये लशीच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळू शकते. Paytm App मध्ये Mini App Store मध्ये जाऊन, व्हॅक्सिन फायंडर सिलेक्ट करा. आता तिथे तुमचा पिनकोड/जिल्ह्याचे नाव टाका. त्यानंतर १८ ते ४५ हा वयोगट निवडून लशीची उपलब्धता पाहू शकता.

जर लस उपलब्ध नसेल तर notify me when slots are available हा पर्याय निवडा. यामुळे तुम्हाला लस उपलब्ध झाल्यानंतर पेटीएमकडून अलर्ट मिळेल.

 

 

paytm inmarathi

 

हेल्दीफायमी – व्हॅक्सिनेटमी :

हेल्दीफायमी या फिटनेस अ‍ॅपने VaccinateMe हे सुरु केले आहे. पिनकोड/जिल्ह्याचे नाव टाकून या अँपवर सुद्धा नागरिक लसीच्या उपलब्धतेबाबत आणि स्लॉटबाबत माहिती मिळवू शकता. जर स्लॉट उपलब्ध नसल्यास जेव्हा स्लॉट उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला SMS, email, आणि WhatsApp च्या माध्यमातून अलर्ट दिला जाईल. यामध्ये वय, लस आणि इतर फिल्टर वापरता येतील.

 

व्हॅक्सिनेटमी inmarathi

 

 

गेटजाबडॉटइन (Getjab.in) :

१८-४५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी कुठे लस उपलब्ध आहे याची माहिती युजरला ईमेल द्वारे पाठविली जाते. आयएसबीचे माजी विद्यार्थी श्याम सुंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वेबसाईट विकसित केली असून, यावर नाव, ईमेल, ठिकाणआणि पर्यायी फोन नंबर ही माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती कोणालाही दिली जात नाही किंवा विकली देखील जात नाही, याची हमी त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा : ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा

 

getjb inmarathi

 

अंडर 45 डॉट इन (Under45.in) :

या वेबसाईटवर फक्त राज्य आणि जिल्ह्याचीच माहिती देणे आवश्यक आहे. यात नाव, पत्ता असा इतर वैयक्तिक तपशील द्यावा लागत नाही. यात सर्चवर आधारित लस उपलब्धतेची माहिती दिली जाते. बर्टी थॉमस यांनी ही वेबसाईट तयार केली असून ट्विटर अकाउंटवर ते लिंक्स शेअर करत असतात.

 

getjab in inmarathi

 

 

फाईंड स्लॉट डॉट इन (FindSlot.in) :

लसीकरण केंद्र कुठे कुठे आहेत हे शोधण्यास उपयोगी ठरणारी वेबसाइट म्हणजे, फाईंडस्लॉट डॉट इन. कोविन प्रमाणेच, ही वेबसाईट युजरना स्वतंत्रपणे विविध पिन कोड टाकून उपलब्धता बघण्याची सुविधा देत आहे. काही साइट्स अविश्वसनीय असू शकतात, कारण केंद्रं किंवा स्लॉट उपलब्ध असूनही त्या ते दर्शवत नाहीत. मात्र वास्तविक वेळेनुसार उपलब्धता बदलत असते म्हणून असा बदल दिसतो.

ही साइटवर काम करताना काही अडचण आल्यास युजर्स वेबसाईट तयार करणारे शुभेंदू शर्मा आणि जेरोझ यांच्याशी ट्विटरवर संपर्क सुद्धा साधू शकतात.

 

find slot in inmarathi

 

 

WhatsApp MyGov कोरोना हेल्पडेस्क :

WhatsApp MyGov Corona Helpdesk चॅटबॉटच्या साहाय्याने लशींबाबत आणि लसीकरण केंद्राबाबत माहिती मिळू शकते. याकरता तुम्हाला 9013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. तुम्ही या चॅटबॉटचा वापर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या साहाय्याने wa.me/919013151515 यावर क्लिक करून देखील करु शकता.

चॅटबॉट हेल्पडेस्क उघडल्यानंतर युजरना hello असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर एक ऑटोमेटेड रिप्लाय येईल, त्यानंतर तुम्हाला कोव्हिड संबंधित समस्येचा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही ही माहिती हिंदीमध्ये देखील मिळवू शकता.

 

 

whats gov in inmarathi

हे ही वाचा :  कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?