' केवळ एक ‘लाकडाची बादली’ पळवली आणि चक्क गहजब झाला…! – InMarathi

केवळ एक ‘लाकडाची बादली’ पळवली आणि चक्क गहजब झाला…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजवरच्या इतिहासात तुम्ही अनेक कारणांसाठी झालेली युध्दं पाहिली असतील. सत्ता, राज्य, पैसा, सूड यासाठी जगातली बहुतेक युध्दं लढली गेली असली तरीही एक युध्द असं आहे जे एका भलत्याच कारणामुळे झालं ज्याचा तुम्ही अंदाजदेखील लावू शकत नाही.

एक असं युध्द ज्यानं इटलीचा इतिहास बदलला. १४ व्या शतकात, ही मध्यमयुगीन लढाई मॉडेना आणि बोलोग्ना दरम्यान झाली ज्यात हजारोंचे प्राण गेले. ही लढाई सर्वात दीर्घ काळ लढली गेलेली मध्ययुगीन लढाई ठरली.

तीन शतकापर्यंत ही आग धगधगती राहिली. युरोपला युध्दं नविन नसली तरीही या युध्दासाठी जे निमित्त झालं ते मात्र चमत्कारीक होतं.

 

battle inmarathi

===

हे ही वाचा ‘दारूच्या’ नशेत केली घोडचूक, हा दारुण पराभव कसा काय झाला, जाणून घ्या…

===

हे युध्द छेडलं आणि त्याला निमित्त ठरली एक ओक लाकडापासून बनविलेली बादली. हे युध्द नेमकं काय होतं यासाठी आपल्याला मध्यमयुगीन इटलीत जावं लागेल.

व्हेटिकन सिटीचे पोप आणि पवित्र रोमन राज्यकर्ते यांच्यात हे सत्तेसाठी हे युध्द तब्बल तीन शतकं चाललं. वर उल्लेखलेली लढाईसुद्धा याच संघर्षाचा एक भाग होती. त्याकाळात इटली दोन राजकीय गटात विभागली गेली होती.

पवित्र रोमन राज्यकर्ते आणि पोप या दोन गटात विभागलेल्या इटलीमधलं बोलोग्ना हे शहर पोपना समर्थन देणारं होतं या समर्थकांना ग्वेल्फ  म्हणलं गेलं, तर प्रतिस्पर्धी शहर मॉडेनाचं राकर्त्यांना समर्थन होतं, या समर्थकांना गिबिलाईंज म्हणलं गेलं. या दोन शहरांचा सीमेवरून वाद चालूच होता.

एखाद्या फ़ूटबॉलच्या सामन्याप्रमाणे या दोन राज्यात सतत हल्ले आणि प्रतिहल्ले होत होते. अशातच झाली ऐतिहासिक अशी बादलीची लढाई. हे काही टोपण नाव नाही, तर खरोखरच एका लाकडी बादलीपायी युध्द केलं गेलं.

११७६ मध्ये झालेल्या लग्नानानोच्या लढाईत पवित्र रोमन राज्यकर्ता फ्रेडरिकला पोप अलेक्झांडर द्वितियच्या लोम्बार्ड लिगकडून हार पत्करावी लागली होती. इथूनच या दोन्हीतल्या संघर्षाची ठिणगी पडली.

जर्मनीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट फ़्रेडरिक बार्बरोसा यानं ऑक्टोबर ११४४ मधे इटलीवर हल्ला केला आणि या सगळ्याची सुरवात झाली. त्यानं हा हल्ला करण्यामागचं कारण होतं, त्याचा असा ठाम समज होता की, तो पृथ्वीवरचा देवांनी निवडलेला त्यांचा प्रतिनिधी होता. मात्र याच्याशी इटालियन लोक सहमत नव्हते.

 

fredrick barbarosa inmarathi

 

पहिल्या पवित्र रोमन सम्राटपदाच्या मुकुटाचा मानकरी अकरावा पोप जॉन होता. पोपनी ख्रिश्चन राज्यकर्त्यांना अध्यात्मिक वैधता दिल्यानं त्यांच्याकडे खिस्ती धर्म जगताचे खरे नेते म्हणून पाहिलं गेलं.

फ्रेडरिकने मिलान, टॉरटोना आणि पाविया ही ईटालियन शहरं ताब्यात घेऊन तो तिथला राजा बनला. त्यानंतर रोममधे जाण्यापूर्वी तो बोलोग्ना आणि ट्स्कनीला काबिज केलं. याठिकाणी त्यानं पोप अलेक्झांडर तिसरा याच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतून काहीच निष्पन्न होऊ शकलं नाही.

बोलोग्ना हे पोप समर्थक होता तर मॉडेना फ़्रेडरिक समर्थक. असं सांगितलं जातं की मॉडेनाचे काही सैनिक बोलोग्नामधे घुसले.

शहरात त्यांनी लुटमारीचा धुमाकूळ घातला आणि परत येताना शहराच्या मध्यवर्ती विहीरत असणारी ओक लाकडापासून बनविलेली बादलीही उचलून घेऊन आले.

===

हे ही वाचा कुत्र्यावरून युद्ध? कल्पनाविलास वाटेल, पण हा आहे अक्षरशः खरा इतिहास…! वाचाच

===

ही काही नवी गोष्ट नव्हती. कारण परस्पर शहरात असे हल्ले नेहमी होत होते आणि या हल्ल्यात लूटमारही नित्याची होती. मात्र असं सांगितलं जातं की बोलोग्नाच्या सैनिकांनी मॉडेनावर हल्ला करून ज्या चीजवस्तू चोरल्या होत्या त्या याच बादलीत ठेवल्या होत्या.

 

bucket war 2 inmarathi

 

आता जेंव्हा बोलोग्नानं हल्ला केला तेंव्हा त्यांनी शहराच्या मधोमध ठेवलेली ही बादलीच उचलून नेली. बोलोग्नाच्या सैनिकांना हा त्यांचा केलेला उघड अपमान वाटला. त्यांनी ही बादली परत करण्याची मागणि केली मात्र प्रतिस्पर्धी शहरानं ही मागणी फेटाळून लावली. यानंतर या दोन्ही शहरांदरम्यान ऐलान-ए-जंग छेडलं गेलं.

बालोग्नानं मॉडेनाच्या जवळ असणार्‍या जॅपोलिनोत त्यांचं प्रचंड सैन्य गोळा केलं. यात तीस हजार पायदळ आणि दोन हजार घोडेस्वार यांचा समावेश होता. मॉडेनाजवळ पाच हजार पायदळ आणि दोन हजार घोडेस्वार यांची छोटी सेना होती.

बोलोग्नाच्या सैन्यासमोर मॉडेनाचं सैन्य अगदीच किरकोळ असलं तरीही ते समोरच्या प्रचंड सैन्याला भारी पडलं आणि त्यांनी बाल्ग्नाच्या सैन्याला पळवून लावलं. मात्र या युध्दादरम्यान दोन्हीकडचे मिळून दोन हजार सैनिक मारले गेले.

यानंतर मात्र या दोन्ही शहरादरम्यान युध्दबंदीचा तह झाला. या तहानुसार मॉडेनानं हल्ल्यात लुटलेलं सगळं सामान परत केलं मात्र ही लाकडी बादली परत करायला नकार दिला.

 

bucket inmarathi

 

ज्या बादलीमुळे युध्द झालं ती बादली परत केली गेलीच नाही. या बादलीची प्रतिकृती आजही मॉडेनाच्या टाऊन हॉलमधे ठेवलेली आहे.

===

हे ही वाचा इंग्रजांच्या विरुद्ध झालेल्या लढाईत आपल्याच सैन्याच्या फितुरीमुळे आपण हरलो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?