' घरात AC नसला तरी हरकत नाही या पद्धतीने ठेवा घराला कूल कूल – InMarathi

घरात AC नसला तरी हरकत नाही या पद्धतीने ठेवा घराला कूल कूल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उन्हाळा सुरू झाला की गरमीमुळे अंगाची अगदी लाही-लाही होते.फॅन लावा ,एसी लावा काहीही लावा गरमी मात्र काही केल्या कमी होत नाही. दिवसभर आपण एसीच्या हवेत देखील बसू शकत नाही.

पूर्वीच्या काळी मातीची घरे असायची. झोपड्या अजून देखील आहेत. झोपड्यांत प्रचंड थंड वाटते कारण ते नारळाच्या आणि इतर फांद्या पासून बनविलेले असते. पण आता सिमेंटची घरे आणि आजबाजूला देखील सीमेंटची जंगले उभी राहिली आहेट, त्यामुळे आपल्याला  प्रचंड गरम होते. पण आजच्या लेखात आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत.ज्यामध्ये तुम्ही एसी न लावता देखील तुम्हाला या टिप्सने थंडावा मिळू शकतो.

 

empire-state-building-marathipizza

 

तुमच्या खोलीच्या आणि घराच्या खिडक्या उघड्या ठेवा –

खिडक्या हा वास्तु शास्त्रातील सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक खोलीला किमान एक तरी खिडकी असायला हवी.अनेकांना खिडक्या उघड्या ठेवायला अजिबात आवडत नाही.ते लोक सतत खिडक्या सतत बंद ठेवतात.पण जर उन्हाळ्यात तुम्ही खिडक्या उघड्या ठेवल्या तर तुमच्या घरातील हवा खेळती राहील.त्यामुळे तुम्हाला अधिक गरम देखील होणार नाही.

 

house inmarathi

 

घरातील खिडक्या शक्यतो समोरा समोर असाव्या त्यामुळे हवा अधिक उत्तमपणे खेळती राहते. शक्यतो तुम्ही तुमच्या खिडकीला पडदे लावा. त्यामुळे उन्हाची किरणे थेट तुमच्या घरात येणार नाहीत.  त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या आणि पडदे लावले तर तुम्हाला हवेच्या चांगल्या झुळूक येतील. जेव्हा खिडकी उघडी असून देखील वरुन जेव्हा पडदे लावलेले असतात तेव्हा,तुम्हाला नक्कीच नैसर्गिक हवा मिळते.

 

वाळ्याचे पडदे वापरा – 

उन्हाळयात घरात थंडावा निर्माण करण्यासाठी वाळ्याचे पडदे वापरा विदर्भात शक्यतो असे पडदे वापरतात. या पडद्यावर पाणी शिंपडा आणि हे पडदे खिडकीला लावा.

 

house 2 inmarathi

हे ही वाचा – उन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा!

जेव्हा खिडकीतून हवा येईल तेव्हा तुम्हाला पाणी शिंपडलेले असेल त्यामुळे थंड हवा येईल. जर वाळ्याचे पडदे शक्य नसतील तर तुम्ही टॉवेल किंवा चादर देखील ओली करू खिडकीच्या तेथे लावू शकता.त्यामुळे देखील घरात थंडावा निर्माण होईल.

इतर खोल्यांचे दरवाजे बंद करा- ज्या खोल्यांनामध्ये कोणी थांबलेलं नसेल किंवा ज्या खोल्या वापरतात नाही. अशा खोल्यानचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवा.त्यामुळे उन्हाचे किरणे तेथे जाणारा नाहीत. तसेच जितक्या जास्त खिडक्या आणि दरवाजे उघडे असतात, तितक्या जास्त उन्हाच्या झळ्या आत येतील.

 

बर्फाचा वापर –

बर्फाचा स्मार्ट वापर तुम्ही करू शकता. कटोराभर बर्फ वापरुन तुम्ही तुमचे संपूर्ण घर एसी प्रमाणे थंड करू शकता.यासाठी तुम्हाला टेबल फॅन लागणार आहे. एका कटोऱ्यात बर्फ घ्या आणि तो कटोरा फॅन समोर ठेवा. त्यानंतर तुम्ही जेव्हा फॅन सुरू कराल तेव्हा त्या बर्फाच्या पाण्याचे तुषार कण सर्वत्र उडतील आणि तुम्हाला थंड हवा लागेल.यामुळे सर्व घरात थंडावा निर्माण होतो. तसेच झोपण्यापूर्वी जर तुम्ही फरशी थंड पाण्याने पुसली तरी देखील तुमचे घर तुम्हाला थंड वाटेल.

 

ice-water-inmarathi

 

जर तुमचे एक मजली घर असेल किंवा बंगला असेल तर तुम्ही तुमच्या टेरेसवर संध्याकाळी पाणी मारले तर तुम्हाला खाली घरात थंड वाटू शकते.अनेकजण असेच करतात.

पाणी टाकल्यामुळे उष्णता कमी होते.सीमेंट देखील थंड होते.तसेच अनेकजण टेरेसला रंग देखील देतात. पांढरा रंग देतात.पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही.त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या टेरेसला पांढरा रंग देऊ शकता.पांढरा रंग दिल्यामुळे तुम्हाला खाली उष्णता जाणवणार नाही.

 

उन्हाळ्यात फिकट रंगाचे कपडे वापरा –

घरातील खिडक्यांचे पडदे,  बेडशीट सोफा कव्हर हे उन्हाळ्यात शक्यतो पॉलिस्टर किंवा सॅटीनचे असू नयेत. असे असल्यास ते बदला.शक्यतो कॉटनचे कापड असलेले पडदे आणि इतर गोष्टी वापराव्यात त्यामुळे गरम होत नाही. तसेच हे सर्व शक्यतो लाईट म्हणजेच फिक्या रंगात  असावेत कारण गडद रंग अधिक उष्णता शोषून घेतात.

 

 

फिकट रंग उष्णता परवर्तित करतात. पिवळा, हिरवा, निळा अशा फिकट रंगांचे पडदे उन्हाळ्यात घरात लावल्यामुळे घरांचं सौंदर्यही खुलून दिसतं.आपण स्वता देखील फिकट किंवा पांढऱ्या रंगांचे कपडे घालायला हवेत. त्यामुळे आपल्याला देखील गरम होत नाही.

रंग आणि ऋतु यांचा फार वेगळा संबंध आहे.ऋतु प्रमाणे आपण रंग वापरायला हवेत.

बल्ब आणि ट्यूब लाईट –

घरात हाय व्होल्टेज बल्ब आणि ट्युब लाईटचा वापर आपण टाळायला हवा. सतत बल्ब चालू ठेवल्यास त्यातून उष्णता बाहेर पडते.

 

 

झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी बल्ब आणि ट्यूब बंद ठेवा. म्हणजे रात्री झोपताना थंडावा राहील.सध्या बाजारात सीएफल,एलईडी बल्ब आणि ट्यूब लाईट्स मिळतात ते जास्त उष्णता देत नाहीत.

 

इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करा –

अनेकदा आपल्या घरांमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू असतात.जसं की टीव्ही कम्प्युटर इतर उपकरणे. जर गरज नसेल तर लगेच बंद करा. त्यातून देखील उष्णता मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जाते.

 

house tv inmarathi

 

झाडे लावा –

घरात थंडावा निर्माण करणसाठी आणि शुद्ध ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी झाडे लावा.झाडे तुम्हाला 24 तास थंड हवा देतील.झाडे लावण्याचे फक्त फायदेच-फायदे आहेत.त्यांचे तोटे कोणतेच नाहीत.त्यामुळे झाडे लावा,झाडे जगवा.

 

tree inmarathi

 

उन्हाळ्यात रात्री हवेत एक वेगळा गारवा असतो. जर तुम्हाला एसी वापरायचाच नसेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या रूमच्या सर्व खिडक्या उघडा. त्यामुळे तुमच्या रूम मध्ये हवा खेळू लागेल.बरीच हीट देखील कमी होईल.

हीट जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्ही आरामात एसी न लावता देखील झोपू शकता. जर तुमच्या खोलीच्या खिडक्या मोठ्या असतील तर तुम्हाला फॅन देखील लावण्याची गरज पडणार नाही.

तुम्ही इतक्या आरामात झोपू शकता. शक्यतो ५ ते ८ या वेळेत तुमच्या घराच्या किंवा तुम्ही जेथे झोपणार आहात त्या खोलीच्या खिडक्या उघड्या करा. त्यातून हवा येईल. ५ ते ८ ही सर्वात उत्तम वेळ आहे.

ओव्हन,तंदूर वापरू नका –

उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही जेवण बनविता तेव्हा ही उपकरणे कमी वापरा कारण यामधून मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते.
त्यामुळे देखील तुमच्या घरातील उष्णता वाढेल. त्यामुळे ही उपकरणे देखील कमी वापरा.

 

oven inmarathi

 

 

पसारा कमी करा –

अनेकदा आपल्या घरांमध्ये न लागणाऱ्या गोष्टी खूप असतात. जसे की रद्दी आणि काही टाकवू सामान ते देखील तुम्ही कमी करा. तुमचे घर जितके मोकळे असेल तितकी हवा खेळती राहील.त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही जेथे जास्त वेळ घालवणार आहात तेथील न लागणाऱ्या गोष्टी काढून टाका.जास्तीत जास्त मोकळी जागा निर्माण करा.त्यामुळे हवा खेळती राहील.

 

house 4 inmarathi

हे ही वाचा – वाढत्या उन्हाळ्यात हिट स्ट्रोकचा त्रास टाळायचा असेल तर बनवा चविष्ट बदाम शेक

इजिफ्तमध्ये तर लोक झोपताना ते अंगावर थंड पांघरून घेऊन झोपतात. तुम्ही देखील एखादे सूती ओढण पाण्यात भिजवून अंगावर घेऊ शकता.यामुळे तुम्हाला लवकर झोप लागेल. तसेच तुम्हाला बरे देखील वाटेल.त्यामुळे तुम्ही ही पद्धत देखील वापरू शकतो.

तुम्ही जर टेरेसवर झोपायला जाण्याचा विचार करत असाल तर चार-पाच वाजण्याच्या दरम्यान तुम्ही तुमच्या टेरेसवर पाणी मारा,त्यामुळे तेथीलउष्णता निघून जाईल.तसेच धूळ देखील निघून जाईल.

आजकाल बाजारात उष्णता कमी करणारे पेपर देखील मिळतात. तुम्ही ते देखील वापरू शकता त्याला हीट रीड्यूस फिल्म म्हणतात. यामुळे हीट मोठ्या प्रमाणात कमी होते.ते लावायला देखील खूप सोप्पे असतात.वापरुन झाल्या नंतर तुम्ही त्या काढून टाकू शकतात. हे देखील तुम्ही करून पाहू शकता.

या सर्व झाल्या उष्णता कमी करण्यासाठी काही गोष्टी.या बरोबरच तुम्ही ताजी फळे खा, भरपूर पाणी प्या यामुळे तुम्हाला बराच फरक पडू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?