' प्राचीन खांबांमधून येणारा गूढ ध्वनी शास्त्रज्ञांना आजही बुचकळ्यात टाकतो – InMarathi

प्राचीन खांबांमधून येणारा गूढ ध्वनी शास्त्रज्ञांना आजही बुचकळ्यात टाकतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही वास्तूला कोसळून न जाता तटस्थ टिकून राहण्यास आधार देतात ते खांब. खांब भरभक्कम असतील तर मजबूत आधार दिला जातो. आधार द्यायचा असेल तर खांब तर जमिनीतच घट्ट रोवलेले असायलाच हवे, कारण ज्यावर मोठी इमारत उभी राहणार असते ते खांब इमारतीचे वजन जमिनीवर सामान प्रमाणात वाटत असतात.

पण जर तुम्हाला सांगितलं की एका मोठाल्या दगडात कोरलेल्या एका मंदिराचा खांब जमिनीपासून अर्धा इंच किंवा त्याहून कमी अंतराने जमिनीपासून लांब आहे, लटकतो आहे, जमिनीला अजिबात टेकलेला नाही! तर तुमचा विश्वास बसेल काय? नाही ना? पण हे खरं आहे.

 

lepkashi 4 inmarathi

 

स्थापत्य शास्त्रात आणि अभियांत्रिकी शास्त्रात एक अत्यंत महत्वाची मानली जाणारी हि वास्तू आहे आंध्रप्रदेशात. जिला लेपक्षी मंदिर किंवा वीरभद्र मंदिर म्हणूनही ओळखले जाते. ज्याचे मोठाले इंजिनियर आणि आर्किटेक्टसहि परीक्षण करून दमले.

हे मंदिर आंध्रप्रदेशातील कुमारशैलम् नामक खडतर टेकडीवर कोरुन निर्माण केले आहे. पुराणानुसार ह्या मंदिराची निर्मिती समुद्र पियून टाकणाऱ्या अगस्त्य ऋषींनी केली होती. या मंदिराचे रामायणातही उल्लेख आढळतात.

असे म्हणतात, सीता हरणाच्या वेळी सीतेला वाचवताना जटायू इथेच जखमी होऊन पडले होते. व रामाशी भेट झाल्यावर रामाने त्यांना “ले पक्षी” म्हणजे “हे पक्षी जटायू पुन्हा उठा” अशी साद घातली होती. म्हणून ह्या मंदिराचे नाव “लेपक्षी” मंदिर पडले.

इथे मंदिराबाहेर अनेक सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतात. श्री गणेश, वीरभद्र, शंकर भगवान, भद्रकाली, शंकर पर्वती विवाहसोहळ्याच्या प्रतिमा, शिल्प, कोरीव अशा अनेक अत्यंत सुंदर कलाकृतींचे दर्शन आपल्याला तिथे होते.

या मंदिराच्या कालाकृतींवर विजयनगर साम्राज्याची छाप पडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे त्याकाळात वीरण्णा आणि विरप्पण्णा ह्या दोन भावांनी हे वीरभद्र मंदिर बांधले असेल असे सुद्धा काही गावकरी सांगतात.

 

lepkashi 2 inmarathi

हे ही वाचा – नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

विजयनगर साम्राज्यात कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जाई त्यामुळे पुरातत्व इतिहासकारांनी हे मंदिर फार पूर्वी बांधलेले नसून 1583 साली म्हणजेच 16व्या शतकात विजयनगर राज्य वसले त्या वेळी बांधेलेगेले असू शकते अशी संभाव्यता वर्तवली आहे. .

पण ह्या मंदिराचं मुख्य आकर्षण येथील खांब आहेत. हे सगळेच ह्या मंदिरात एकूण 70 खांब आहेत, ज्यांपैकी 69 खांब हे मंदिराच्या छप्पराला आधार देतात तर एका कोपऱ्यात एक जमिनीला न टेकत असलेला खांब आहे. ह्या खांबाचे वैशिष्ट्य असे की ह्या खांबाच्या खालून एखादं वस्त्र, पेपर अलगद, न अडकता निघू शकतो.

अनेक इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स ह्या अभूतपूर्व कलाकृतींना अभ्यासण्यासाठी येथे येतात. अनेकांनी ह्या खांबात व जमिनीत असलेल्या फटीला बुजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झालं नाही. शेवटी थकून त्यांनी नाद सोडून दिला.

आजही जगभरातून अनेक संशोधक, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, वास्तुशात्राचे अभ्यासक, पर्यटक येथे हजेरी लावतात व इथल्या कलाकृतींवर व त्याकाळातील कलाकारांनी इतक्या अद्भुत वास्तूंची निर्मिती कशी करत असतील ह्यावर अवाक होऊन विचार करताना व चिकित्सा व्यक्त करताना आढळतात.

 

lepakshi 1 inmarathi

 

ह्या सगळ्याच खांबांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ह्या सगळ्यांना वाजवून पाहिल्यास त्यांतून विशिष्ट मधुर ध्वनी सुद्धा ऐकू येतात. हे पण एक मुख्य पर्यटकांचं आकर्षण आहे. ह्याशिवाय अनेक वेगवेगळी दालने आहेत त्यातील मुख्य आहे शंकर पार्वतीचा लग्न मंडप.

ह्या मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या भिंतीत दोन लाल खाचे आपल्याला दिसतात. ते कलाकृतीचा भाग दिसत नाही त्यामुळे हे नेमके कशामुळे निर्माण झाले ही विचारणा करता तिथल्या एका लोककथेनुसार, मंदिर बांधणाऱ्या त्या दोन भावंडांपैकी एक असलेला विरुपण्णा हा विजयनगर दरबारतील एक शाही खजिनदार होता.

आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन त्याने मंदिरनिर्मिती साठी मान्यकेल्या गेलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मंदिरासाठी, राजाच्या परवानगी शिवाय काढणे सुरु केले. ज्यामुळे राजाचा ताळेबंद करताना तफावत निर्माण झाली व राजाचा कोप झाला. ज्यामुळे संतापून विरुपण्णाने आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. भिंतीवरचे हे डाग त्याच्याच रक्ताचे डाग असावे व ते खाचे त्याचमुळे पडले असावे, असे गावकरी म्हणतात.

 

lepkashi 3 inmarathi

हे ही वाचा – काही मंदिरांमध्ये आहे नैवेद्याची विचित्र पद्धत कुठे नूडल्स तर कुठे चक्क…

ह्या मंदिरामुळे पुढे इथे अनेक लोक वास्तव्यास आले व इथेच स्थायिक झाले. मंदिरामुळे ह्या छोट्याशा खेड्याचे नाव सुद्धा लेपक्षी ठेवण्यात आले. हे मंदिर अनंतपुर जिहल्यात आहे. हैद्राबाद पासून 480 किलोमीटर तर बँगलोर पासून 130 किलोमीटर अंतरावर आहे.

ह्या दोन्ही शहरांपासून तिथे पोहोचण्यास अनेक साधनं उपलब्ध आहेत ज्यात प्रायव्हेट टॅक्सी, सरकारी बस ह्यांचा सुद्धा समावेश आहे. अनंतपुर जिल्ह्यापासून सुद्धा मंदिरात जाण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहे.

मंदिराच्या आसपासच्या गावांमध्ये राहण्याची खाण्याची उत्तम सोय होऊ शकते व तिथे सरकारी धर्मशाळा सुद्धा आहेत ज्याचा पर्यटक लाभ घेऊ शकतात.

अशा मंदिरांशी आपली नाळ न तुटू देणं हे आपल्या हातात आहे. अनेक रोमांचक, गूढ कथा आणि रहस्य आपल्याला इथे जाणून घेता येतात, अशा सुरेख कथांचे श्रावण करून सुखावल्याचा अनुभाव येथे घेता येतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?