' अनुपम खेर "त्या" जज वर एवढे का चिडले होते?

अनुपम खेर “त्या” जज वर एवढे का चिडले होते?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अनुपम खेरचं एक भाषण सोशल मिडीयावर viral गेलंय. त्यात ते “intolerance” वर त्यांचं मत व्यक्त  करताहेत. कुणा “जस्टीस गांगुलींवर” भयंकर चिडले आहेत आणि आक्रमक प्रतिवाद करत आहेत. अर्थातच लोकांना हे भाषण फार आवडलं आहे, पण हा प्रसंग काय होता – कोण कोण भाषण देणार होतं, त्यातील प्रत्येक जण काय म्हणालं – जस्टीस गांगुली नेमकं काय म्हणाले ह्याचा हा सारांश.

प्रसंग होता: कोलकाता इथे आयोजित: The Telegraph National Debate 2016 .

ह्या डिबेटचा विषय होता – Tolerance is the new Intolerance – म्हणजेच – सहिष्णुता हीच आता असहिष्णुता झाली आहे.

ह्या वाद-विवाद कार्यक्रमात ६ लोक सहभागी झाले होते. दोन्ही बाजूंनी ३-३ लोक बोलणार होते.

एका बाजूला होते सोहेल सेठ (actor, लेखक, व्यावसाईक), काजोल, अनुपम खेर – हे तिघं विषयाच्या बाजूने बोलणार होते.

दुसऱ्या बाजूला होते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली, रणदीप सुरजेवाला (कॉंग्रेस प्रवक्ता) आणि बरखा दत्त.

वरकरणी बघता, हा विषय, “आपण कसे अनेक चुकीच्या गोष्टी सहन करत जातो आणि त्यातून इतर वाईट गोष्टी अतिशय वाढत जात चांगल्या गोष्टींसाठी असहिष्णुता निर्माण होते” अश्या अर्थाचा आहे. हा विषय पक्ष, नेता ह्यांना स्पर्श नं करता चर्चिला जाऊ शकला असता. पण गांगुलींनी JNU मधे घडलेल्या प्रकाराबद्दल मत व्यक्त केलं, जे अनुपम खेर ना अजिबात पटलं नाही – आणि त्यावरून अनुपम जीं नी आक्रमक प्रतिवाद केला.

चर्चेची सुरुवात सोहेल सेठने केली, ज्यांनी अतिशय sensible मुद्दे मांडले. ते म्हणाले की मूर्ख लोकांची वक्तव्य दाखवत राहिल्याने आपण त्याच लोकांवर चर्चा करत रहातो आणि गरिबी, जातीवाद, भ्रष्टाचार अश्या महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण “सहिष्णू” होऊन जातो. हे प्रश्न आपण सहन करत बसतो. त्यांचं भाषण बघायलाच हवं असं आहे :

 

 

त्यानंतर जस्टीस गांगुली बोलले, ज्यांचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांवर आणि संविधानावर आधारित होते. त्यातील पुढील अंश तो आहे, ज्यावर अनुपम खेर भडकले !

 

पुढे काजोल ने तिचे वैयक्तिक अनुभव विशद केले.

काजोल नंतर आले कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला बोलले. त्यांनी भाषण साहजिकच कॉंग्रेस तर्फे भाजप चा विरोध करण्यासाठी केलं.

ह्या सर्वांवरून वैतागून – अनुपम खेर बोलते झाले…!

 

ह्यावर बरखा दत्त ने छान उत्तर दिलंय. त्यांनी हा मुद्दा फार उत्कृष्टरित्या मांडला की असहिष्णुतेचा दोष दोन्ही पक्षांकडे आहे आणि देशात सेक्युलरीझम, सहिष्णुता, देशभक्ती – ह्या मुल्यांचा ऱ्हास ह्या दोन पक्षांमुळे झालाय. त्यांचं भाषणसुद्धा बघण्यासारखं आहे :

 

तर ही आहे नेमकं काय घडलं ह्याची पूर्ण story.

ही पूर्ण story समजून – आता चांगलं वाईट – चूक बरोबर – तुम्ही ठरवा…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 172 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?