' घरच्यांचा विरोध झुगारून त्याने मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला जागतिक ब्रॅंड बनवलं!

घरच्यांचा विरोध झुगारून त्याने मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला जागतिक ब्रॅंड बनवलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फास्टफूड किंवा स्ट्रिट फूड आवडत नाही असा माणूस दुर्मिळच. भेळ, पाणीपुरी,चाट, कांदा भजी हे आयटम वर्ल्ड फेमस असले तरी एक पदार्थ आहे जो कोणत्याही जॉनरमध्ये आजही खाऊगल्लीचा अनभिषिक्त सम्राट आहे..तो म्हणजे सर्व लहान थोरांचा लाडका वडापाव.

कोणतीही वेळ, कोणताही सिझन आणि कोणताही मूड; वडापावला पर्याय नाही. त्याची जन्मकथाही त्याच्यासारखीच रंजक आहे.

 

Vada Pav-marathipizza00

===

हे ही वाचा हा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता

===

बदलत्या काळानुसार आणि लोकांच्या आवडीनुसार वडापावच्या चवीत आणि जॉनरमधे बदल होत गेले आणि कष्टकऱ्यांचे अन्न ते तरुणाईचे आवडते फास्टफूड हा वडापावचा प्रवास थक्क करणारा आहे.

या प्रवासात काही घटक आहेत ज्यांनी वडापावला पेजथ्री सेलिब्रिटी बनवले. त्यातील एक म्हणजे ‘जंबोकिंग’..काय आहे जंबोकिंग? एक अशी फूडजॉइंट कंपनी जिने वडापावला नवे रूप तर दिलेच पण खाद्यबाजारपेठेत स्वतःची ब्रँड व्हँल्यूही तयार केली.

ग्राहकांची आवडनिवड आणि प्रायोरीटी ओळखून वडापावला बर्गर रुपात सादर करून लोकांच्या विशेषतः तरूणांच्या जिभेवर राज्य करायला सुरवात केली आहे.

 

jumbo king inmarathi

 

खिशाला परवडणाऱ्या लोकल टू ग्लोबल फूड बनलेल्या वडापावची यशस्वी कहाणी आहे जंबोकिंग जी लिहिली आहे कंपनीचे सिईओ धीरज गुप्ता यांनी.

मुंबईचे लोकल फूड असणाऱ्या, कागदात गुंडाळून मिळणाऱ्या वडापावला बटरपेपरमधे चिज गार्निशिंग करून सादर केला जाण्याची ही सक्सेस स्टोरी सुरू झाली २००१ साली अवघ्या २००००० रू. भांडवलात मालाडच्या रेल्वे स्टेशनजवळच्या एका फूड आऊटलेट मध्ये.

पहिल्याच दिवशी ५००० रू. चा गल्ला जमल्यावर गुप्ता यांचा आत्मविश्वास वाढला. वडापावचा बिझनेस हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे अशा धारणेतून त्यांना घरातून, नातेवाईक यांच्याकडून विरोध झाला पण त्याने डगमगून न जाता स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर गुप्ता ठाम राहिले.

 

dheeraj gupta inmarathi

 

त्यानंतर नजिकच्या काळात कांदिवली व हळूहळू पूर्ण मुंंबईभर त्यांचे आऊटलेटस सुरू झाले. आज फ्रे़ंचायझींच्या माध्यमातून जंबोकिंगच्या ११२ शाखा असून त्यातील ९० शाखा एकट्या मुंबईत आहेत तर उर्वरीत पुण्यात आहेत.

===

हे ही वाचा हा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता

===

येत्या काळात हैद्राबाद, बंगळुरु, कोलकता, दिल्ली, चैन्नई आदी ८ शहरांमध्ये आऊटलेटस सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे.

“जर अमेरीकेत मँक्डोनल्ड ऑर्गनाईज्ड होऊन काम करू शकतात तर आपण का नाही? ” धीरज गुप्ता विचारतात. फ्रँचायजींच्या माध्यमातून व्यवसाय तो ही नफ्यात हे मिथक वाटले तरी कन्सेप्ट क्लिअर असेल तर अडचण येत नाही असे गुप्ता सांगतात.

जागतिक फास्टफूड ब्रान्ड असलेले बर्गरकिंग, केएफसी, मॅक्डोनल्ड यांच्यासारखीच जंबोकिंंगने आपल्या पदार्थांंची खासियत व चव जपली आहे. शेजवान, क्रिस्पी वेज, ग्रिल्ड बटर, नाचोज, कॉर्न पालक अशा जंबोकिंगच्या प्रसिद्ध व्हरायटीज आहेत.

 

foodchain inmarathi

 

या फ्लेवर्सची क्रेझ तरूणाईत अधिक आहे आणि वड्याची साईजही दुसऱ्या वड्यांपेक्षा २०% मोठी आहे तीही खिशाला परवडेल अशी.

लोकांना साफ स्वच्छ आणि हायजिनीक अन्न हवे असते. आम्ही तेच लोकांना देतो तेही चव कायम ठेवत..आम्ही त्यात कॉम्प्रमाईज करत नाही हेच आमच्या मागील १७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे रहस्य आहे. असे गुप्ता आवर्जून सांगतात. गुप्ता यांच्या ब्रँडची खासियत आहे स्वच्छ, आरोग्यदायी वडापाव तो ही माफक दरात.

आपली ही सक्सेस स्टोरी शेअर करण्यासाठी गुप्ता यांना अनेक बिझनेस स्कूलमधून आमंत्रीत केले जाते. स्वतः MBA झालेले गुप्ता सांगतात, वडापाव सोबत समोसाही मिळावा अशी काही ग्राहकांची मागणी होती. पण आम्ही मुद्दामच वडापाव वर फोकस केलं.

भरमसाठ पदार्थ विकण्याऐवजी एकाच पदार्थाला वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्याची आमची योजना होती. त्यामुळे वडापाव खायचा तर जंबोकिंगचाच..अशी खाणाऱ्याची मानसिकता हवी.

 

dheeraj gupta jk inmarathi

 

जंबोकिंग हे नाव निवडतानाही ५० नावांच्या यादीतून ते निवडले गेले. एक असे नाव जे लहान थोरांच्या चटकन लक्षात राहील.

एकदा व्यवसाय जोर धरू लागला की व्यावसायिकाचे लक्ष विचलीत होवू शकते. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कोअर बिझनेसवर लक्ष केंद्रित करावे लागते. एखाद्या गोष्टीचा स्पेशालिस्ट होणं लोकांना आवडते, मात्र त्यांना अपयशाची भिती असते.

आज जंबोकिंग हा देशातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रान्ड असून केवळ २ लाख रुपयात सुरू झालेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल २ कोटींच्या घरात गेली आहे.

 

jumbo king burger inmarathi

 

शेवटी वडापाव सारख्या स्ट्रिट फूडच्या चवीत बदल करूनच युवा वर्गाला आकर्षित करता येते. इतर जागतिक फूड ब्रान्डच्या तुलनेत जंंबोकिंग ग्राहकाच्या जिभेसोबत खिशाचीही काळजी घेते..हे धीरज गुप्ता आवर्जून स़ांगतात!

===

हे ही वाचा डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?