' दगड 'नुसतेच रचून' उभारलं गेलेलं हे मंदिर तोफगोळ्यांनी सुद्धा पडत नाही...

दगड ‘नुसतेच रचून’ उभारलं गेलेलं हे मंदिर तोफगोळ्यांनी सुद्धा पडत नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. पुराणात अशाच अनेक कथा आणि प्रसंग यांचे वर्णन केलेले आहे. भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत. प्रत्येक मंदिराशी निगडित अनेक कथा देखील आहेत.

अशाच भारतात असं देखील एक मंदिर आहे जे भूतांनी बांधलेलं आहे असं मानलं जातं. हे मंदिर भूतांनी बांधलेलं आहे आणि या मंदिराला दगड नुसतेच रचून उभारलं गेलेलं आहे. तरीदेखील हे मंदिर तोफगोळ्यांनी सुद्धा पाडलं जाऊ शकत नाही. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे.

आजच्या लेखात आपण या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

 

ghost inmarathi

===

हे ही वाचा – लाखो लिटर पाणी ओतूनही पूर्ण भरत नाही या मंदिरातील घडा…!!

===

महादेव म्हणजे देवांचे देव. त्यांना भोलेनाथ म्हणून ओळखलं जातं. त्याबरोबरच त्यांना भूतनाथ म्हणूनही ओळखलं जातं. आता तुम्ही विचार कराल भूतनाथ का, तर भगवान शंकर यांना फक्त देवी- देवतांचे किंवा मनुष्याचे देव नाहीत तर ते भूतांचे देखील देव आहेत. त्यामुळे त्यांना भूतनाथ म्हटलं जातं.

जेव्हा भगवान शंकराने माता पार्वती यांच्याशी विवाह केला होता तेव्हा त्यांच्या लग्नात भूत देखील सहभागी झाले होते. मध्यप्रदेशातील मुरैना येथे एक महादेव मंदिर आहे ज्याचे नाव ककनमठ हे आहे. या मंदिराविषयी असं मानलं जातं की या मंदिराचे निर्माण भूतांनी केले आहे.

 

kakanmath temple inmarathi

 

काय आहे यामागची कथा

ककनमठ मंदिराची निर्मिती ही फक्त दगडांनी केली गेली आहे. त्यासाठी कोणत्याच सीमेंट किंवा चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. जेव्हा आपण हे मंदिर पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, की दगड एकमेकांवर रचले आहेत आणि ते कधीही ते पडू शकतात. पण हे मंदिर अतिप्राचीन असून देखील तेथील एक दगडदेखील हललेला नाही.

असंही म्हटलं जातं, की या मंदिराच्या परिसरात जितकी लहान मंदिरे होती, ती मंदिरे नष्ट झाली आहेत. पण या मंदिराला मात्र धक्का देखील लागलेला नाही.

या मंदिराच्या बांधकामासाठी जे दगड वापरले गेले आहेत, ते दगड जवळपासच्या भागात कोठेच दिसत नाहीत. अशी मान्यता आहे, की मंदिर ज्या जागेत बांधलं गेलं आहे ते एक मोकळे मैदान होते.

दुसऱ्या भागांमधून भूतांनी दगड आणून रात्रीत हे मंदिर बांधले आहे. त्यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी दगड कोठून आणले असतील आणि इतके मोठे दगड कसे आणले असतील हादेखील एक मोठा प्रश्न आहे.

 

kakanmath temple view inmarathi

===

हे ही वाचा – या मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, नाहीतर…!

===

मंदिरांचे बांधकाम आहे अपूर्ण

जर तुम्ही मंदिर नीट पाहिलेत, तर तुमच्या लक्षात येईल की या मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे. असं म्हटलं जातं की भूत हे मंदिर बांधत होते पण अचानक सकाळ झाल्यामुळे ते बांधकाम अपूर्ण सोडून निघून गेले. त्यामुळे हे बांधकाम अर्धवट आहे.

या मंदिराला भूत प्रेतांचा शाप आहे. मात्र या शापामुळे आजपर्यंत काहीही वाईट घडलेलं नाही. त्यामुळे या मंदिराला कोणताच धोका पोहचलेला नाही.

ककनमठ नावाचा इतिहास

ककनमठ मंदिराविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातील एक कथा अशी आहे, की कच्छवाहा वंशचे राजा कीर्ति सिंह यांची पत्नी ककानवती भगवान शंकराची फार मोठी भक्त होती. त्यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. हा इतिहास ११ व्या शतकातील आहे. म्हणूनच या मंदिराला ककनमठ म्हटलं जात असावं.

या मंदिरात भगवान शंकराची खूप सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मंदिर खूप सुंदर होते परंतु मुस्लिम लोकांनी यावर आक्रमणे केली आणि हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना देखील हे शक्य झाले नाही.

हे मंदिर पाडण्यासाठी त्यावर तोफगोळेही डागण्यात आले.  मुस्लिम शासकांच्या कुठल्याही प्रयत्नांना यश आलं नाही. मंदिर तसंच शाबूत राहिलं.

 

kakanmath temple inmarathi

 

हे मंदिर ग्वालियर शहरापासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर आहे. इथे रात्री जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर एकटे जाऊन नका शक्यतो ग्रुपने जा. हे मंदिर आडवळणी तसेच थोडे भयानक देखील आहे.

सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही तेथून परत या. शक्यतो या मंदिरास सोमवारी भेट दयावी. सोमवारी अधिक गर्दी असते…

===

हे ही वाचा – नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?