' आजचं बॉलिवुड बोल्ड आहे? ८०-९०ची ही ६ गाणी पाहून आजही तुमची झोप उडेल… – InMarathi

आजचं बॉलिवुड बोल्ड आहे? ८०-९०ची ही ६ गाणी पाहून आजही तुमची झोप उडेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीज यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे चित्रपटगृह बंद झाले होते म्हणून  प्रेक्षकांनी त्यांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीजकडे वळवला होता. आता हळूहळू प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत.

 

ott-logos-inmarathi

 

मात्र यासोबतच असंख्य लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म अतिबोल्ड असल्याचा ठपका देखील ठेवला सोबतच मागील काही काळापासून बॉलिवूडमधील सिनेमे देखील खूपच बोल्ड झाल्याचे बोलले जाते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इम्रान हाश्मी आल्यानंतरच हिंदी सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स आल्याचे आजही अनेकांना वाटते.

इम्रान हाश्मीवर तर सिरीयल किसरचा टॅगच लावला गेला. मात्र यात आपण सर्व एक गोष्ट विसरलो की, आताच्या बॉलिवूडवर ‘बोल्ड’ म्हणून तोंडसुख घेताना ८०/९० च्या दशकातला काळ टीकाकार सपशेल विसरले.

 

imrhan hashmi inmarathi

 

८०/९० च्या दशकात तर अनेक सिनेमांमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांनी आजच्या काळालाही मागे टाकतील असे सीन्स दिले आहेत. आज आपण अशाच जुन्या बोल्ड सिनेमे आणि बोल्ड सीन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

==

हे ही वाचा बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!

==

राम तेरी गंगा मैली :

१९८५ साली राम ‘तेरी गंगा मैली’ सिनेमा प्रदर्शित झाला. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांचा हा सिनेमा आजही सिनेमातील बोल्ड सीन्सबद्दलचा ओळखला जातो. मंदाकिनी यांनी या चित्रपटात पांढऱ्या साडीतील धबधब्याखालचा सीन, बाळाला स्तनपान करतानाचा सीन किंवा इतर अजून बोल्ड सीन दिले.

 

couple inmarathi

 

पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या एवढ्या सीन्समुळे त्या एका रात्रीत चर्चेत आल्या. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक देखील केले.

खिलाडीयो का खिलाडी :

१९९६ साली आलेल्या ‘खिलाडीयो का खिलाडी’ या सिनेमात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी होती. मात्र रेखा, अक्षय आणि रवीना यांचा लव्ह ट्रँगल दाखवला होता.

या सिनेमातील ‘इन द नाइट’ या गाण्यात रेखा यांनी १३ वर्ष लहान असणाऱ्या अक्षय कुमारसोबत अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन दिले होते. आजही हे गाणे त्या सीन्समुळे ओळखले जाते.

 

bollywood rekha akshy in marathi

 

सत्यम, शिवम, सुंदरम :

दम मारो दम….गाणे ऐकले की डोळ्यासमोर येतात बोल्ड आणि ब्युटीफुल झीनत अमान. झीनत अमान ह्या देखील बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्री म्हणून आजही ओळखल्या जातात.

१९७८ साली आलेला सत्यम, शिवम, सुंदरम हा सिनेमा त्यांच्या करियरमधला महत्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमाने त्यांना बोल्ड अभिनेत्री ही नवीन ओळख मिळवून दिली. या सिनेमात त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत त्यांनी दिलेले बोल्ड सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

 

satyam shivam sundaram inmarathi

 

मोहरा :

१९९४ साली आलेला मोहरा सिनेमा कोणाला माहित नसेल असे कोणीच नसेल. हा सिनेमा यशस्वी तर झाला, मात्र या सिनेमातील अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणे तर सर्वांनाच आठवत असले.

या गाण्यातील रवीनाने अक्षयसोबत दिलेले बोल्ड सीन्स आजही त्या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. पावसात शूट झालेल्या या गाण्यात रवीनाच्या अदा चार चांद लावून गेल्या.

 

bollywood mohara in marathi

==

हे ही वाचा : एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात

==

दयावान :

१९८८ साली आलेला ‘दयावान’ ह्या सिनेमाचे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येतो तो माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यातला बोल्ड किसिंग सीन.

‘आज फिर तुम पे प्यार आया हैं’ गाण्यातला हा किसिंग सीन आजही लोकांच्या लक्षात आहे.

२० वर्ष मोठ्या विनोद खन्नांसोबत किसिंग सीन दिल्यानंतर माधुरीवर खूप टीका देखील झाली होती. मात्र तरीही तो किसिंग सीन आजही हिंदी चित्रपटांमधील गाजलेला सीन मानला जातो.

 

aaj phir tum pe inmarathi

 

बॉबी :

१९७३ साली आलेला डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या पदार्पणाच्या ‘बॉबी’ सिनेमात डिंपल यांनी देखील अनेक बोल्ड सीन दिले होते. यात त्यांनी किसिंग सीन सोबतच बिकिनी घालून देखील सीन दिला होता.

पहिल्याच सिनेमातुन डिंपल यांना बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख देखील मिळाली. पुढे ‘सागर’ या सिनेमात देखील ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा एक किसिंग सीन होता.

 

bollywood bobby in marathi

 

===

हे ही वाचा : यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?