' कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा! – InMarathi

कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कंगना रनौत आणि वाद हे समीकरण आपल्याला नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून कंगना सिनेमात कमी आणि तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या व्हीडिओजमध्ये जास्त दिसत आहे. ती अभिनेत्री नाही तिला बीजेपीने तिकीट दिलं आहे इथवरसुद्धा तिच्याविषयी आपण ऐकलं असेल.

खासकरून सुशांत सिंहच्या राहस्यमयी मृत्यूनंतर कंगना ही जास्त सक्रिय झाली. आधी हृतिकबरोबर झालेल्या कॉंट्रोवर्सीमुळे तिचं नाव कानफाट्या पडलेलंच. ते तीने आता सिद्ध करायचं असंच ठरवलेलं दिसतंय.

उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख असो किंवा संजय राउत यांच्याशी घेतेलेला पंगा असो, कंगना कायम चर्चेत होती. तिच्या ऑफिसची झालेली तोडफोड आणि त्यानंतर तर ती आणखीनच यात गुंतत गेली.

 

kangana ranaut inmarathi

 

तिची राजकारणावरची टिप्पणी बऱ्याच लोकांच्या जिव्हारी लागते, शिवाय पंतप्रधान मोदी आणि बीजेपीच्या समर्थनार्थ ती सतत स्टेटमेंट देत असल्याने सोशल मीडियावर तिला खूप ट्रॉल केलं जायचं.

आजही ट्विटरवर सर्वात पहिलं हॅशटॅग दिसतंय ते म्हणजे #kangnaranaut. पण आज तिचं नाव वर येण्यामागचं कारण म्हणजे तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं आहे.

सध्याच्या बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाबाबत बरीच ट्विट केली. शिवाय बंगालमध्ये राष्ट्रपति राजवट लागली पाहिजे असंही तीने तिच्या ट्विटर हँडलवरुन नमूद केलं.याच कारणामुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती मिळत आहे.

===

हे ही वाचा लसीच्या किंमतीवर मत मांडणारा फरहान अख्तर होतोय ‘तुफान’ ट्रोल

===

kangana account suspend inmarathi

 

ही बातमी बाहेर येताच काही क्षणातच तिच्या नावाचं हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलं. तिचे विरोधक म्हणा किंवा नेटकरी म्हणा, प्रत्येक अकाऊंटवर हीच मीम्स दिसू लागली आहे. पाहुयात त्यापैकीच काही खास धमाल मीम्स!

अगदी खरंय कंगनाचं अकाऊंट बंद झालेलं बघून ह्याच दोन व्यक्ति सर्वात जास्त आनंदी असणार!

 

 

या शब्दावरून होणारं ट्रॉलिंग कंगनासाठी नवं नाही पण आज खरंच याला उधाण आलंय!

 

kangna tweet 2 inmarathi

 

लोकं याला ट्विटरने केलेलं sanitization असंही म्हणतायत

 

kangana tweet 3 inmarathi

 

कंगनावर ट्विटरने घेतलेल्या अॅक्शनवर लोकांनी ट्विटरच्या स्पर्धक एप ‘कु’ ला सुद्धा ट्रॉल केलं आहे.

 

kangana tweet 4 inmarathi

 

आज आयपीएलसुद्धा रद्द झाल्याचा निर्णय झाल्याने बऱ्याच लोकांची आणि कंगना विरोधकांची अवस्था अशीच झाली असेल, हसावं की रडावं?

 

kangana tweet 5 inmarathi

 

काही लोकं तर कंगनाची तुलना एखाद्या व्हायरसशी करू लागले आहेत.

 

kangana tweet 6 inmarathi

 

आज सोशल मीडियावरचे मीम्स बघून प्रत्येकाची हीच अवस्था होणार आहे.

 

kanagana tweet 7 inmarathi

 

ट्विटरच्या ऑफिसमध्येसुद्धा असंच वातावरण असेल ना?

 

kangana tweet 8 inmarathi

 

kangana tweet 9 inmarathi

===

हे ही वाचा अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!

===

kangana tweet 10 inmarathi

 

कंगनाची बिनधास्त स्टेटमेंट आणि तिच्या एकंदर व्यक्तिमत्वावरच आणि तिच्या पोलिटिकल आयडियोलॉजीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय!

हे सगळं काही नवीन नाही. कंगनाच्या वादग्रस्त ट्विटमागचा आणि तिच्या पॉलिटिकल स्टँडमागचा चेहरा आपल्याला माहीत आहेच, पण ट्विटरने एवढं मोठं पाऊल उचललं आहे की नक्कीच यावर राजकीय वर्तुळात चर्चा होणार आणि लोकं त्यांची मतं मांडणार.

एक ट्विटर अकाऊंट बंद केलं म्हणून गप्प बसणाऱ्यातली कंगना नाही, ती तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर करेल, कदाचित कु वरच कंगनाचा आपल्याला नवीन अवतार बघायला मिळू शकेल.

तोवर आपण या मीम्सचा आस्वाद घेऊया आणि ते शेअर करूया. कंगना योग्य, मोदी योग्य, ममता योग्य की ट्विटर योग्य या सगळ्या भानगडीत आपण सामान्य लोकांनी न पडलेलंच बरं.

आधीच कोरोना महामारीचं संकट देशावर पसरलं आहे त्यामुळे आपण फक्त ही मीम्स बघून पोट धरून हसूया!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?