' लग्नमंडप सोडून नववधू पोचली ‘निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र’ घ्यायला…!! – InMarathi

लग्नमंडप सोडून नववधू पोचली ‘निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र’ घ्यायला…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयुष्यात खूप कमी वेळा एकाचवेळी अनेक गोष्टींचा आनंद एकत्र अनुभवता येतो. अशा घटना किंवा असे क्षण प्रत्येकाच्याच नशिबात असतात असे नाही.

आता निवडणुकांचेच पाहिले तर लक्षात येईल, की निवडणूक आणि निवडणुकांचे निकाल त्यांच्यासोबत नेहमीच काही अविस्मरणीय, मजेशीर, अभिमानास्पद, सुखदायी, दुःखदायी असे सर्वच प्रकारचे क्षण घेऊन येते.

 

poonam sharma 5 in marathi

 

असेच जेव्हा जीवनातील दोन महत्वाचे आणि जीवन बदलून टाकणारे आनंदाचे क्षण एकाच दिवशी मिळाले तर? आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत जिच्या लग्नाच्याच दिवशी ती निवडणूक जिंकल्याची बातमी तिला मिळाली आणि पुढे..

 

poonam sharma 4 in marathi

 

उत्तर प्रदेशातील रामपूर गावातील पंचायत निवडणुकीत पूनम शर्मा ही युवती सदस्यपदासाठी निवडणूक लढवत होती. यासाठी मतदान झाले. यातच तिचे लग्न ठरले आणि योगायोगाने मतमोजणीच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त होता.

 

poonam sharma 2 in marathi

 

पुनमचे लग्न लागण्याच्या काही क्षण अगोदर तिला ती निवडणुकीत जिंकल्याचे समजले, आणि तडक ती मांडवातून निघून थेट शासकीय कार्यालयात निवडणूक जिकंण्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पोहोचली.

 

poonam sharma in marathi

 

पूनमला एकूण ६०१ मते मिळाली आणि ३१ मतांनी तिने ही निवडणूक जिंकली. यावेळी तिथे उपस्थित अधिकाऱ्याने नववधूच्या वेशातील पूनमला प्रमाणपत्रासोबतच लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या. पूनम विजयी झाल्याने तिच्या सासर आणि माहेरकडील मंडळींना खूप आनंद झाला आहे.

 

poonam sharma 3 in marathi

 

प्रमाणपत्र घ्यायला आलेले नववधू खूपच भाव खाऊन गेली. पूनम तिचे प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर नियोजित वरासोबत डबल आनंदात तिने सप्तपदी घेतली.

सध्या सोशल मीडियासोबतच सगळीकडे पूनम शर्मा चर्चेचा विषय बनली आहे.

===

हे ही वाचा – बंगालमधील सुखावह उदाहरण : झोपडीवजा घर ते आता आमदार निवास…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?