' आजही या शहराची लोकसंख्या ० आहे, यामागचं भयावह वास्तव प्रत्येकाला ठाऊक हवंच!

आजही या शहराची लोकसंख्या ० आहे, यामागचं भयावह वास्तव प्रत्येकाला ठाऊक हवंच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही देशाच्या, शहराच्या प्रगतीमध्ये लोकसंख्येचा फार मोठा वाटा असतो. लोकसंख्या जितकी कमी तितक्या सुविधा पुरवणं सहज, सोपं जातं हे आपण काही कमी लोकसंख्या असलेल्या देशांच्या उदाहरणावरून बघतच असतो.

भारतासारखी बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशात जनगणना किंवा लसीकरण सारखी कोणतीही योजना राबवणं किती कठीण आहे हे आपण नुकतंच बघितलं आहे.

जागतिक लोकसंख्येचा दर एकीकडे झपाट्याने वाढत असताना जगात ‘प्रीपयत’ हे उत्तर युक्रेन या देशातील असं एक शहर आहे जिथे १९८६ पासून लोकसंख्येत काहीच फरक पडलेला नाहीये.

मागच्या ३५ वर्षांपासून प्रीपयतची लोकसंख्या ही शून्य – ० इतकीच आहे. २६ एप्रिल १९८६ रोजी प्रीपयतमध्ये एक भयंकर अपघात झाला, शहर रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आणि लोकांनी वसवलेलं हे शहर कायमस्वरूपी एकटं पडलं.

 

pripyat inmarathi

===

हे ही वाचा केरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील

===

आज प्रीपयतमध्ये फक्त इमारती आहेत, एकही माणूस नाहीये. ‘चेर्नोबिल’ नावाच्या अणुकेंद्रात झालेला हा अपघात इतका भयंकर होता की पुढील २०,००० वर्ष आजच्या भाषेत ‘आयसोलेशन’ मध्ये असणार आहे.

कोणतीही व्यक्ती प्रीपयतध्ये एक तासाच्या वर जगू शकत नाही अशी सुचना शास्त्रज्ञांनी ३५ वर्षांपूर्वीच दिली आहे. ‘चेर्नोबिल अणुकेंद्रात’ हा अपघात का झाला? त्या आधी ‘प्रीपयत’ शहर कसं होतं ? जाणून घेऊयात.

आज ‘भुताचं शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रीपयत या शहराची स्थापना ४ फेब्रुवारी १९७० रोजी झाली होती. चेर्नोबिलअणुकेंद्रात काम करणाऱ्या लोक हेच या शहरातील लोकसंख्येचा मोठा भाग होते.

१९८५ साली झालेल्या जनगणनेनुसार प्रीपयतची लोकसंख्या ही ४७,५०० इतकी होती. २७ देशांचे लोक या शहरात रहायचे.

 

life in pripyat inmarathi

 

सोविएत युनियन मध्ये येणाऱ्या प्रीपयतला त्या काळात ‘न्यूक्लिअर सिटी’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. या शहरातील कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी कित्येक बांधकाम व्यवसायिकांनी आपला व्यवसाय इथे सुरू केला होता.

प्रीपयतमध्ये त्या काळात १५ प्राथमिक शाळा होत्या. २५ स्टोअर्स, मॉल्स होते, कॅफे, हॉटल्स होती, १० वेअरहाऊस होते जिथे ४ टन पर्यंत स्टीलचा साठा करून ठेवला जायचा. जनोव्ह नावाच्या रेल्वे स्टेशन हे प्रीपयतला रशियातील इतर शहरांशी जोडायचं.

चेर्नोबिल अणुकेंद्रातील घटना :

प्रीपयत नदी आणि बेलारुस शहराच्या सीमेशी लागून चेर्नोबिल हे अणुकेंद्र बांधण्यात आलं होतं. २६ एप्रिल १९८६ ची रात्र ही प्रीपयतमधील लोकांसाठी काळरात्र होती.

रात्री १.२३ मिनिटांनी अणुकेंद्रातील एका रिऍक्टर मधील रॉडचं तापमान इतकं वाढलं होतं की तो फुटला आणि त्यातून ८ टन इतके अणुउत्सर्जित किरण बाहेर पडायला लागले. या किरणांमधील विषारीपणा हा जपानच्या हिरोशिमा बॉम्बस्फोटापेक्षा ४०० पटीने अधिक होता.

अणुकेंद्रात असलेल्या रिऍक्टर्सपैकी एक खराब झाल्याने ही घटना घडली असं सुद्धा बोललं जातं. या घटनेनंतर चेर्नोबिल अणुकेंद्रातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता आणि जवळपास ४०० लोक जखमी झाले होते.

 

chernobyl disaster inmarathi

===

हे ही वाचा इतिहासातल्या या सर्वाधिक दाहक अणुस्फोट अपघाताच्या सावलीत आजही आपण जगतोय…

===

‘कमाल तापमान मर्यादा ठरवताना एका ऑपरेटर कडून झालेली चूक’ हे या घटनेचं मुख्य कारण म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.

‘अनटोली डिटलोव्ह’ हे त्या रात्री सुपरवायझर होते. त्यांनी काही नियम पाळले नाहीत म्हणून कामगार अशी चूक करू शकले हे तथ्य समोर आलं होतं.

काही तरी धूर, प्रकाश किरण बाहेर पडत असल्याने कित्येक नागरिक हे पुलावर येऊन बघत होते. अणु उत्सर्जित किरण हे हवेत पसरत होते आणि त्या हवेत श्वास घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ते जात होते.

आजच्या सारखे तेव्हा मास्क सुद्धा नव्हते. काहींना या किरणांचा त्रास होणं लगेच सुरू झालं तर काहींना थोड्या वेळाने तर काहींना दुसऱ्या दिवशी सकाळी श्वास घेतांना त्रास सुरू झाला.

 

bridge of death inmarathi

 

तुम्ही ज्या हवेत श्वास घेत आहात, वावरत आहात ती शुद्ध नाहीये ही स्थिती प्रचंड अवघड असते. कारण, आपण इतर कशावरही नियंत्रण ठेवू शकतो. पण, आपण श्वास घेणं थांबवू शकत नाही.

भोपाळ गॅस गळती ही घटना सुद्धा अशीच होती. लोक श्वास घेऊ शकत नव्हते. अणुऊर्जा केंद्रातून उत्सर्जित किरण हे फक्त श्वासातूनच नाही तर त्वचेतून सुद्धा शरीराच्या आत जाणारे होते. हे किरण शरीरातील पेशींचं कार्य बंद करण्याची शक्ती बाळगून असतात.

अणु किरणांचं उत्सर्जन हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ३० किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलं होतं. शहराच्या बाहेर असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी सकाळी आपलं कामसुद्धा सुरू केलं होतं.

जसा दिवस पुढे सरकत होता तसं कित्येक लोक आजारी पडण्याच्या बातम्या येऊ लागल्या. आजच्या इतके संपर्काचे साधन नसल्याने ही बातमी आजच्या इतकी वाऱ्याच्या वेगाने पसरू शकली नाही.

शिवाय, ‘चेर्नोबिल’ अणुसंस्थेचं व्यवस्थापन हे पूर्णपणे मॉस्कोच्या लोकांकडे असायचं. युक्रेनच्या सरकारपर्यंत आदल्या रात्री घडलेल्या या घटनेची माहिती पोहोचली नव्हती.

२७ एप्रिल १९८६ रोजी सकाळी ११ वाजता ही बातमी जगजाहीर झाली आणि युक्रेन सरकारने प्रीपयत शहर रिकामं करण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी संपूर्ण शहरात बस पाठवण्यात आल्या. अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन फक्त बाहेर पडण्यासाठी लोकांना सूचना देण्यात आल्या.

 

pripyat 2 inmarathi

 

लोकांच्या कितीतरी व्यक्तिगत गोष्टी आजही प्रीपयतच्या इमारतींमध्ये पडून आहेत. या घटनेनंतर या शहरातील ५००० लोकांचा कॅन्सर मुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे आणि ३५००० लोकांना शहरातून बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आलं होतं.

पुनर्वसन कार्य :

१९८६ ते १९८८ या दोन वर्षाच्या काळात ‘स्लॅवूच’ नावाचं शहर उभारण्यात आलं. हे शहर केवळ प्रीपयतमधून अचानक बाहेर पडाव्या लागणाऱ्या लोकांसाठीच बांधण्यात आलं होतं.

स्लॅवूच हे आज अणुकेंद्रात काम करणाऱ्या कामगार आणि शास्त्रज्ञांचं रशियातील दुसरं मोठं शहर आहे. ‘कीव्ह’ या जिल्ह्याचा भाग असलेलं प्रीपयतचं पूर्ण व्यवस्थापन आज युक्रेन च्या ‘मिनिस्ट्री ऑफ एमर्जन्सी’ कडून बघितलं जातं. चेर्नोबिल अणुकेंद्राला ‘एक्स्कुलुजीवह झोन’ म्हणून घोषित करण्यात आलं.

चेर्नोबिल अणुकेंद्रातील घटनेनंतर रशियामध्ये सुरक्षेचे नियम खूप कडक करण्यात आले. सोविएत युनियन संपायच्या आधी झालेली ही घटना रशियामधील इस्ट आणि वेस्ट ब्लॉक आणि पूर्ण न्यूक्लिअर क्षेत्राला सुरक्षा आणि प्रशिक्षणाचं महत्व सांगणारी होती.

या घटनेनंतर अणुकेंद्रांसाठी प्रमाणित करण्यात आलेल्या तीन पंख्याचं चित्र असलेल्या चिन्ह ‘रेडिओऍक्टिव्ह’ ठरवण्यात आली होती.

 

radioactive inmarathi

===

हे ही वाचा जगाच्या इतिहासातल्या या सर्वाधिक विनाशकारी अणु हल्ल्यांसह दुर्घटनांच्या जखमा आजही ताज्या आहेत!

===

अणुऊर्जा ही किती भयंकर आहे जगाला आता पटलं होतं. वीजनिर्मिती करण्यासाठी अणुकेंद्रांची निर्मिती करण्यात येते. भारतात असे २२ अणुऊर्जा केंद्र सध्या कार्यरत आहेत.

जगात सध्या ४४० पेक्षा अणुऊर्जा केंद्र असल्याची नोंद आहे. सर्वाधिक ९५ अणुऊर्जाकेंद्र सध्या अमेरिकेत आहेत. या सर्व देशांनी एकत्र येऊन सुरक्षेचे नियम ठरवले.

आज ‘प्रीपयत’ कडे सोविएत युनियन मधील एखाद्या वस्तू संग्रहालयाप्रमाणे बघितलं जातं. किव्ह मधील काही पर्यटन संस्था या ‘प्रीपयत’ दाखवण्यासाठी लोकांच्या सहल घेऊन जातात.

 

pripyat inmarathi 2

 

एक ऑपरेटर आणि सुपरवायझर एका शहराचं अस्तित्व नष्ट करू शकतात हे या घटनेमुळे लोकांच्या लक्षात आलं. कंपनीत काम करतांना प्रत्येकानेच सुरक्षा विभागाने आखून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?