' “सर्वाधिक चौकार”नुसार विजयी! : वाचा क्रिकेटमधील असेच इतर विचित्र नियम..! – InMarathi

“सर्वाधिक चौकार”नुसार विजयी! : वाचा क्रिकेटमधील असेच इतर विचित्र नियम..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०१९ सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात खेळला गेला. या अंतिम सामन्याने जगभरातील क्रिकेट रसिकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं.

न्यूझीलंड संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने तितक्याच धावा करत सामना बरोबरीत सोडवला. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवली गेली.

ही सुपरओव्हर सुद्धा टाय झाली तर ज्या संघाने फलंदाजी करताना सर्वात जास्त चौकार मारले तो संघ विजयी होईल असा नियम होता, आणि शेवटी तेच झाले.

सुपरओव्हर टाय झाली आणि निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला, कारण त्यांनी मारलेल्या चौकारांची संख्या जास्त होती.

 

final inmarathi
sportskeeda.com

 

या नियमाने अनेकांचे डोळे विस्फारले. पण खरंतर असे अनेक नियम क्रिकेटमध्ये आहेत जे अत्यंत विचित्र आहेत. चला तर मग जाणून घेउन क्रिकेट जगतातले असे अतरंगी नियम जे तुम्ही आजवर कधीही ऐकले नसतील..!

१) टाईम आउट

 

cricket-rule-marathipizza01
sportskeeda.com

 

विकेट पडल्यावर जर पुढचा बॅट्समन तीन मिनिटांच्या आत आला नाही, तर विरोधी टीमच्या अपीलनुसार अम्पायर त्या बॅट्समनला आउट ठरवू शकतात.

या रुलशी निगडीत एक प्रसंग सचिन तेंडूलकरसोबत घडला होता. परंतु त्याला आउट देण्यात आले नाही, कारण कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सचिन हा १८ मिनिटांसाठी फिल्डवर नव्हता.

क्रिकेट मधील आणखी एका नियमानुसार जर एखादा फिल्डर ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिल्डच्या बाहेर गेला तर जेवढ्या वेळासाठी तो फिल्डच्या बाहेर आहे तेवढ्या वेळासाठी तो बॅटिंग वा बॉलींग करू शकत नाही.

ही गोष्ट सचिनच्या बरोबर लक्षात होती, परंतु इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली नाही. चौथ्या दिवशी सामना सुरु झाल्यावर अवघ्या १३ मिनिटांमध्ये भारताच्या २ विकेट्स गेल्या.

आदल्या दिवशी सचिन १८ मिनिटांसाठी फिल्ड बाहेर होता, त्यामुळे त्याला अजून ५ मिनिटे फिल्ड बाहेर राहणे भाग होते. सर्वजण सचिन कधी बॅटिंगला जातो याची वाट पाहत राहिले.

 

sachin vs zimbambwe inmarathi
Indiatimes.com

 

परंतु सचिन काही बॅटिंगला आला नाही अखेर सौरव गांगुलीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो त्वरेने तयार झाला आणि स्वत: बॅटिंगसाठी उतरला.

साउथ आफ्रीकेचा कॅप्टन स्मिथचे येथे कौतुक करायला हवे. त्याने जर अम्पायरकडे अपील केले असते तर कदाचित सचिनच्या नंतर आलेला गांगुली टाईम आउट नियमाप्रमाणे बाद ठरू शकला असता. पण त्याने तसे केले नाही.

हा संपूर्ण प्रसंग तुम्ही या व्हीडियोमध्ये पाहू शकता.

 

 

२) लॉस्ट बॉल

 

cricket-rule-marathipizza02
zimbio.com

 

जर मॅच खेळताना बॉल हरवला तर फिल्डिंग करणारी टीम अम्पायरकडे लॉस्ट बॉलची अपील करू शकते. या अपील नुसार अम्पायर तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित करू शकतो.

३) हेल्मेट कनेक्शन

 

cricket-rule-marathipizza03
en.wikipedia.org

 

जर कॅच पकडते वेळी बॉल फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूच्या कोणत्याही प्रोटेक्टिव वस्तूला (हेल्मेट, पॅड, एल्बो गार्ड, कॅप) स्पर्श करून गेली आणि त्या नंतर त्याने कॅच घेतली तर बॅट्समनला आउट दिले जात नाही.

४) अम्पायरची परवानगी न घेता बाहेर गेलात तर ५ रन्स एक्सट्रा

 

cricket-rule-marathipizza05
readtiger.com

 

जखमी झाल्यावर एखादा फिल्डर जर अम्पायरची परवागनी घेतल्याशिवाय फिल्डच्या बाहेर गेला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्सट्रा ५ रन्स मिळतात.

५) एकापेक्षा जास्त वेळ बॉल मारण्याचा प्रयत्न न करणे

 

cricket-rule-marathipizza06
telegraph.co.uk

 

बॉलरने टाकलेला चेंडू बॅट्समनने मुद्दामहून एकाच वेळेस दोनदा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला आउट दिले जाते.

ही व्हिडियो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

 

६) नो अपील-नो आउट

 

cricket-rule-marathipizza07
rebrn.com

 

फिल्डिंग करणारी टीम जोवर  LBW किंवा Catch ची अपील अम्पायर कडे करत नाही तर अम्पायर आउट असल्यावर देखील बॅट्समनला आउट देऊ शकत नाही.

७) स्पायडर कॅम आणि बॉल कनेक्शन

 

cricket-rule-marathipizza07
quora.com

 

जर बॅट्समनने मारलेला चेंडू फिल्डवर घिरट्या घालणाऱ्या स्पायडर कॅमेराला जाऊन आदळला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येतो. त्यावर बॅट्समनला रन्स मिळत नाहीत, किंवा जर मैदानाला छत असेल आणि त्यावर जाऊन जरी चेंडू आदळला तर त्यावरही बॅट्समनला रन्स मिळत नाहीत तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित केला जातो.

८) रिटायर्ड आउट

 

cricket-rule-marathipizza09
dawn.com

 

जर बॅट्समन अम्पायरची परवानगी घेतल्याबिगर रिटायर्ड झाला तर त्याला अम्पायर रिटायर्ड आउट घोषित करू शकतो. हा नियम जास्त करून फ्रेंडली मॅचेस मध्येच पाहायला मिळतो.

९) हेल्मेट मिळवून देणार रन्स

 

cricket-rule-marathipizza04
quora.com

 

शॉट मारल्यावर जर बॉल विकेटकिपरने फिल्डवर ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन आदळला तर बॅटिंग टीमला ५ रन्स एक्सट्रा मिळतात.

विश्वास बसत नसेल तर पाकिस्तान आणि श्रीलंका या संघादरम्यान खेळवण्यात आलेला हा प्रसंग तुम्ही पाहायलाच हवा.

 

 

१०) हॅंडलिंग द बॉल

 

cricket-rule-marathipizza010
stuff.co.nz

 

जर एखाद्या बॅट्समनने आउट होण्यापासून वाचण्यासाठी मुद्दामहून स्वत: बॉल विकेटपासून लांब केला तर हॅंडलिंग द बॉल नियमानुसार त्याला आउट घोषित केले जाते.

या नियमाचा स्टीव्ह वॉजला कसा फटका बसला ते पहा.

 

 

कळले का हे क्रिकेटमधील काही विचित्र पण आजही वापरात असणारे नियम?? अहो मग शक्य तितकं शेअर करा आणि आपल्या दोस्तांनाही सांगा की!

हे देखील वाचा: (जेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला !)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?