' कोरोनाचा थेट हृदयावर हल्ला!! कोविडमुळे अशाप्रकारे होऊ शकतो हृदयविकार… – InMarathi

कोरोनाचा थेट हृदयावर हल्ला!! कोविडमुळे अशाप्रकारे होऊ शकतो हृदयविकार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधला नवीन स्ट्रेन खूपच घातक आणि अनेक नवीन लक्षणं घेऊन आला आहे. त्यामुळेच तो त्रास वाढवणारा ठरत आहे. कोरोनापीडित रुग्णांचा हार्ट अॅटॅकने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात खूपच वाढ होत आहे.

कलाकार, पत्रकार आदी अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा कोरोनामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाल्याच्या अनेक बातम्या आपण मागील काही दिवसांपासून ऐकत आहोत.

आज आपण कोरोना आणि हार्ट अटॅक यात नक्की कसा आणि काय संबंध आहे हे जाणून घेणार आहोत.

 

corona and heart inmarathi

 

==

हे ही वाचा : फार नाही – फक्त या १५ गोष्टी नियमित करा, तुमचं हृदय अगदी तंदुरुस्त राहील!

==

हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होतो त्यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हृदयातील स्नायूचा अधिक भाग निकामी झाला, तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावतो.

 

heart beats inmarathi

 

सध्याच्या नवीन स्ट्रेन असलेल्या कोरोनाने शरीरात प्रवेश केला, की या व्हायरसचा थेट प्रभाव हृदयावर पडतो असं काही पेशंट्समध्ये दिसून आलं आहे. काही लोकांमध्ये तर यांमुळे हृदयाच्या स्नायूंवर सूज येते. यामुळे हार्टच्या टिशूंना देखील धक्का पोहोचतो.

 

corona and heart3 inmarathi

 

हा कोरोना फुप्फुसांसोबतच शरीरातील इतर अवयवांसाठी देखील धोकादायक ठरत आहे. यात प्रामुख्याने हृदयाचा समावेश आहे.

कोरोना विषाणूमुळे काही रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अॅटॅक येत आहे.

डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार सर्वच कोरोनाग्रस्तांना हृदय विकाराचा झटका येईलच असे नाही. मात्र कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याने आपण काही मूलभूत आणि प्राथमिक उपचार घेऊन येणारा धोका टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

==

हे ही वाचा : हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

==

 

corona and heart2 inmarathi

 

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सोबतच चालणे हादेखील उत्तम पर्याय आहे. हार्टसाठी चांगल्या आणि आवश्यक अशा पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या आणि आहारतज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.

 

corona and heart8 inmarathi

 

ब्लड प्रेशर, हाइपरटेंशन, स्मोकिंग, हाई कोलस्ट्रॉल, जाड व्यक्तींना हार्ट अटॅकचा अधिक धोका असल्याने अशा व्यक्तींना कोरोनाचे किंवा हार्ट अटॅकचे कोणतेही लक्षण दिसल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.

==

हे ही वाचा : माणसाचं काळीज बंद पडलं तर सगळंच संपतं! जाणून घ्या कसं जपाल तुमचं हृदय…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

==

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?