' कोरोनामुक्त झाल्यावरही येणाऱ्या 'अशक्तपणावर' मात करण्याचे ७ सोप्पे घरगुती उपाय!

कोरोनामुक्त झाल्यावरही येणाऱ्या ‘अशक्तपणावर’ मात करण्याचे ७ सोप्पे घरगुती उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. असंख्य लोकांनी त्यांचा कोरोनामुळे जीव गमावला तर लाखो लोकं कोरोनाच्या जाळयात आले. कोरोना झालेल्या लोकांची रोजची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. मात्र या सर्वांमध्ये एक सकारत्मक बाजू म्हणजे कोरोनामुळे बरे होणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

corona tension inmarathi

 

कोरोना झालेला रुग्ण १४/१५ दिवसात बरा होतो. रूग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह तर येतात पण कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तीला ठणठणीत बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो.

मुख्य म्हणजे कोरोना झाल्यानंतर प्रचंड अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा वेळेनुसार कमी तर होतो.

===

हे ही वाचा कोरोनाचा थेट हृदयावर हल्ला!! कोविडमुळे अशाप्रकारे होऊ शकतो हृदयविकार…

===

तो अशक्तपणा लवकर कमी करण्यासाठी आणि कोरोनातून पूर्ण बरे होण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेऊ शकतो, काही खाण्यापिण्याची पथ्ये पाळून आपल्या शरीरातून कोरोनाला लवकरात लवकर घालवू शकतो.

 

corona patient inmarathi

 

आज या लेखातून आपण कोरोनातून बरे झाल्यानंतर घ्यायची काळजी आणि काही घरगुती छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत.

साधा आणि सोपा व्यायाम :

कोरोनातून बरे झाल्यानंतर सकाळी लवकर उठून थोडा आणि सोपा व्यायाम करा. मोकळ्या हवेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात राहा सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे व्हिटॅमिन डी शरीराला मिळेल.

घरातच किंवा टेरेसवर हळू हळू चालणे, मेडिटेशन करणे आदी साधे व्यायाम करा जेणेकरून तुम्ही फ्रेश राहाल, सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये तयार होईल.

प्राणायाम, अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम आदी करून ऑक्सिजनचा स्तर योग्य राखू शकतात.

 

pranayam inmarathi

 

ड्रायफ्रुटस खा :

रोज सकाळी रात्रभर भिजवलेले खजूर, मनुके, दोन बदाम, दोन अक्रोड खा. ड्रायफ्रुटसमुळे शरीर आतून मजबूत होते.

 

dry fruits inmarathi

 

योग्य आणि सकस आहार :

आहारामध्ये सर्व भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. कडधान्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतील. भाज्या आणि कडधान्यांच्या सेवनामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे लोह आणि कॅल्शियम शरीराला मिळेल.

 

krupa dharmaraj lunchbox inmarathi2

 

फळांचे सेवन :

टरबूज, डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, सफरचंद आदी सर्व फळांचे नियमित सेवन करा. सोबतच फळांचे ताजे ज्यूस आणि भाज्यांचे सूप देखील घ्या. यांमुळे शरीर डिहायड्रेड होण्यापासून वाचेल.

 

fruits inmarathi

 

उपाशी राहू नका :

दीर्घकाळ उपाशी राहू नका. दोन-तीन तासांच्या अंतराने काही तरी खा. दिवसभर भरपूर पाणी प्या. जेवणानंतर लगेच झोपू नका.

 

drinking water inmarathi

 

बाहेरचे खाणे टाळा :

घरातील साधे आणि सात्विक जेवण करा बाहेरचे खाणे आणि जंक फूड खाणे टाळा.

 

junk food eating inmarathi

 

लवकर झोपा :

रात्री जागरण टाळा. शक्य तितके लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.

 

sleep inmarathi

===

हे ही वाचा भारतीय संशोधकांची कमाल….कोरोनावर लसीइतकीच प्रभावी गोळी शोधून काढली

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?