' जांभई सुद्धा असू शकते आरोग्यदायी! वाचा जांभईचे फायदे.. – InMarathi

जांभई सुद्धा असू शकते आरोग्यदायी! वाचा जांभईचे फायदे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मीटिंगमध्ये, सभेमध्ये किंवा मित्रांशी बोलतानाही जांभया देणं हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. तिथे चाललेल्या विषयाकडे तुमचं लक्ष नाही असं समजलं जातं.

जांभई तशी संसर्गजन्य आहे. म्हणजे एकाने दिली, की समोरच्या व्यक्तीलाही जांभई येते. आता लेखाचं शिर्षक वाचूनही तुम्हाला कदाचित जांभई आली असेल किंवा लेख वाचतानाही जांभई येईल. म्हणजे लेख कंटाळवाणा आहे असं नाही, तर जांभई हा शब्दच असा आहे की, त्याचं नाव काढलं तरी जांभई येते.

 

yawning inmarathi

 

जन्मापासून केवळ अकराव्या आठवड्यात माणूस जांभई देतो. पण दुसरं कुणीतरी जांभई देताना बघून जांभई देण्याची सुरुवात मात्र वयाच्या पाचव्या वर्षापासून होते.

दुसऱ्याची जांभई बघून जांभई का येत असावी, याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये. जांभई देताना एक गोष्ट मात्र घडते, आपल्या तोंडाचा आ वासतो, जबडा खाली जातो, भरपूर हवा शरीरात येते, छाती भरून श्वास घेतला जातो, हार्ट रेट वाढतो, आणि मग श्वास सोडला जातो.

===

हे ही वाचा – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

===

ऑफिसमध्ये बसून किंवा घरातही काम करत असताना एखादी जांभई दिली, तर ती जांभई तुमच्या आरोग्यासाठी चांगली असते असं सांगितलं तर कदाचित कुणालाही खरं वाटणार नाही. लोकांचा असा समज आहे की जांभई दिली म्हणजे त्या व्यक्तीला आळस दिलेला आहे. परंतु खरं म्हणजे जांभई दिल्याने आपण आपल्या शरीरातील आळस घालवतो आणि जास्त प्रमाणात हवा शरीरात घेतो.

जांभई देण्याचेही फायदे आहेत तेच आता आपण बघू

मेंदूला मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा होतो

जांभई दिल्याने जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात जातो आणि आपला रक्तप्रवाह सुधारतो. मेंदूला मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो, त्यामुळे मेंदू फ्रेश होतो. मेंदूची मानसिक क्षमता वाढते.

 

yawning Inmarathi

 

अगदी कॉफी घेतल्यावर जो तरतरीतपणा येतो तसाच तरतरीतपणा जांभई दिल्याने येतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील यामुळे वाढते. आपल्या फुफ्फुसांना भरपूर हवेचा पुरवठा होतो. शरीरातील कार्बन डायॉक्साईड कमी होतो, आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.

कानातील अस्वस्थता/वेदना कमी

कानात वेदना असतील किंवा कानात दडे बसले असतील त्यावेळेस जांभई दिल्यास कानातले दडे कमी होतात. कान मोकळे झाल्यासारखे वाटतात.

विशेषतः विमान प्रवास करताना आपल्याला याचा अनुभव येतो. हवेच्या दबावामुळे कानात दडे बसतात त्यावेळी जांभई दिल्यास खूप बरे वाटते. जांभईमुळे दोन्ही कानातील हवेचा दाब समान राहतो. कानातील वेदना देखील जांभईमुळे कमी होतात.

 

ear pain inmarathi

 

जांभई येणं हे प्रेमाचं लक्षण असू शकतं

जांभई आणि प्रेम यांचा काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडेल. तर याचं उत्तर अमेरिकेतील एका संशोधनात आहे. २०११ मध्ये तिथल्या शास्त्रज्ञांनी २३ चिंपांझीवर प्रयोग केला.

त्यांनी त्या चिंपांझींना त्यांच्या ओळखीच्या तसेच काही अनोळखी चिंपांझीचे व्हिडिओ दाखवले. त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की, ओळखीच्या चिंपांझीचे व्हिडिओ हे चिंपांझी आळोखे पिळोखे देत बघत होते तर बिनओळखीच्या चिंपांझीचे व्हिडिओ लक्षपूर्वक बघत होते.

त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, ते २३ चिंपांझी त्या ओळखीच्या चिंपांझीवरच्या प्रेमापोटीच निवांत होते. पण नवीन चिंपांझी मात्र नक्की काय करत आहेत, हे ते सावधगिरीने बघत होते.

हे माणसांच्या बाबतीतही तितकंच लागू आहे. आपण आपल्या घरात आपल्या लोकांसमोर हव्या तितक्या जांभया देतो. तेच जर कुणी बाहेरचं घरी आलं, पाहुणे आले तर आपण त्यांच्यासमोर जांभई देत नाही, जांभई आली तरी ती दाबायचा प्रयत्न करतो.

===

हे ही वाचा – व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

===

sweet girl inmarathi

 

कामात बदल करा याची सूचना

कधी कधी तेच तेच काम करून पण कंटाळा येतो त्यावेळी आपल्याला जांभई येते. नावडत्या विषयावरील रटाळ भाषण ऐकताना देखील जांभया येतात.

याचा हाच अर्थ असतो, की आता कामात काहीतरी बदल करा. किंवा सरळ विश्रांती घ्या, डुलकी घ्या, झोप काढा. याचाच अर्थ आपल्या शरीराला काहीतरी बदल हवा असतो त्यावेळी जांभया येतात.

 

yawning at office inmarathi

 

जांभई हा संवादाचा प्रकार

आत्तापर्यंत आपण पाहिलं, की भूक लागल्यावर, कंटाळा आल्यावर, सतत एकच काम करत राहिल्याने आपल्याला जांभई येते. म्हणजेच आता या कामातून विश्रांती घ्या असा संदेश आपलं शरीर आपल्याला देत असतं.

हजारो वर्षांपूर्वी जेव्हा इतर कोणत्याच सुविधा नव्हत्या, तेव्हा लोक प्राण्यांपासून वाचण्यासाठी पहारा देत बसायचे. त्यावेळी जे लोक पहारा द्यायचे त्यांना झोप येत असेल त्यावेळेस त्यांना जांभया यायच्या, मग ते इतर दुसऱ्या लोकांना पहार्‍यावर बसवायचे आणि स्वतः झोपायचे. त्या काळातली जांभया येणं ही अशाप्रकारे देवाण-घेवाण होती.

 

stone age cave inmarathi

 

जांभया का येतात याचे उत्तर कदाचित अजूनतरी मिळालेलं नाही आणि पुढे मिळेल, की नाही याची खात्री सुद्धा नाही. पण जांभई आल्यावर आपण काय केलं पाहिजे, हे मात्र आता आपल्याला समजेल.

===

हे ही वाचा – सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

===

त्यामुळे जांभई आल्यावर आपल्या शरीराचे आभार माना. कारण आता आपल्या शरीराला कोणती गोष्ट चांगली आहे आणि ती केली पाहिजे ही सूचना आपलं शरीर आपल्याला देत असतं.

 

obama yawning inmarathi

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?