' कितीही घुश्श्यात असाल, तरी जोडीदाराला या ७ गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर...

कितीही घुश्श्यात असाल, तरी जोडीदाराला या ७ गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राग आणि भांडण हे दोन्ही शब्द एकमेकांशी फारच जोडलेले आहेत. अनेकदा आपण रागात असतो तेव्हा भांडण होतात. कधी कधी भांडण झाल्यामुळे आपल्याला राग येतो. कधी स्वतःचाच, तरी कधी समोरच्या व्यक्तीचा…

जेव्हा माणूस रागात असतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो समोरच्या व्यक्तीला दुखावतो. अनेकदा आपल्यावर कामाचा प्रचंड ताण आलेला असतो. घरातील काम, ऑफिसमधील काम किंवा कधीतरी ऑफिसमध्ये एखाद्याशी झालेले भांडण यामुळे आपण प्रचंड वैतागलेले असतो.

अशावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या समोर असते. मग ती आपली आई, बायको किंवा नवरा अशी कुठलीही व्यक्ती असू शकते. मग सारा राग आपण त्यांच्यावर काढतो. आपण त्यांना रागाच्या भरात बरंच काही बोलून जातो.

 

married-couple-fighting-InMarathi

 

कपड्यांवर पडलेले डाग निघणं शक्य असतं, पण अपशब्द वापरल्याल्यामुळे दुखावलेलं मन मात्र कायमचं दुःखी होतं. त्यामुळे तुम्ही कितीही रागात असाल, तरी देखील समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

जोडीदारावर अनेकदा आपला राग निघतो अशा वेळेस काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी. खालील शब्द कधीही तुमच्या भांडणात आणू नका. 

===

हे ही वाचा – जोडीदार निवडताना या ९ चुका झाल्या तर आयुष्यभर किंमत चुकवावी लागू शकते

===

१. तू मला समजून घेऊ शकत नाहीस

अनेकदा तुम्ही तुमच्या जोडीदारला म्हणता, की तू मला समजून घेत नाहीस. जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ होतो, की तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाही. त्याला तुमची काळजी नाही.

 

couple inmarathi 1

 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते, ती तुमची सर्वाधिक काळजी करत असते. जेव्हा तुम्ही अशी वाक्यं बोलता तेव्हा त्या व्यक्तीला नक्कीच या गोष्टीचं वाटतं. आपल्या जोडीदारला आपण समजून घेऊ शकत नाही का? अशी भावना निर्माण होते.

त्यामुळे तुम्ही कितीही रागात असाल तरीदेखील हे वाक्य आपल्या जोडीदाराला बोलू नका.

२. तुला जे करायचं ते कर… मला काही फरक पडत नाही

कधी कधी भांडण इतक्या टोकाला पोहचतं, की तुमचा जोडीदार सुद्धा प्रचंड रागात असतो. फार मोठी शाब्दिक चकमक होते. जेव्हा तुम्ही प्रचंड रागात असता, तेव्हा अगदी सहज बोलून जातात तुला जे कारायचं ते कर मला काही फरक पडत नाही.

काही फरक पडत नाही हे एक वाक्य तुमच्या नात्यांवर खूप मोठा परिणाम करून जातं.

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपल्या वागण्याचा काहीच फरक पडत नाही, ही भावना खूप दुःख देणारी असते. कारण कोणत्याही नात्यात एकमेकांविषयी असलेलं प्रेम आणि आपुलकी त्या नात्याला अधिक भक्कम करत असते.

 

couple-inmarathi

 

३. हा काय मूर्खपणा आहे…

अनेकदा जोडीदार एकमेकांना आपली मते सांगत असतात. तेव्हा अचानक दोघांचे विचार न पटल्यामुळे वाद निर्माण होतात. अचानक आपल्या जोडीदारांचे विचार अत्यंत चुकीचे वाटतात.

आपण त्याचे विचार अयोग्य आहेत, हे पटवून देत असतो. पण अचानक आपण ‘मूर्ख आहेस का? तुला खरंच काही समजत नाही.’ हे शब्द अनावधानाने वापरतो.

अशावेळी तुमचा जोडीदार नक्कीच दुखावला जातो. आपली इतकी जवळची व्यक्ती आपल्याला मूर्ख समजते, ही भावना क्लेशदायक ठरते.

त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जोडीदारला सांगायचे, असेल की तू चुकत आहेस. किंवा मला तुझे विचार पटत नाहीत. तर त्याला शांतपणे तसे समजावून सांगा. त्याला थेट मूर्ख म्हणून नका. जर तो समजून घेण्याच्या मन:स्थितीमध्ये नसेल, तर त्याला काही वेळानंतर तुमचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न करा.

 

indian couple 2 inmarathi

 

४. तू नेहमी असाच वागतोस/अशीच वागतेस

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणता, की तू नेहमी असंच वागतोस; त्याचा अर्थ त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही अप्रत्यक्षपणे असं सांगत असता. की तू नेहमी चुकीचं वागतोस, पण आम्ही तुला समजून घेतो किंवा सहन करतो.

 

couple inmarathi

 

अशावेळी त्या व्यक्तीला वाटते, की ती नेहमीच काहीतरी चुका करत आहे. तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला असं म्हणता, तेव्हा तुमचे भांडण आणखी वाढते. कारण समोरची व्यक्ती आधीच टेन्शनमध्ये असते. चिडलेली असते.

===

हे ही वाचा – या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…

===

५. तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सर्व चांगल्या वाईट गुणांसह स्वीकारलेलं असतं. त्यामुळे रागात असतानाही, चुकूनही तुमच्या जोडीदाराला ‘तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस’ असं म्हणू नका.

जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलता, तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की खरंच तुमच्या आयुष्यात येऊन त्यांनी चूक केली आहे.

त्यामुळे तुम्हाला कितीही राग आलेला असेल तरी देखील तुमच्या प्रेमाला त्यामध्ये आणू नका. कालांतराने तुमचा राग कमी होतो. पण समोरची व्यक्ती मात्र प्रचंड दुखावली जाते. त्यामुळे प्रेमासंबंधी काहीही बोलताना जरा जपूनच बोला.

 

Couple in Hotel InMarathi

 

तू आयुष्यात काय केलंस?

रागात काहीही बोलून जाणं, ही गोष्ट खूपच चुकते. ती व्यक्ती जेव्हा रागात असते, तेव्हा काहीही बोलून जाते, मात्र त्यामुळे त्यांची अनेक नाती दुरावली जातात.

अनेकदा पती-पत्नीचं भांडण होतं, तेव्हा पती किंवा पत्नी अगदी रागात बोलून जातात तू आयुष्यात काय केलंस?

जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला असा प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उभा केलेला असतो. तेव्हा तो सर्वाधिक चिडतो. भांडण अधिक वाढतं.

ही भांडणं इतकी टोकाला जातात, की कधी-कधी यामध्ये तुमच्या जोडीदारांचा स्वाभिमान देखील दुखावला जातो. जेव्हा जवळची व्यक्ती असा प्रश्न विचारते तेव्हा खूप खचल्यासारखं वाटतं. आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

 

frustrated women inmarathi

 

तू आणि तुझं कुटुंब निरुपयोगी आहे

भांडण जरी दोघांचं असलं तरी त्यामध्ये अनेकदा तिसऱ्या व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा उल्लेख केला जाते. नवरा बायकोच्या किंवा बायको नवऱ्याच्या कुटुंबाला नावं ठेवते.

तुझ्या घरातले आणि तू सारखेच आहात, तुम्हाला दुसऱ्याची किंमत नाही, तुझ्या घरच्यांनी असं केलं – तसं केलं. तुमचं संपूर्ण घरच बिनकामाचं आहे. तू तुझ्या आईवर गेला आहेस, अशी अनेक वाक्यं उच्चारली जातात.

आपला जोडीदार आपल्या कुटुंबाला नाव ठेवत आहे, याचं प्रचंड वाईट वाटते. एखादवेळी जोडीदार स्वतःबद्दल वाईट सहन करू शकतो, पण परिवाराबद्दल तो काही सहन करू शकत नाही.

 

criminal justice family inmarathi

 

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारा बरोबर आयुष्य घालविण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या कुटुंबाला देखील स्वीकारलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तुमच्या भांडणात आणू नका.

===

हे ही वाचा – चूक नेहेमी पुरुषाचीच? या ९ गोष्टीत स्त्रिया कमी पडल्या तर घरी कटकटी होणारच ना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?