' दीक्षित डाएट नव्हे तर चक्क वर्षभर उपाशी राहून वजन कमी करणारा अघोरी माणूस!

दीक्षित डाएट नव्हे तर चक्क वर्षभर उपाशी राहून वजन कमी करणारा अघोरी माणूस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अन्न, वस्त्र निवारा या आपल्या गरजा आहेत. यापैकी शरीरासाठी अन्न ही मुख्य गरज आहे. दर दोन/तीन तासांनी आपल्याला आपले शरीर भुकेची जणिव करून देते. आपणही बरेचदा वजन वाढेल , कोलेस्ट्रॉल वाढेल याचा विचार न करता मनसोक्त आपल्या अन्नपदार्थांचा आस्वाद घेत असतो.

निरनिराळ्या चवी अनुभवत असतो. जेवणाची एखादी वेळ जरी टळली तरी आपल्याला अस्वस्थ वाटतं. पण जर कोणी वजन कमी करण्यासाठी अन्नत्याग करत असेल तर?

आजकाल वजन नियंत्रणात ठेवून स्लिम आणि ट्रिम दिसण्याचा ट्रेंडच आलाय. काहीजण इतके वेट कॉन्शस झाले आहेत की एखाद्यावेळी किलोभर जरी वजन वाढलं तरी टेन्स होतात.

 

fitness inmarathi 8

 

किटो डाएट, दीक्षित डाएट, दिवेकर डाएट.. हे प्रकार तर तुम्ही हमखास ऐकलेच असतील. गेल्या काही दिवसात प्रसिद्ध झालेल्या दीक्षित यांच्या थिओरी लोकांच्या चांगल्याच लक्षात आहे.

===

हे ही वाचा वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे? – वाचा तर्कशुद्ध उत्तर!

===

त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीराला दोनवेळाच खायची गरज असते, पण अर्थात हे त्यांचं म्हणणं झालं कारण प्रत्येकाचं शरीर सारखं नसतंच, तसंच दीक्षित यांचं डाएट बऱ्याच लोकांना पटलं त्यांना त्यांचे परिणाम जाणवले तर काहींना ते अयोग्य वाटलं.

दीक्षित डाएटप्रमाणे २ वेळाच खा असं सांगितलं जातं, तर काही काही तज्ञ दर २ तासांनी किंवा ठराविक वेळेच्या गॅपने खायचा सल्ला देतात. यावरूनच आपल्याला समजतं ज्याला जे जमतं, शरीराला झेपतं तेच आपण केलं पाहिजे!

 

dixit diet inmarathi

 

याच्या अगदी विरूद्ध काहीजण असतात. जे वाढत्या वजनाची काळजी न करता मस्त खाऊन पिऊन आयुष्य जगतात. पण जर वजन कमीच करायचे असेल तर व्यायाम व आहार तज्ञांनी सुचवलेलै वेगवेगळे डाएट फॉलो करून वजन नियंत्रणात ठेवले जाते.

खूप खाणे आणि वजन वाढू नये म्हणून उपासमार करणे ह्या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. पण एखादी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी चक्क वर्षभरापेक्षा जास्त काळ उपाशी राहिली असेल तर? आणि ते ही आजच्या काळात नाही तर १९६५ मध्ये..आहे ना इंटरेस्टिंग?

चला जाणून घेऊ अँगस बार्बिएरी याची कहाणी ज्याने तब्बल ३८२ दिवस उपास करून १२५ किलो वजन कमी केले.

 

angus barbeiri inmarathi

 

१९६५ सालची गोष्ट.अँगस बार्बिएरी हा २७  वर्षांचा स्कॉटीश युवक आपल्या अतिरिक्त वजनाच्या समस्येने त्रस्त होता. इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे त्याचे एकूणच जीवनमान कमी आहे असे त्याला सांगण्यात आले होते.

यावर उपासाच्या द्वारे आपले वजन कमी करण्याचा वैयक्तिक निर्णय त्याने घेतला, जेणेकरून काही आयुष्य त्याला बोनस मिळू शकेल. वैद्यकीय मार्गदर्शन व उपचारासाठी त्याने मेरीफिल्ड हॉस्पिटलमधील तज्ञांची मदत घेतली.

यामध्येे रेग्युलर वैद्यकीय तपासणीचा नियम ठरवण्यात आला..जेणेकरून त्याच्या उपासाचा त्याच्या शरीरावर काही विपरीत परीणाम होईल.

ठरल्याप्रमाणे सुरवातीला उपवासाचा कालावधी ४० दिवसांचा ठरवण्यात आला. हा कालावधी अँगसने अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण केला.

४० दिवसांनंतर जेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अगदी वव्यस्थित होता आणि त्याचे शरीर या उपवासाला सकारात्मक प्रतिसाद देत होते.

यामुळे उत्साह वाढलेल्या अँगसने उपास पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतला. जितके दिवस त्याला शक्य होईल आणि त्याचे शरीर प्रतिसाद देईल तितके दिवस उपास करण्याचे त्याने ठरवले.

उपवास चालू केला तेव्हा त्याचे वजन होते २०७ किलो (४५६ पाउंड). जून १९६५ मधे सुरू झालेला उपास जुलै १९६६ मध्ये म्हणजे एकूण ३८२ दिवसांंनंतर थांबला. तेव्हा त्याचे वजन १२५ किलो (२७६ पौंड) कमी झाले होते.

 

angus 2 inmarathi

 

या कालावधीत तो केवळ कोमट पाणी, सोडा, ब्लॅक कॉफी, ब्लँक टी अशा द्रव पदार्थांचे सेवन करत असे. सोबत व्हिटँमिन व पोटँशिअमच्या गोळ्या देखील घेत असे.

रक्तशर्करेच्या आजारामुळे शरीरातील अवयव निकामी होत जाण्याची शक्यता असूनही अँगसने आपले वजन कोणत्याही शारीरिक नुकसानाशिवाय कमी करून दाखवले ते केवळ आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर.

३८२ दिवसांच्या उपासानंतरचा त्याचा पहिला आहार होता उकडलेले अंडे, बटर लावलेल्या ब्रेड स्लाईस आणि कॉफी..” या वर्षभरात मी अन्नाची चव विसरून गेलो होतो. आता हे अंडे खाल्यावर पूर्णत्व आलं..” अँगस म्हणाला होता.

या उपासानंतर अनेक वर्षं तो निरामय जगला. 1971 मध्ये त्याच्या या उपासाची नोंद दि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे करण्यात आली. परंतू अशा प्रकारचा अतिरेक हा शरीराला नुकसानदायक होवू शकेल यासाठी गिनीज वाल्यांनी अशा प्रकारच्या नोंदी घेणं बंद केलं.

===

हे ही वाचा – हे ५ “विचित्र” वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न सत्यात कधीच उतरले नाही!

===

angus 3 inmarathi

 

७ सप्टेंबर १९९० रोजी अँँगस याचे निधन झाले. काही असले तरी वैद्यक शास्त्र अशा प्रकारच्या इतक्या कालावधीच्या उपवासाने वजन कमी करण्याच्या अघोरी उपचाराचे समर्थन कधीच करत नाही.

योग्य मार्गदर्शन, आहार , व्यायाम या त्रिसूत्रीनेच अतिरीक्त वजन कमी करणे शहाणपणाचे ठरते!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?