' कपूर बंधूंकडे बघून आपल्याकडची भावकीतली भांडणं आठवतात...!!

कपूर बंधूंकडे बघून आपल्याकडची भावकीतली भांडणं आठवतात…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पूर्वीच्या काळी जमीनदार लोकांकडे भरमसाठ एकरांमध्ये शेती असायची. त्यांना श्रीमंत आणि धनिक मानले जायचे  पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कुळ कायद्यामुळे हेच लोक पहिले देशधडीला लागले. पूर्वी जमीन किंवा मोठ्या प्रॉपर्टीचे मालक असणे म्हणजे मानाचे समजले जाई. परंतु आजकाल हीच वडिलोपार्जित प्रॉपर्टी डोकेदुखी झाली आहे.

प्रॉपर्टी, जमीन यावरून होणारे कौटुंबिक वाद आपल्याला अनेक घरांमध्ये सर्रास दिसून येतात. कधी कधी लोक म्हणता आपली जमीन जुमला नाही ते बरं आहे बाबा कारण जमीन असली कि त्याच्या समान वाटणीवरून ह्या वादाला तोंड फुटते.

 

property dispute inmarathi

 

कधीकाळी एका ताटात जेवलेलले  भाऊ बहिणी एकमेकांना कोर्टाची पायरी चढायला लावतात. पुल देशपांडे यांनी सुद्धा त्यांच्या एक कलाकृतीमध्ये  सांगितले आहे की कोकणातील निम्म्या लोकांचे प्रॉपर्टी वरून भावंडांमध्ये वाद होता असतात अगदी हायकोर्टपर्यंत हे वाद जातात.

बॉलिवूड मधले प्रसिद्ध परिवार म्हणजे कपूर परिवार.या ना त्या कारणाने या परिवारातल कोण ना कोण चर्चेत असतंच. सामान्य कुटुंबात जसे वाद होतात तसेच त्यांच्यात ही कुटुंबात प्रॉपर्टी वरून वाद उदभवला आहे.

नुकतंच राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रॉपर्टी वर त्यांचा भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रीमा जैन यांनी हक्क जाहीर केला.पण राजीव कपूर यांचा विवाह झाला असल्याने त्यांच्या मालमत्तेवर त्यांच्या पत्नीचा हक्क येतो असे कोर्टाचे म्हणणे आहे.तर कपूर परिवाराच म्हणणं आहे की राजीव कपूर यांनी २००१ मध्ये विवाह केला होता तेच २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.त्यामुळे त्यांच्या पत्नीचा या मालमत्तेवर अधिकार येत नाही.

 

kapoor inmarathi

हे ही वाचा – हा अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे नक्की काय रे भाऊ? नेमके काय असते त्या कायद्यात वाचा

तेच कोर्टाने घटस्फोटाची कागदपत्रे जमा करायचे आदेश देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या केसला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर पत्नीच्या असण्याच्या शक्यतेने राजीव यांच्या भावंडांचा त्यांच्या मालमत्तेवर अधिकार थेट शून्य होतो. तर बघूया याच प्रॉपर्टी किंवा मालमत्ता कायद्याच्या बाबत विस्तराने पाहूया.

आपला भारत तसा धर्मनिरपेक्ष राष्ट्र. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने धर्म आचरण करायची परवानगी आहे. त्यामुळे त्या त्या धर्माच्या हिशेबाने आपल्या देशात मालमत्ता अधिकाराचे कायदे आहेत.

वारसा हक्क केव्हा लागू होतो,जेव्हा मृत व्यक्तीने आपला वारस निवडला नसेल किंवा मालमत्तेचे विभाजन केले नसेल.त्यावेळेस वारसा हक्क कायदा प्रकाशात येतो.

 

high court inmarathi

 

हिंदू सक्सेशन कायद्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या संपत्तीचे विभाजन करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. विवाहित असलेल्या स्त्रीकडील मालमत्ता त्यांना कशी प्राप्त झाले आहे (सासर,माहेर किंवा स्वकष्टाने) हे सुद्धा पहावे लागते. त्याप्रमाणे कायद्यात नमूद केलेल्या वेगवेगळ्या नियमाप्रमाणे संपत्तीचे विभाजन होते.

सर्वसाधारण प्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांच्या संपत्तीचे वाटप हे दिलेल्या प्राधान्या नुसार होते. जरी हे सुचिप्रमाणे जरी झालेले असले तरी ती संपत्ती समान प्रमाणात वितरित केली जाते. २०१५ च्या नव्या कायद्यानुसार विवाहित असलेल्या स्त्रीचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेत मुलाप्रमाणेचं समान हक्क आहे.

पण स्त्री च्या बाबतीत कायदा जरा वेगळं सांगतो.

२००५ च्या संशोधनानुसार स्त्री ला पुरुषाच्या बरोबरीचे हक्क दिले गेले आहेत. त्यामुळे स्त्रीच्या इच्छे नुसार तिच्या संपत्तीचे वितरण हे केले जाते. पण इच्छा पत्र दाखल न करता स्त्री मरण पावली तर त्या स्त्री च्या मालमत्तेचे मालकी हक्क हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ अंतर्गत केले जाते.

काय सांगतो हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६.?

तर स्त्री विना इच्छापत्र दाखल करता मरण पावली तर तिच्या संपत्तीचे वितरण हे

तिच्या पती आणि मुलांमध्ये होते.

पतीच्या वारसदारांमध्ये.

तिच्या आई वडिलांमध्ये.

आईच्या वारसदारांमध्ये.

वडिलांच्या वारसदारांमध्ये.

 

property inmarathi

हे ही वाचा – “माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा? समजून घ्या…!

वरच्या क्रमाने ती संपत्ती हस्तांतरित होते जाते. क्रमाक्रमाने जर तिचे वारस नसतील तशी संपत्ती हस्तांतरित होत जाते. म्हणजे जर मुलं आणि पती हयात नसतील तर पतीच्या वारसदारांमध्ये अर्थात सासू सासरे आणि त्याच्या परिवारातील सदस्य, अविवाहित असेल तर आई वडिलांमध्ये. ते सुद्धा नसतील तर पहिले आईच्या वारसदारांमध्ये आणि ते नसतील तर वडिलांचे वारसदार यांच्यामध्ये.

आणि वरील पैकी कोणीच नसेल तर सदर मालमत्ता सरकार दरबारी जमा होते.

सदर नियमावली ही पुरुषाला सुद्धा लागू होते.परंतू पुरुषाच्या बाबतीत त्याच्या पत्नीच्या परिवाराचा यात समावेश होत नाही.

 

rajiv inmarathi

हे ही वाचा – हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं

राजीव कपूर यांच कोणतच इच्छापत्र नसल्याने ते अविवाहित गृहीत धरले तर त्यांची संपत्ती त्यांच्या आई वडिलांच्या वारसदारांना म्हणजे त्यांच्या भावंडाना मिळणार.

पण सरकार दरबारी त्यांची विवाहित असल्याची नोंद असल्याने कोर्टाने त्यांच्याकडे घटस्फोट संबंधित कागदपत्रे मागितली आहेत.

तर एकूणच एखाद्याच्या संपत्तीचे वितरण हे त्याच्या मयता नंतर अशा पद्धतीने होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?