' नासा मंगळ मोहिमेतील सर्वात मोठा अडसर या भारतीयाने असा सोडवला की सगळे बघतच राहिले

नासा मंगळ मोहिमेतील सर्वात मोठा अडसर या भारतीयाने असा सोडवला की सगळे बघतच राहिले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मंगळ या ग्रहाचा भारतीयांनी बऱ्यापैकी धसका घेतला आहे. पत्रिकेत कडक मंगळ आहे म्हटलं की लोकांचं धाबं दणाणलं म्हणून समजा. नाना पूजा पाठ करुन, शांती करुन त्याचं कडकपण कमी करायला लोक धडपड करतात.

लगे रहो मुन्नाभाई सिनेमात पण हा मांगलिक असण्याचा मुद्दा मांडला आहे. फार कशाला आपले मॅन ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन यांनी पण आपली सून ऐश्वर्या राय हिची मंगळ शांती करुन मगच अभिषेक बच्चन सोबत तिचं लग्न केलं.

एकंदरीत काय तर मंगळ हा लोकांना दहशत घालणारा ग्रह आहे. पण विज्ञान या सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करत असतं.

===

हे ही वाचा अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

===

mangal dosh inmarathi

 

कवि, प्रेमिक, लहान मुलं या सर्वांना आपलासा वाटणारा चंद्र प्रत्यक्षात कसा आहे याची खातरजमा थेट चंद्रावर मोहीम काढूनच केली. मग नासाची पुढची मोहीम मंगळावर जीवसृष्टी आहे का हे बघण्यासाठी होती.

पाथफाईंडर मंगळावर पाठवून त्याचा श्रीगणेशा पण केला. मंगळावर असलेले खाच खळगे पाथफाईंडरनं पाठवले सुद्धा. आजवर मंगळावर असलेल्या खडकांचे, भूभागाचे फोटो आपल्याला नासाच्या शास्त्रज्ञांमुळे बघायलाही मिळाले आहेत.

आता याच्याही पुढचा टप्पा म्हणजे, मंगळावरील जीवसृष्टी, खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी पर्सिव्हरन्स नावाचा रोव्हर नासाने मंगळावर उतरवला आहे. हा रोव्हर तेथील खडकांचे नमुने, त्यात काही जीवसृष्टी आहे का हे अभ्यासण्यासाठी ते एका ट्यूबमार्फत पृथ्वीवर पाठवणार आहे.

या रोव्हरसोबत एक हेलिकॉप्टर मंगळावर पाठवण्यात आले आहे. त्याचे नाव आहे इंज्युईनिटी. या इंज्युईनिटी हेलिकॉप्टरचे वजन केवळ १.८ किलो आहे. त्याचे पंखे केवळ चार फूट आहेत.

 

mars helicopter inmarathi

 

इंज्युईनिटी केवळ कमी दाबाच्या वातावरणात हेलिकॉप्टर कसे उड्डाण करु शकते हे बघण्यासाठी हे हेलिकॉप्टर तयार करुन पाठवले आहे.

या हेलिकॉप्टरने केलेलं पहिलं उड्डाण यशस्वी झाले आहे. त्याहून आनंदाची बातमी अशी की, हे हेलिकॉप्टर बनवणारा भारतीय शास्त्रज्ञ आहे डाॅ. बाॅब उर्फ बालाराम.

१९६० साली दक्षिण भारतात जन्मलेल्या बालाराम यांना लहानपणापासूनच अवकाशाबद्दल वेड होतं. त्यांच्या या आवडीसाठी त्यांच्या काकांनी अमेरिकन काॅन्सुलेटकडून माहिती मागवली. त्या पत्राचं उत्तर आलं आणि बालाराम खुश झाला. नासाच्या चांद्रमोहीमेच्या बातमीनं तर त्यांना अत्यानंद झाला होता.

===

हे ही वाचा वर्क फ्रॉम होम करत यांनी थेट मंगळावरचं यान घरून कंट्रोल केलं…!

===

बाॅबनी आय आय टी मद्रास येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. नंतर तिथेच एम एस केलं. नंतर न्यूयॉर्कमध्ये त्यांनी काँप्युटर सिस्टीम मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि पीएचडी पण मिळवली.

आता ते नासाच्या मंगळ मोहीमेतील चीफ इंजिनियर म्हणून काम पाहतात. या इंज्युईनिटी हेलिकॉप्टरने काल मंगळावर यशस्वी उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर तयार करणारा हा शास्त्रज्ञ भारतीय आहे ही किती अभिमानाची गोष्ट आहे.

 

dr bob inmarathi

 

३० सेकंदात हवेत उडून पुन्हा लँडिंग करणारे हे हेलिकॉप्टर पृथ्वीवरुन नियंत्रित केलं जात होतं.

याबाबत बाॅबनी सांगितलं, ३५ वर्षातील त्यांचा अनुभव आहे मंगळावरील हवामान, वातावरण हे पृथ्वीवरील वातावरणापेक्षाही खूप हलकं आहे आणि अशा ठिकाणी उड्डाण करणं सोपं नसतं. राईट बंधूंनी पहिल्यांदा विमान उडवलं ते १२० सेकंद आणि १२ फूट उंचीवर.. आम्ही ३० सेकंद हेलिकॉप्टर उडवलं पण त्यावेळी अक्षरशः श्वास रोखला गेला होता.

पृथ्वीवर जेव्हा आपण विमान किंवा हेलिकॉप्टर उडवतो, ते १ लाख फूट उंचीवर उडवतो म्हणजे साधारण ३०,५०० मीटर उंचीवर. पण मंगळावर जर या ताकदीने ते उडवलं तर पृथ्वीपेक्षा सातपट वर जाईल. कारण तेथील वातावरण.

पृथ्वीपेक्षा मंगळावर कार्बन डायऑक्साइड हा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील वातावरण अतिशय हलके आहे. मंगळावर प्रत्येक वस्तू हलकी असते. म्हणून या उड्डाणाला जास्त वेळ दिला नाही. केवळ ३० सेकंद!

 

mars climate inmarathi

 

पण यानंतर पुढची उड्डाणं ही जास्त वेळाची असतील. हे उड्डाण यशस्वी झाल्याचा आनंद सर्वांना आहे.. नासाला, बाॅबना.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना.

बाॅब बालाराम नासा मधील भारतीय शास्त्रज्ञांपैकी दोन नंबरचे शास्त्रज्ञ आहेत. पहिल्या नंबरच्या शास्त्रज्ञ आहेत स्वाती मोहन.

अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी म्हटलं आहे, अमेरिकेत भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ फार चांगली प्रगती करत आहेत आणि आम्हाला अशा लोकांचा अभिमान वाटतो. आपल्या भारतीय शास्त्रज्ञ असलेल्या डाॅ. बाॅब यांच्या या कामगिरीमुळे आपल्यालाही त्यांचा अभिमान वाटणारच.. नाही का?

===

हे ही वाचा अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?