' ‘अबला नारी’ हा समज ‘अश्याही’ प्रकारे पार उधळून लावणाऱ्या ८ स्त्रिया… – InMarathi

‘अबला नारी’ हा समज ‘अश्याही’ प्रकारे पार उधळून लावणाऱ्या ८ स्त्रिया…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘डॉन’ हा शब्द जरी उच्चारला. तरी आपली सगळ्यांची बोबडीच वळते. दाऊद, छोटा राजन, शकील, छोटा शकील, चंदन तस्कर विरप्पन, अरुण गवळी अशा काही कुप्रसिद्ध व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यांपुढे येतात.

यांच्या धंद्याचे क्षेत्र किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘अड्डे’ बघितले, की बॉलीवूडच्या कृपेमुळे मुंबई आणि मुंबईच्या काही प्रसिद्ध जागा आपल्या ध्यानात येतात.

सोन्याचे किलो किलो भर दागिने, हातात प्रत्येक बोटात अंगठी, चेन, हाय प्रोफाइल संबंध, ड्रग्स हे सगळं कसं अगदी सहज डोळ्यांपुढून सरकतं.

या सगळ्या दादांनी एकेकाळी भारतात इतकी दादागिरी पसरवून ठेवली होती, की जिकडे तिकडे यांचीच भीती आणि बोलबाला होता. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या अशा बलाढ्य नेटवर्कमध्ये स्त्रिया सुद्धा काही मागे नव्हत्या?

महिला डॉन म्हटलं, की एक फुलन देवी इतकंच आपल्याला माहिती आहे. पण यापुढे जाऊन सुद्धा एक वेगळं विश्व आहे, हातात बंदूक आणि डोक्यात राग असलेल्या अनेक स्त्रियांची दहशत पसरलेली होती हे आपल्याला ठाऊकच नाही.

 

phoolan devi inmarathi

 

गंगूबाई काठियावडी, रझिया या चित्रपटांमुळे अनेक कथा आता आपल्या समोर येऊ लागल्या आहेत. पण एक स्त्री संसार, प्रेम, जिव्हाळा सोडून अंडरवर्ल्डचा क्रूर, कपटी मार्ग का निवडते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया भारतातील काही प्रसिद्ध “लेडी डॉन्स” च्या कहाण्या.

===

हे ही वाचा – मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा

===

१. के.डी. केमपम्मा

बँगलोरमध्ये के.डी.केमपम्मा ‘सायनाईड किलर’ या नावाने प्रसिद्ध होत्या. केमपम्मा अगदी दिवसा ढवळ्या सुद्दा आपल्या टार्गेटला फूस लावून एखाद्या निर्जन स्थानी नेऊन लुटून घेत असे.

तिला आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि नंतर त्यात बदल करून जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. केमपम्माची इतकी भीती पसरली होती की लोक अनोळखी स्त्रीशी बोलायला, तिला मदत करायला घाबरायचे.

कोणती स्त्री केमपम्मा सारखी असेल नसेल ही भीती त्यांच्या मनात घर करून होती. पण तिच्या अटकेनंतर परिस्थिती हळू हळू निवळली.

 

k d kempamma inmarathi

 

२. अंजली माकन

बँक फ्रॉड करणारे निरव मोदी आणि विजय मल्ल्या वगळता अंजली माकन हे नाव सुद्धा बरंच प्रसिद्ध आहे. अंजली वर दीड करोडचा बँक फ्रॉड केल्याचा आरोप होता.

 

vijay-mallya-marathipizza01

 

अंजलीने अशी काही शक्कल लढवली,की जेव्हा बँक अधिकाऱ्यांना तिच्या विरुद्ध पुरावे सादर करण्यास सांगितले तेव्हा ते चक्क अपयशी ठरले, आणि संधी साधून अंजली फरार झाली.

तिच्या नावाची RED corner notice म्हणजेच ‘४४ देशांत जारी केलेलं अरेस्ट वॉरंट’ आज भारतीय पोलीस खात्यांनी जाहीर केली आहे. इतक्या देशांची पोलीस मागावर असूनही अंजलीचा कुठेच पत्ता नाही.

अमिताभचा “डॉन को पकडना मुश्किल हि नही, ना मुमकीन है।” हा डायलॉग अंजली ने अगदी खरा करून दाखवलाय.

३. शशिकला रमेश पाटणकर उर्फ बेबी

मुंबईच्या सगळ्यात मोठ्या ड्रग पेडलर्स पैकी एक असलेल्या शशिकलाने ड्रग्स विकून जवळ पास १०० करोड इतकी संपत्ती गोळा केली होती.

शशिकलाचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा होता, पण कमी वेळात गडगंज श्रीमंत व्हायच्या हव्यासा पायी ती ड्रग डिलिंगमध्ये शिरली. २०१५ साली तिला अटक झाली असून आज ती गजाआड आहे.

 

shashikala ramesh patankar inmarathi

 

४. जेनाबाई दारूवाली

जेनाबाईची एक माफिया, डॉन बनण्याची सुरुवात राशन म्हणजे धान्याची काळाबाजारी करून झाली. धान्याचा काळा बाजार करता करता ती दारूच्या काळाबाजारीकडे वळली आणि त्यातून चिक्कार पैसे कमवू लागली.

तिने दारूच्या काळाबाजरी व्यतिरिक्त दुसरा कोणताच धंदा केला नाही. तिच्या मुंबईतील नागपाडा भागातील घरी मोठे मोठे अंडरवर्ल्ड डॉन जसे करीम लाला, हाजी मस्तान आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी सतत भेटीला येत असत.

हाजी मस्तान तर तिला आपली मोठी बहीण मानायचा. तिची कुठलीच विशिष्ट गँग नव्हती पण तरीही पूर्ण अंडरवर्ल्ड जगात तिचा शब्द कोणीच खाली पडू देत नसे.

 

jenabai daruwali inmarathi

===

हे ही वाचा – या ‘लेडी डॉन’ च्या इशाऱ्यावर दाऊद आणि हाजी मस्तान सुद्धा नाचायचे…

===

५. संतोकबेन सरमनभाई जडेजा

गुजरातच्या काठियावडची माफिया क्वीन संतोबेन सरमनभाई जडेजाची गोष्ट फार निराळी आहे. संतोबेनचे पती हे स्थानिक पातळीवरील दादा होते आणि तिथल्याच एका भाईने त्यांची हत्या केली होती.

या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या पतीच्या गॅंगची सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी ती अंडरवर्ल्ड मध्ये शिरली.

तिने आणि तिच्या गँगने तिच्या पतीच्या १४ हत्याऱ्यांचा खात्मा केला. आज तिच्यावर १४ तर तिच्या गँग वर ५०० हुन अधिक हत्यांचे गुन्हे दाखल आहेत.

शबाना आजमीचा ‘godmother हा सिनेमा संतोबेनच्याच जीवनावर आधारित आहे. १९९०-१९९५ ही ५ वर्षे संतोबेन आमदार म्हणून राजकारणातही सक्रिय होती.

 

santokben jadeja inmarathi

 

६. बेला आंटी

७० च्या दशकात मुंबईत दारूचा काळाबाजार करण्यासाठी एकच व्यक्ती प्रसिद्ध होती. ती म्हणजे बेला आंटी.

 

daru black market inmarathi

 

पोलिसांना मोठाली लाच देऊन गप्प करून बेला आंटी आपला धंदा चालवत असे. कितीही मोठा अंडरवर्ल्ड डॉन असो, तिच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचं कोणाचंच धाडस नव्हतं.

७. समीरा जुमानी

गँगस्टर अबू सालेमची पत्नी समीरा जुमानीचा बॉम्ब स्फोट, हत्याकांड, फ्रॉड, पैसे वसुली अशा अनेक अपराधांमध्ये सहभाग आहे. सध्या ती भारतातून फरार असून कुठे आहे याचा कोणत्याच देशाच्या पोलीस खात्याला थांग पत्ता लागत नाहीये.

 

abu salem inmarathi

 

तिचं नाव जगातील मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

८. रेश्मा मेनन आणि शबाना मेनन

रेश्मा मेनन ही टायगर मेननची पत्नी आहे तर शबाना मेनन ही अयुब मेननची पत्नी आहे. संपूर्ण मेनन कुटुंबाचा १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहे.

 

tiger menon family inmarathi

 

या बॉम्बस्फोटात या दोन्ही जावांचा मोठा वाटा आहे असंही म्हटलं जातं. या दोघी भारतात वॉन्टेड असून, कराची पाकिस्तानमध्ये लपलेल्या आहेत असं म्हटलं जातं.

===

हे ही वाचा – खंडणीसाठी बॉलिवूडकरांना धमकावून, स्वतःच त्याबद्दल पोलिसांना सांगणारा ‘चहावाला’!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?