' एनर्जी आणि इम्युनिटी उत्तम ठेवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? – InMarathi

एनर्जी आणि इम्युनिटी उत्तम ठेवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंघोळ/स्नान आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्यासाठी अंघोळ महत्वाचीच. मग ती राजेशाही थाटातली निवांतपणीची असो, टबबाथ असो, शॉवरमधे बाथरूम सिंगींग करत केलेली असो की धावतपळत केलेली कावळ्याची अंंघोळ असो..अंघोळ हवीच!

रोज सकाळी अंघोळीसाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात. गरम पाणी अथवा थंड पाणी. ते जरी आपल्याला ठरवायचे असले तरी दोन्ही प्रकारच्या अंघोळींचे फायदे आपल्याला मिळू शकतात.

आपल्याकडे आयुर्वेदाने अंघोळीचे महत्व आणि स्नानांचेही प्रकार सांगितले आहेत. आश्चर्य वाटले ना? हो. स्नान/ अंघोळीचे अनेक प्रकार आहेत..पण त्यात महत्वाचे ठरते पाणी. गार की गरम.

 

bath inmarathi

===

हे ही वाचा ६७ वर्षांत अंघोळही न करणारा तो, आरशात स्वतःला न्याहाळून कसं दिसायचं ते ठरवतो!

===

यावरच ठरतात त्या प्रकारच्या अंघोळीचे मिळणारे फायदे..जे आपल्याला निरोगी आणि निरामय जीवन जगायला मदत करतात.

गरम पाण्याने अंघोळ करणारे जसे आहेत तसे थंड पाण्याने अंघोळ करणाऱ्यांची संंख्याही मोठी आहे. दिवसा़ंतून तीन वेळा अंघोळ करणारेही अनेक आहेत.

साथीचे रोग, त्वचारोग, उष्णता यांसाठी स्नान हा वैयक्तिक स्वच्छतेचा सर्वोत्तम पर्याय आहे. गरम किंवा गार पाण्याच्या अंघोळीच्या शरीराला होणाऱ्या फायद्यांमुळे त्याच्या द्वारे काही त्वचारोग, स्नायूंची दुखापत यावरही उपचार करता येतात. यालाच वॉटरथेरपी असेही म्हणतात.

चला तर मग पाहूयात गरम किंवा थंड पाण्याच्या अंघोळीचे फायदे.

गरम पाण्याच्या अंघोळीचे फायदे :-

दिवसभराच्या हेक्टीक दिनचर्येने थकलाय? मग शरीर तणावमुक्त करणारा गरम पाण्याचा एक शॉवर तुम्ही घ्यायलाच हवा. जो तुमच्या शरीराला आराम तर देईलच पण तुमच्या मनालाही रीलॅक्स करेल. तुम्हाला गरम पाण्याने अंघोळ केल्याने उबदार वाटेल. शांत व गाढ झोप लागेल.

 

bath 2 inmarathi

 

स्नायूंचे आजार, संधीवातासारखी दुखणी यांतही गरम पाण्याची अ़ंघोळ फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तर सकाळी लवकर उठून गरम पाण्याने केलेले अभ्यंगस्नान तुमचा उत्साह वाढवते.

आजारी व्यक्तीसाठी गरम पाण्याची अंघोळ उपचारासारखे काम करते. गरम पाण्यामुळे त्वचेवरील चिकटपणा, धूळ, तेलकटपणा, टॉक्झीन्स निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. त्वचेवरील रोमछिद्रे उघडली जाऊन त्वचेला आराम मिळतो. म्हणून रीलँक्स व्हायचंंय? मग अंघोळीसाठी गरम पाणी मस्ट.

गार पाण्याच्या अंघोळीचे फायदे :-

दिवसाची सुरवात उत्साही आणि खेळकर करायची असेल तर गार पाण्याच्या अंघोळीला पर्याय नाही. गार पाण्याच्या अंघोळीने शरीराचे रक्ताभिसरण तर वाढतेच पण मेंदूही ताजातवाना होतो.

त्वचारोग तज्ञांच्या मतानुसार थंड पाण्याची अंघोळ त्वचेला तजेलदार आणि तरूण बनवते. केसांना चमकदार बनवते.

===

हे ही वाचा हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!

===

वर्षभर थंड पाण्याने अंघोळ करणारे लोक जास्त उत्साही असण्यामागचे हेच सिक्रेट आहे. थंड पाण्याची अंघोळ तुम्हाला जास्त निरोगी बनवते.

 

bath with cold water inmarathi

 

याशिवाय गरम/गार पाण्याच्या अंघोळीचे अजूनही बरेचसे फायदे आयुर्वेदाने सांगितले आहेत. तेल,उटणे यांच्यासोबतचे गरम पाण्याचे स्नान तुम्हाला सौंदर्य प्रदान करते आणि विविध चिकीत्सापद्धतींमध्ये सुचवलेले गार पाण्याचे स्नान तुम्हाला निरोगी बनवते. पाहूया गार/गरम पाण्याच्या अंघोळीचे अतिरीक्त फायदे..

१) त्वचेची सखोल स्वच्छता :

 

skin care inmarathi

 

गरम पाण्याच्या अंघोळीमुळे त्वचेवरील धूळ, चिकट घाम, त्वचेवर असलेले इतर विषाणू दूर व्हायला मदत होते. ते त्वचेत खोलवर जाऊन स्वच्छता करते. तर गार पाण्याच्या अंघोळीमुळे त्वचा तजेलदार व्हायला मदत होते.

जरी गरम पाण्याने अंघोळ केली तरी शेवटी थंड पाण्याचा थोडा शिडकावा करावा. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्वचेचा पोत सुधारतो. केसही गळायचे कमी होतात.

 

२) दुखरे स्नायू व इतर अवयवांसाठी :

 

backpain inmarathi

 

खूप शारीरीक कष्टाचे काम केल्यानंतर गरम पाण्याने केलेले स्नान शरीरातील स्नायूंवरील ताण कमी करते. गरम पाण्यामुळे मुका मार लागून दुखापत झालेल्या भागालाही आराम मिळतो.

व्यायामानंतर आवर्जून आधी गरम पाण्याने व नंतर गार पाण्याने अंघोळ केली तर व्यायामामुळे स्नायूंना आलेला ताठरपणा कमी होऊन त्यांची लवचिकता वाढायला मदत होते.

 

३) एकाग्रता, सतर्कता आणि रोगप्रतिकारशक्ती :

 

immunity inmarathi

 

ज्या लोकांना सतत सतर्क रहावे लागते असे लोक तसेच विद्यार्थी, उष्णतेशी संबंधीत काम करणारे यांना गार पाण्याच्या अंघोळीचा सल्ला दिला जातो.

गार पाण्याच्या अ़ंघोळीमुळे श्वासोच्छ्वास दीर्घ होऊन शरीरात उब निर्माण होते, रक्ताभिसरण वाढते त्यामुळे उत्साही वाटते. सतर्क रहायला मदत होते व कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करता येते.

एका सर्वेक्षणात हे ही सिद्ध झाले आहे की गार पाण्याच्या अंघोळीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते..आणि हे आश्चर्यकारक असले तरी खरे आहे.

===

हे ही वाचा बाथरूम मध्ये गॅस गिझर वापरत असाल, तर अपघात टाळण्यासाठी या सेफ्टी टिप्स नक्की वापरा आणि मित्रांनाही सांगा

===

४) निद्रानाश, वजन आणि सर्दी-पडसे :

 

sleeping girl inmarathi

 

रात्री झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ केल्यास एक आरामदायी, शांत झोपेची शक्यता निर्माण होते. तर थंड पाण्याच्या स्नानामुळे शरीरातील चरबी उत्तेजीत होऊन कमी व्हायला मदतच होते.

गरम पाण्याने व त्याच्या गरम वाफेमुळे छाती, घसा या़त साठलेला कफ विरघळतो आणि बाहेर पडतो. नाकाच्या पोकळीत साठलेली सर्दी देखील बाहेर पडते.

कंबरेच्या दुुखण्यासाठीही गरम/गार पाण्याच्या कटीस्नानाचा उपयोग होतो.

तेव्हा स्फुर्तीदायक दिवसासाठी सकाळी गार पाणी व शांत आणि आरामदायी झोपेसाठी रात्री गरम पाणी अंघोळीसाठी वापरावे व स्वतःला चिरतरूण ठेवावे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?