' सुंदर पिचाईचे हे ६ कानमंत्र म्हणजे तुमच्या हमखास यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली…!! – InMarathi

सुंदर पिचाईचे हे ६ कानमंत्र म्हणजे तुमच्या हमखास यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॉम्प्युटर आणि  इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाला माहितीचा महासागर उपलब्ध करुन देणारं गूगल. या गूगलवर काहीही विचारा उत्तर मिळतंच. कोणताही विषय वर्ज्य नसलेलं गूगल माहितीचा अनभिषिक्त सम्राट आहे असं म्हणायला हरकत नाही.

एक प्रश्न विचारला तर त्याचे दहा पर्याय आपल्यासमोर ठेवणारं गूगल. विविध प्रकारचे व्हिडिओ, पुस्तकं, पदार्थ, सिनेमे, आरोग्य जगातल्या कोणत्याही विषयाचं वावडं नाही गूगलला.‌

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशा या गूगलच्या सिईओ पदावर सुंदर पिचाई हे भारतीय नाव ठळकपणे दिसतं. २०१५ साली सुंदर पिचाई गूगलचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

sundar pichai inmarathi

 

सुंदर पिचाई म्हणजे चेन्नई येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. स्वभावाने अत्यंत नम्र असलेल्या सुंदर यांचा करिअरचा प्रवास अगदी छोटा पण नजरेत भरेल असा आहे.

त्यांची काम करण्याची पद्धत, त्यासाठीची तत्त्वं आणि दृष्टीकोन हा खूप मोठा भाग आहे. सुंदर पिचाई हे बाॅस नाही तर लीडर आहेत. कारण बाॅस सहकाऱ्यांना फक्त आज्ञा देतो पण लीडर आपलं काम करताना सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेतो.

लीडरकडं नेतृत्व असतं. कामं करायची पद्धत त्याला माहीत असते.. तो रस्ता माहित असतो आणि तो रस्ता सहकाऱ्यांना दाखवण्याची वृत्ती असते. जेव्हा सुंदर पिचाईंचा प्रवास आपण पाहतो तेव्हा एक नाही तर अनेक गोष्टी शिकता येतात.

कोणतेही यश मिळविताना ते मिळवण्यासाठी काय हितकारक आहे, आणि काय नियोजन केले तर यशस्वी होता येते हेच पिचाईंचा प्रवास आपल्याला सांगतो.

===

हे ही वाचा – जगात अशक्य असं काहीच नाही हे सांगणारी गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा

===

सुंदर पिचाईंची यशाची सूत्रे-

१. महत्त्वाकांक्षी बना

जेव्हा करिअर करायचं असं ठरवता तेव्हा सगळ्यात पहिले पाऊल म्हणजे मनात महत्त्वाकांक्षा जागी करणं. मला यशस्वी व्हायचंच आहे, असं निग्रहाने ठरवा. आपण यशस्वी होणारच आहोत, असा निश्चय करा.

सुंदर पिचाई जेव्हा गूगलच्या टीममध्ये काम करु लागले तेव्हा गूगल हे सर्च इंजिन म्हणून कुणालाही माहीत नव्हतं.

प्रचंड माहिती गोळा करायचं काम करायचं होतं. सुंदर पिचाईंनी ते काम आव्हान म्हणून स्वीकारलंच, शिवाय बिंग या मायक्रोसॉफ्टच्या सर्च इंजिनपेक्षा प्रभावी आणि सोपं सर्च इंजिन बनवणं कसं आवश्यक आहे हे पण पटवून दिलं.

त्यावेळी मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हा प्रोग्राम सर्च इंजिन म्हणून वापरला जाई आणि तो अँड्रॉइड फोनमध्ये वापरायला सोपा नव्हता.

 

google chrome for android inmarathi

 

हे सारं काही त्यांनी आपल्या कंपनीत पटवून दिलं.. आज गूगल क्रोम ब्राऊझर सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राऊझर आहे, हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही.

२. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा

होय… जे ध्येय, जी महत्त्वाकांक्षा तुम्ही बाळगली आहे तिचा हिरीरीने पाठपुरावा करा. असं करणं अजिबातच चुकीचं नाही.

आपल्या एका भाषणात सुंदर पिचाई यांनी सांगितलं आहे, की ते चेन्नईत असताना एका सामान्य टेलिफोनसाठी त्यांना किती दिवस वाट बघावी लागली होती. पण नंतरचा गूगलपर्यंतचा प्रवास त्या फोनमुळेच तर झाला होता. आज त्यांच्या फोनची वाट किती व्यक्ती बघत असतील याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

 

sundar pichai using phone inmarathi

 

३. स्वतःचा शोध घेत रहा

आपण रोज एका नव्या दिवसासह जागे होतो. रोज नवा अनुभव घेत नव्याने परिपक्व होत असतो. यात आपण काय करु शकतो हे आपल्यालाही जाणवत रहातं.

येणाऱ्या अपयशांनी आपण अनुभवी होतो. कुठल्या क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करु शकतो हे आपल्याला समजतं.

 

experience loading inmarathi

 

एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर काय करता येईल, हे ठरवायची वृत्ती सुद्धा बनते. काय करणं धोक्याचं आहे हे सुद्धा समजतं.

सुंदर पिचाई यांनी गूगल आणि अँड्रॉइड या दोन तंत्रज्ञानांना एकत्र केलं. हे करताना त्यांनी अपयश आलं तर काय करायचं हा मुद्दा मनात ठेऊन, त्याचा विचार त्यांनी करुन ठेवला होता.

===

हे ही वाचा – बिल गेट्सच्या यशामागे असलेल्या या ९ गोष्टी सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!

===

४. अपयशाचा सामना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करा

सिलिकॉन व्हॅलीमधील कित्येक जणांना रोज नवनवीन प्रयोग करत रहावं लागतं. त्यातील कितीतरी प्रयोग फसतात. पण म्हणून ते प्रयोग करणं थांबवत नाहीत.

पदरी पडणारं अपयश हे एखाद्या पदकाप्रमाणे मिरवा. कारण उद्या हेच प्रयोग तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणारे रस्ते ठरतात. अपयश आणि महत्त्वाकांक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही अपयशी झाल्याशिवाय तुमच्या महत्त्वाकांक्षेला धार येत नाही.

 

failure is a step to success inmarathi

 

५. नव्या अनुभवांसाठी उत्सुक रहा

सुंदर पिचाई यांचं स्पष्ट मत आहे, की भारतातील शिक्षण पद्धती अतिशय चांगली आहे. पण त्याचबरोबर त्यांना हे सुद्धा मान्य आहे, की भारतातील लोकांचा एकमार्गी शिक्षणावर जास्त भर आहे.

अमेरिकेत मात्र बहुविध प्रकारे शिक्षणाचा प्रयोग केला जातो आणि ती ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विविध प्रकारचे शिक्षण आणि आपल्याला नेमकं काय हवंय हे समजतं.

का? कसं? हे दोन‌ प्रश्न विचारायला अजिबात लाजू नका. समजेपर्यंत शिकत रहा. त्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील. तुमच्या कल्पकतेच्या सीमा वाढतील.

 

curiosity inmarathi

 

६. आपल्यासोबत इतरांनाही घ्या

यशाचं शिखर गाठण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा असतो. पण तुम्ही स्वतः सोबत इतरांनाही घेऊन हा प्रवास सुरू केला, तर तो सुसह्य होतो. पण त्याचसोबत यशाचं शिखर गाठल्यावर एकटेपण रहात नाही.

आपल्यासोबत आपले सहकारीसुद्धा यशस्वी झाले आहेत, हे बघण्याचा आनंद वेगळा असतो. एक चांगली टीम बांधणं आणि त्यांच्या कल्पनांना आकार देणं ही सुंदर पिचाई यांची खासियत आहे.

एकमेकांना अपमानित करण्यापेक्षा सोबत घेऊन कल्पकतेने सर्वांची बुध्दी वापरली तर यश सहज सोपं होतं.

माणूस एकदम यशस्वी होत नाही. प्रगतीचे वेगवेगळे टप्पे पार करत, सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेला यशाच्या वाटेवरचा प्रवास हा केवळ आनंददायीच नसतो, तर आपल्या सहकाऱ्यांसोबत केला तर यशाचं शिखर गाठण्यासाठी सोपा ठरतो हेच सुंदर पिचाई यांना पाहून कळते.

 

sundar pichai inmarathi

 

===

हे ही वाचा – भगवद्गीता पाठ असो नसो – हे १० धडे माहित नसतील तर सुख-समाधान साधणं अशक्यच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?