' भारतीय संशोधकांची कमाल….कोरोनावर लसीइतकीच प्रभावी गोळी शोधून काढली – InMarathi

भारतीय संशोधकांची कमाल….कोरोनावर लसीइतकीच प्रभावी गोळी शोधून काढली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या एकूणच सगळीकडे इम्युनिटी वाढवण्याचे बुस्टर देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. ऑक्सिजनची पातळी, काढे, वाफ घेणे हे पुन्हा एकदा लोकांच्या दैनंदिन रुटीनमध्ये आले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहेत. यात सामान्य माणूसन मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.

 

vaccination

 

देशात जेव्हा लसीकरणाला सुरवात झाली तेव्हा अत्यल्प प्रतिसाद मिळत होता मात्र हळू हळू इतरांना काही होत नाही म्हणून मी पण घेतो असे म्हणून सर्वच लोक लसीकरण केंद्रावर गर्दी करू लागले, तसेच मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर लस इतर देशांमध्ये सुद्धा निर्यात करण्यात आली.

कोरोनावरच्या लसीवर जगभरातून संशोधन झाले आहे. काही देशांनी लस देखील काढली त्यात आपल्या भारताचा नंबर देखील लागला आहे. सामान्य माणसाला कधी पण लसीपेक्षा गोळी घेणे सोयीचे वाटते. मग कोरोनासारख्या आजारावरदेखील गोळी का नाही शोधून काढत?

भारताला आयुर्वेदाचा फार मोठा इतिहास आहे. आयुर्वेदामध्ये अनेक रोगांवर औषध सांगितली आहे. अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर देखील आयुर्वेदामध्ये औषध सांगतली आहेत. ज्यापद्धतीने लसीचे संशोधन व ट्रायल घेण्यात आले त्याच पद्धतीने एका कॉलेजनेसुद्धा हीच पद्धत वापरून ही गोळी प्रभावी असल्याचे स्पष्ट केले.

रिसर्च कोणी केला?

फरिदाबाद स्थित ईसीआयसी मेडिकल कॉलेज आणि ऑल इंडिया इस्न्टिट्यूट आयुर्वेद, निसर्ग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांनी एकत्र येऊन हा रिसर्च केला आहे. ऑगस्ट २०२० साली रिसर्चला सुरवात झाली आणि काही काळातच त्याला यश सुद्धा मिळाले.

 

esic inmarathi

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

संशोधन केलेली गोळी संपूर्ण सुरक्षित आहे आणि ह्यामध्ये मृत्यू होण्याचा कोणताही धोका नाही असे त्या संस्थेने स्पष्ट केले आहे.

 

गोळी किती प्रभावी आहे?

तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा धोका ५५% कमी करण्यासाठी ही गोळी प्रभावी आहे. एखाद्या निरोगी व्यक्तीने सलग २८ दिवस दिवसातून दोनदा ही गोळी घेतल्यास त्याच्या शरीरात संसर्ग विरोधी क्षमता विकसित होते. ही गोळी लसीइतकीच परिणामकारक आहे. 

 

neem inmarathi

 

अगदी नियमित गोळ्या घेऊन सुद्धा कोरोना झाला तरी सामान्य संसर्ग रोगासारखाच परिणाम दिसून येईल असे तिकडच्या डॉक्टरांनाच म्हणणं आहे.

रिसर्च कोणावर केला?

एकूण १९० लोकांवर हा प्रयोग करण्यात आला ज्यातील लोक हे १८ ते ६० वयोगट आणि आरोग्य यंत्रणेशी संबंधित लोक होते. तसेच काहींना प्लॅसिबोसुद्धा देण्यात आला. ह्या प्रयोगामध्ये रुग्णांना सकाळ संध्याकाळ ५० mg च्या गोळ्या देण्यात आल्या.

 

plasibo inmarathi

हे ही वाचा – तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!

बाजारात कधी उपलब्ध होणार?

डॉ. ए. के .पांडे (रजिस्टार ईसीआयसी मेडिकल कॉलेज)  यांनी असे नमूद केले आहे “लवकरच गोळ्यांचा यशस्वी रिपोर्ट येऊन भारत सरकारला निवदेन पत्र लिहणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर ही गोळी बाजारात उपलब्ध होऊन अनेकांचे प्राण वाचतील.”

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?