' डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना आला आणि लोकांचं वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान किती तरी पटीने वाढलं. आवश्यक सुद्धा आहे. ‘माझं कुटुंब…’, ‘मी जबाबदार’ हे जेव्हापासून लोकांनी मान्य केलं तेव्हापासून प्रत्येक जण सतर्क झाला होऊन या ‘वैद्यकीय आणीबाणी’चा सामना करत आहे. या ज्ञानात भर घालण्यासाठी एक माहिती देत आहोत.

 

cm uddhav thackeray inmarathi

 

आज वरिष्ठ मंडळींना जर कोरोना चे काही लक्षणं दिसले तर डॉक्टर लगेच ‘CT स्कॅन’ करण्याचा सल्ला देत आहेत. सामान्य माणसाने सीटी स्कॅन, MRI हे नावं फक्त हॉस्पिटलच्या बोर्ड वर वाचलेलं असतं. कोरोना झाला असेल तर त्याच्या विषाणूचा शरीरात किती प्रमाणात पसरला आहे हे बघण्यासाठी डॉक्टरांना सीटी स्कॅनचा रिपोर्ट बघणं गरजेचं असतं.

‘सीटी स्कॅन’ मध्ये नेमकं काय होतं? एक्स रेमध्ये आणि सीटी स्कॅनमध्ये काय फरक आहे? सीटी स्कॅन करण्याआधी आणि केल्यानंतर कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? जाणून घेऊयात.

सीटी स्कॅन म्हणजेच ‘Computed Tomography’ करतांना संपूर्ण शरीराचा एक्स रे काढला जातो आणि अद्ययावत कम्प्युटर तंत्रज्ञानाच्या मदतीने शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे सेक्शन फोटो काढले जातात.

 

ct scan 1 inmarathi

हे ही वाचा – स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…

हे साध्य करण्यासाठी एक लाईट हा शरीरभर फिरत असतो. एक्स रे काढताना हा लाईट (बीम) हा एका भागावर केंद्रित असतो.

सीटी स्कॅन मध्ये एक्स रे पेक्षा कमी ऊर्जेच्या किरणोत्सर्ग पद्धतीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला, तापसारखे लक्षण असल्यावर सध्या छातीचा सीटी स्कॅन करण्यासाठी सांगितलं जात आहे.

सीटी स्कॅन केल्यानंतर १५ मिनिटांत तुमचा रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. जर तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकाचा सीटी स्कॅन रिपोर्ट हा ‘कॉन्ट्रास्ट’ असा आला तर ४-५ ग्लास पाणी प्यायला लावून परत सीटी स्कॅन करायला लावलं जातं.

सीटी स्कॅन करायला जातांना तुम्ही थोडे सैल कपडे घालणं अपेक्षित असतं. तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं सोनं, चष्मा, केसांची पिन हे सोबत असलेलं चालत नाही. तुमच्या दातांना जरी क्लिप लावलेली असेल तर ती सीटी स्कॅनच्या वेळी काढून ठेवावी लागते.

सीटी स्कॅन करायच्या ३ तास आधीपर्यंत तुम्ही पाणी पिणं किंवा काही खाणं अपेक्षित नसतं. तुम्हाला कोणताही आधीचा आजार असेल, औषधं सुरू असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरला सांगणं आवश्यक आहे.

 

heart problem inmarathi

 

हृदयाचा आजार, अस्थमा, डायबिटीज, किडनीचा आजार किंवा थायरॉईडचा आजार तुम्हाला असेल तर सीटी स्कॅनच्या रिपोर्ट मध्ये फरक पडू शकतो.

सीटी स्कॅनला काही वेळेस गमतीने ब्रेडच्या पदार्थांची उपमा दिली जाते. सीटी स्कॅनच्या मशीन मध्ये गेलेली व्यक्ती ही संबंधित डॉक्टरला ब्रेडच्या तुकड्यांसारखा दिसत असतो.

मशीन ला जोडण्यात आलेल्या कम्प्युटर मध्ये जेव्हा शरीरातील फोटो दिसत असतात तेव्हा शरीराच्या आतील भागाचा फोटो दिसत असतो. नवीन, सुधारित सीटी स्कॅनच्या पद्धतीमध्ये शरीराचे अजून छोटे (micro) स्लाईसेस दिसू शकतात.

गरोदर स्त्रियांनी गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यातसीटी स्कॅन करणं टाळायला पाहिजे. गरोदर स्त्रियांसाठी अल्ट्रासाउंडही पद्धत अमलात आणली जाते. स्त्रियांनी कोणत्याही स्कॅनला जाण्या आधी रेडिओलॉजिस्टला त्यांच्या गरोदर असण्याबद्दल सांगणं गरजेचं आहे.

 

pregnancy-inmarathi

 

सीटी स्कॅन च्या खोलीमध्ये ज्या व्यक्तीचं सीटी स्कॅन करायचं आहे फक्त त्याच व्यक्तीला सोडलं जातं. वयस्कर व्यक्तींसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीला सीटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरच्या चिठ्ठीची आवश्यकता असते.

सीटी स्कॅन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची गरज नसते. तुम्ही एकाच दिवसात जाऊन सीटी स्कॅन करून परत येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये मध्ये सीटी स्कॅन करण्यासाठी भरती होण्यासाठी सांगितलं जात असेल तर त्याचा विरोध तुम्ही केला पाहिजे.

 

ct 2 inmarathi

 

हे ही वाचा – तुमच्या लहानग्यांवर कोरोनाची सावली नाही ना? हे वाचा आणि खात्री करून घ्या!

सीटी स्कॅन झाल्यानंतर सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्याचा डॉक्टर सल्ला देत असतात. सीटी स्कॅन झाल्यानंतर तुम्ही कार ड्राईव्ह करू शकतात. तुम्हाला अजिबात अस्वस्थ वाटत नाही. तसं होत असल्यास, त्वरित तुमच्या डॉक्टरांना त्याबद्दल कळवायला पाहिजे.

सर्व डॉक्टरांना या कोरोना थांबवण्यात यश मिळो अशी आशा करूया आणि त्यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करूयात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?