' 'त्या' अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन - मदतीला धावला संजूबाबा...

‘त्या’ अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन – मदतीला धावला संजूबाबा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ऐंशीचं दशक संपता आणि नव्वदीच्या दशकात बॉलिवुडला अंडरवर्ल्ड नावाची कीड लागलेली होती. धमक्या, खंडणी, खून यांचं सत्रच चालू होतं. या क्षेत्रात काम करणारे अत्यंत तणावात असत.

अशाच एका परिस्थितीचा सामना करावा लागला मिथुन चक्रवर्तीला त्याचं कारण होतं मंदाकीनी आणि या शुक्लकाष्ठातून त्याची सुटका केली संजय दत्तनं.

काय होतं हे प्रकरण?

दाऊद इब्राहिम नावाची काळी सावली बॉलिवुडवर पसरल्याचा तो काळ होता. दाऊदच्या बरोबरीनं अंडरवर्ल्डमधले इतरही भाई लोक या क्षेत्रात धुमाकूळ घालत होते.

 

dawood inmarathi

 

सिनेमाला फायनान्स करण्यापासून ते लाखो करोडोंच्या खंडण्या वसूल करणं, धमक्या देणं आणि दिवसाढवळ्या बेदरकारपणे खून पाडणं हा या भाईलोकांचा आवडता खेळ बनला होता.

===

हे ही वाचा या ‘लेडी डॉन’ च्या इशाऱ्यावर दाऊद आणि हाजी मस्तान सुद्धा नाचायचे…

===

संपूर्ण चित्रपटसृष्टी या घटनांनी हैराण झाली होती. एका बाजूला प्रामाणिकपणे आपलं काम करणारी मंडळी होती दर दुसर्‍या बाजूला अंडरवर्ल्डच्या मदतीनं या क्षेत्रात येणारे आणि टिकून रहाणारेही होते.

संजय दत्तचं नाव अंडरवर्ल्डशी खुले आम जोडलं गेलं नव्हतं मात्र त्याचे कनेक्शन्स काय आहेत हे इंडस्ट्रीतली मंडळी जाणून होती. या काळ्या बाजूचा फ़ायदा एका प्रकरणात मिथून चक्रवर्तीला झालेला.

खरंतर कोणे एकेकाळी नक्सली दुनियेतून मनोरंजनाच्या क्षेत्रात आलेला मिथून नंतर अगदी देवमाणूस बनला. आपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.

 

mithunda inmarathi

 

मात्र या कशाचाही परिणाम होऊ न देता त्याचं अहोरात्र काम करणं चालूच होतं. योगिता बालीसोबत लग्न झालेल्या मिथुनचं अनेक नायिकांसोबत नाव जोडलं जाऊ लागलं होतं.

श्रीदेवीसोबतचं त्याचं अफेअर सर्वात जास्त गाजलं. या दोघांनी चोरून लग्न केल्याची चर्चा होती. योगिताला या प्रकरणाचा पत्ता लागल्यावर तिनं आत्महत्येचाही प्रयत्न केला.

या प्रकारानं मात्र मिथून हबकला आणि त्यानं योगिताला घटस्फोट न दिल्यानं मिथून श्रीदेवीमधला तणाव वाढत जाऊन अखेरीस श्रीदेवीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

एकूणच मिथून, हिरोईन्स आणि अडचणीत आणणारे प्रसंग यांचं नातं होतं. कारण श्रीदेवीनंतर मंदाकीनी त्याच्या आयुष्यात आली. खरंतर या दोघांची जोडी बघणं चाहत्यांना आवडत असल्यानं यांचे डझनभर सिनेमे आले. ही जोडी हिटही झाली आणि ऑन/ऑफस्क्रिन सतत नजरेस पडू लागली.

 

mandakini and mithun inmarathi

 

सोळा वर्षांची नाजूक, सुंदर यास्मिन जोसेफ राज कपूर नावाच्या शोमॅनच्या नजरेत आली आणि हिमालयाच्या धबधब्याखाली तिला उभं करून त्यानं राम तेरी गंगा मैली नावाचा चित्रपट बनवला.

===

हे ही वाचा इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

===

खरं तर हा चित्रपट त्यानं त्याच्या मुलाला राजीव कपूरला लॉन्च करण्यासाठी बनवला मात्र चर्चेत आली अंगप्रत्यंगाचं दर्शन घडविणारी ओलेती मंदाकिनी. या चित्रपटानंतर राजीव कपूर जरी मंदाकिनीच्या प्रेमात पडला तरिही वडिलांविषयी त्यानं अढी धरली ती कायमचीच.

 

mandakini 2 inmarathi

 

मंदाकिनीचा अभिनय यथातथाच असला तरी तिला चित्रपट मिळत गेले. मात्र तिचं अनोखं सौंदर्य साक्षात डॉन दाऊदच्या नजरेत आल्यानं तिचं करियर आणखीनच पुढे गेलं. एक फोन कॉल असायचा आणि मंदाकिनीला सिनेमा मिळालेला असायचा अशा चर्चाही तेव्हा होत्या.

मिथूनसोबत तिची जोडी विशेष गाजली आणि हीच गोष्ट दाऊदला त्रास द्यायला पुरेशी ठरली. मिथूनला आता रात्री अपरात्री धमक्यांचे फोन कॉल्स येऊ लागले.

सुरवातीला त्यानं याकडे दूर्लक्ष केलं मात्र नंतर नंतर यातलं गांभिर्य त्याला जाणवायला लागलं. कुटुंबाला धोका निर्माण झाल्याचं बघून तो चिंतेत पडला. या प्रकरणातून बाजूला कसं व्हावं कळेना झालं.

या सगळ्या प्रकरणातून त्याला बाहेर काढलं संजय दत्तनं. संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी संबंध होते त्याचा वापर करून घेत त्यानं मिथूनची या धमकी प्रकरणातून सुटका केली.

 

sanjay dutt inmarathi

 

मात्र मिथूनला ताबडतोब मंदाकिनीसोबतचे संबंध तोडण्याचा आणि भविष्यात तिच्यासोबत काम न करण्याचा मैत्रीपूर्ण सल्लाही दिला.

या प्रकरणातून मिथूननं तर सुटक्केचा श्र्वास घेतला मात्र मंदाकिनीसाठी दाउदची मर्जी असणं पुढील आयुष्यात सतत संकटातच आणणारं ठरत गेलं.

मंदाकीनीसाठी अनेक निर्मात्यांना फोन कॉल्स जात असत. मंदाकिनीनं दाऊदशी निकाह केल्याच्या जोरदार चर्चा होत्या, मात्र या लग्नाचा आणि त्यांना असलेल्या दोन मुलांचा अधिकृत कोणताही पुरावा जगाला कधीच मिळू शकला नाही.

या दोघांचे स्टेडियममधले एकत्र फ़ोटो हाच काय तो पुरावा. मात्र हे फिल्मी गॉसिप मुंबई पोलिसांनी फार गांभिर्यानं घेतलं होतं. तिच्यावर लक्ष ठेवून असलेलं मुंबई पोलिस मुंबई बॉम्बस्फोटानंतर तिच्यामागे हात धुवून लागलं. या सगळ्यात तिचं खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य उध्वस्त झालं.

 

mandakini dawood inmarathi

 

दुर्दैवानं आज तिची ओळख राम तेरीची ओलेती नायिका, मुंबई उध्वस्त करू पहाणार्‍या दाऊद नावाच्या व्हिलनची बायको इतकीच उरली आहे. एकेकाळी मुंबई चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री आता मुंबईतल्या उपनगरात कमालीच्या सामान्य परिस्थितीत रहात आहे.

===

हे ही वाचा संजय दत्तचा “तो” फोन कॉल या चित्रपटासाठी मारक ठरला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?