' डुप्लिकेट रेमडीसिवीरची बाजारात एंट्री... असं ओळखता येईल बनावट औषध...

डुप्लिकेट रेमडीसिवीरची बाजारात एंट्री… असं ओळखता येईल बनावट औषध…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका प्रसिद्ध जाहिरातीमुळे ‘क्या चल रहा है?’ या प्रश्नाचं ‘फॉग चल रहा है’ असं झकास उत्तर प्रत्येकाच्या मुखी येतं. सद्यस्थितीत मात्र हा प्रश्न कोणी विचारला तर ‘कोरोना, लस, ऑक्सिजन बेड आणि रेमडीसिवीर इंजेक्शन’ यांच्यापैकीच एक उत्तर ऐकायला मिळेल.

आज सामान्य माणूस हा कोरोनापेक्षा सध्याच्या स्थितीला अधिक घाबरतोय. हॉस्पिटलमध्ये जागा मिळणं, रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्याची धास्ती ही भीतीची कारणं आहेत.

 

remdesivir inmarathi

 

तो धावतोय, दिसेल त्याला फोन लावतोय, तो तेच तेच बोलतोय. कारण, त्याला त्याचा, त्याच्या जवळच्या माणसांचा जीव वाचवायचा आहे. एक परिस्थिती येते जेव्हा माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय हे तो कोणालाच सांगू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. आज कोरोनाचा घरात प्रवेश झालेलं प्रत्येक कुटुंब यातून जात आहे.

===

हे ही वाचा – कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा

===

एक गोष्ट मान्य करावी लागेल, की आपण भारतीय लोकांनी वैद्यकीय, संशोधन या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. पण, ‘मॅनेजमेंट’ हा विषय आपल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेने इतर देशांकडून शिकायला हवा.

लोकसंख्या अधिक असणं हा एक फरक आहे. पण, इतर देशांपेक्षा आपल्याकडे मदत करू शकणारे हात देखील जास्त आहेत. गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि लोकांपर्यंत आवश्यक ती माहिती पुरवण्याची.

आपल्याच देशातील मॅनेजमेंटचं उदाहरण द्यायचं तर सध्या सुरू असलेल्या IPL चं उदाहरण देता येईल. सगळं सुरळीत सुरू आहे. मॅचेस होत आहेत, खेळाडू एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत आहेत, मॅच संपल्यावर हस्तांदोलन करत आहेत. कारण, तिथे या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे.

असंच मॅनेजमेंट कोरोना घालवण्यासाठी वापरण्यात यावं, लोकांचं लसीकरण, रेमडीसिवीर इंजेक्शनची उपलब्धता वाढावी यांच्यासाठी वापरलं तर किती तरी जीव वाचतील, अशी अपेक्षा सामान्य माणूस करताना दिसतोय.

 

corona vaccination center inmarathi
theguardian.com

कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि रेमडीसिवीरच्या उत्पादनाचा वेग कमी करण्यात आला हे सध्याच्या तुटवड्याचं कारण तज्ञांकडून सांगितलं जात आहे.

बाजारात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा असला, की त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारी टोळी नेहमीच सक्रिय होत असते. रेमडीसिवीर इंजेक्शन बद्दल ही तेच झालं. ८९९ रुपये किंमत असलेलं हे इंजक्शन मागच्या काही दिवसांत ६००० ते २०,००० रुपयांपर्यंत विकलं गेलं.

आता या इंजेक्शनचं वितरण सरकार मार्फतच होत आहे. पण, मधला एक काळ होता जेव्हा येणारी गरज लक्षात घेऊन कित्येक विक्रेत्यांनी रेमडीसिवीरचा अवैध साठा करून ठेवला आणि हा तुटवडा निर्माण करण्यात आला.

आज लोकांना रेमडीसिवीर मिळवण्याचं टेन्शन आहे आणि त्यात ते ‘खरं रेमडीसिवीर’ आहे का? हे अजून एक टेन्शन ठरू शकतं. होय, भ्रष्ट नक्कल करण्यात माहीर असलेल्या काही लोकांनी रेमडीसीवरचं डुप्लिकेट बाजारात आणलं आहे.

ही बाब दिल्लीच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मोनिका भारद्वाज यांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर आणली आहे.

 

monika bhardwaj ips inmarathi

 

तुमच्या भीती अजून भर घालायची नाही. खरं रेमडीसिवीर कसं ओळखायचं हे त्यांनी खालील ९ मुद्द्यात सांगितलं आहे. ते फक्त तुम्हाला सांगायचे आहेत…

===

हे ही वाचा – ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा

===

१. Rx नसणे

तुम्हाला मिळलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनच्या पाकिटावर Rx हे चिन्ह आहे की नाही ते तपासून घ्या. खोट्या पाकिटावर ते चिन्ह नाहीये.

 

fake remdesivir inmarathi

 

२. Vial लिहिण्यामध्ये चूक

खऱ्या पाकिटावर तिसऱ्या ओळीत “100 mg/Vial” असं लिहिण्यात आलं आहे. तर खोट्या पाकिटावर “100 mg/vial” असं लिहिण्यात आलं आहे.

 

fake remdesivir inmarathi

 

३. खोट्या पाकिटावर लिहिलेला COVIFOR हा शब्द हे सरळ रेषेत लिहिलेला नाहीये. Alignment योग्य नसलेलं रेमडीसिवीर हातात आलं तर लगेच परत करा.

 

fake remdesivir inmarathi

 

४. खऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनच्या पाकिटावर “For use in” असं लिहिण्यात आलं आहे. तर, खोट्या पाकिटावर हेच शब्द “for use in” असे लिहिण्यात आले आहेत.

 

fake remdesivir inmarathi

 

५. खऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनवर कोणत्याही प्रकारची ‘वॉर्निंग’ लिहिलेली नाही. डुप्लिकेट रेमडीसिवीर इंजक्शनवर चोरट्यांनी लाल रंगात Warning असं एक लेबल लावलं आहे.

६. कोणत्या कंपनीने हे इंजेक्शन तयार केलं आहे? म्हणजेच Manufactured by हे खोट्या रेमडीसिवीर इंजेक्शनच्या पाकिटावर लिहिलेलं नाही.

७. खोट्या रेमडीसिवीरमध्ये करण्यात आलेली आणखी एक चूक म्हणजे त्यावर मागच्या बाजूला “India” न लिहिता “india” असं लिहिण्यात आलं आहे.

८. खोटं रेमडीसिवीर इंजक्शन तयार करून विकणाऱ्या टोळीने तेलंगणाचं स्पेलिंग सुद्धा चुकवलं आहे. “Telangana” हे स्पेलिंग “Telagana” असं लिहिण्यात आलं आहे.

९. खऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनच्या मागच्या बाजूला ‘COVIFOR manufactured under a license from Gilead Science Inc.’ ही ओळ लिहिण्यात आली आहे. ही ओळ खोट्या इंजेक्शनवर नाहीये.

दिल्लीच्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मोनिका भारद्वाज यांनी हे सर्व मुद्दे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून खऱ्या आणि खोट्या रेमडीसिवीर इंजेक्शनच्या फोटोसकट दिले आहेत.

 

monika bhardwaj tweet inmarathi

 

आपण सुद्धा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या आप्तेष्टांची फसवणूक होणार नाही.

===

हे ही वाचा – कोरोना लसीचा काळा बाजार – या महत्वाच्या गोष्टींचा शहानिशा करा, यात अडकू नका

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?