' सरकार चाचपडत असताना या साहेबांनी कोव्हिड लाटेशी लढण्याची केलेली तयारी अफाट आहे!

सरकार चाचपडत असताना या साहेबांनी कोव्हिड लाटेशी लढण्याची केलेली तयारी अफाट आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सामान्य माणसाच्या तीन मूलभूत गरजा असतात त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या तीन मूलभूत गरजा मान्यच आहेत त्याबरोबरीने जगायला आवश्यक असणारा ऑक्सिजन हा देखील तितकाच महत्वाचा आहे. एक वेळ माणसू अन्न पाणी निवाऱ्याशिवाय काही दिवस काढू शकतो मात्र प्राणवायू शिवाय तो जास्त काळ जगूच शकणार नाही.

सध्या देशात अन्न धान्याचा तुटवडा, वाढते पेट्रोलचे भाव यापलीकडे सध्या चर्चेत असलेला एकच विषय म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. आज दिल्लीसारख्या राजधानीमध्ये तिकडचे मुख्यमंत्री ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे कबुल करून इतर राज्यांना समोर ऑक्सिजनसाठी हात पसरत आहेत.

 

oxygen cylinder

 

ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी इतर देश देखील आपल्या मदतीला धावून आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपणच काही देशांना लसी पुरवल्या आज आपल्यालाच ऑक्सिजनसाठी इतरांकडे मदत मागावी लागत आहे.

आज भारतात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या केरळ राज्यात ऑक्सिजन मोठया प्रमाणवर उपलब्ध आहे. आज इतर राज्यांदेखील ते पुरवत आहेत.

मागच्या वर्षी साधारण सप्टेंबर ऑक्टबर नंतर अशी अनेक ठिकाणी चर्चा चालू होती की कोरोनाची दुसरी लाट येणार, ती लाट अत्यंत भयंकर असणार आहे, आणि एकदाची ती आली. ज्यावेळी ही चर्चा चालू होती तेव्हाच खरं तर आपल्या आरोग्य व्यवस्थेने या लाटेला तोंड देण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी करणे अपेक्षित होते. मात्र रोज आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेल्या घटना रोजच घडत आहेत.

 

second wave inmarathi

हे ही वाचा – होम क्वारन्टाईन असताना कोरोना व्यतिरिक्त ‘हा’ गंभीर आजार देखील उदभवू शकतो!!!

दुसऱ्या लाटेसाठी सरकार किती सुसज्ज  होते माहिती नाही एकूणच भविष्यातील धोका ओळखून आपल्या नंदुबारच्या जिल्हाधिकारी साहेबांनी आधीच या सर्व गोष्टींची सोय करून ठेवली होती.

नंदुरबार जिल्हा तसा दुर्गम भाग सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला हा जिल्हा प्रामुख्याने आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाते. मागच्या वर्षी या ठिकाणी सुद्धा कोरोनाने शिरकाव करून अनेक लोक कोरोनाबाधित झाले होते. तेव्हा तिथे ऑक्सिजनची एकही टाकी अस्तित्वात नव्हती.

 

nandu inmarathi

 

दिवसागणिक वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघून जिल्हाधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून जिल्हा रुग्णलयात ऑक्सिजन प्लांटची स्थापन केली. तसेच जानेवारी फेब्रुवारी दरम्यान झाडांची लागवड देखील केली जेणेकरून झाडांमार्फत ऑक्सिजन मिळू शकेल.

 

कोण आहे राजेंद्र भारूड :

एक डॉक्टरच भविष्यात लागणाऱ्या वैद्यकीय सेवा जणू शकतो. राजेंद्र भारूड यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवी संपादन करून सपर्धा परीक्षेतून ते अधिकारी झाले आहेत. घरची पार्श्वभूमी म्हणाल तर ते स्वतः नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून ते  जिल्हाधिकारी झाले आहेत.

 

rajendra 1 inmarathi

 

नंदुरबारच्या जिल्हयाच्या विकासासाठी ते अनेक उपक्रम सुद्धा राबवत आहेत जेणेकरून जिल्हयाची एक वेगळी ओळख राज्यात देशात निर्माण होईल.

आज महाविकासह आघाडी सरकार देखील राज्यातील इतर जिल्हाधिकाऱ्यांना नंदुबार पॅटर्न राबवा अस सांगताय. निदान सांगून तरी हा पॅटर्न कितीजण राबवतात ते बघुयात.

 

rajendra inmarathi

हे ही वाचा – कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

आपल्याकडे आज अनेक तरुण फक्त ऐषोआरामची नोकरी म्हणून जिल्हाधिकारची नोकरी कडे बघतात पण तसं न करता एक जवाबदार जिल्हयाचा प्रतिनिधी म्हणून आपण लोकांच्या हितासाठी काम केली पाहिजेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?