' भाविक काय पुजाऱ्यालाही “या” मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा अधिकार नाही, कारण… – InMarathi

भाविक काय पुजाऱ्यालाही “या” मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा अधिकार नाही, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

म्हणजेच सर्व प्रकारचे मांगल्य प्रदान करणारी मंगला, कल्याणदायिनी, शिवा, सगळे पुरुषार्थ सिद्ध करणारी, शरणागतवत्सला, त्रिनेत्रा, गौरी, नारायणी आई दुर्गे आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक आहोत.

भारतात शक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती असलेल्या आई दुर्गेची मनोभावाने भक्ती केली जाते. नवरात्रीत आईच्या विविध रूपांची, म्हणजेच कौमार्यापासून ते मातृत्व आणि कर्तृत्वापर्यंतच्या सगळ्या रूपांची पूजा केली जाते.

 

devi inmarathi

 

भारतात ५२ शक्तीपिठे आहेत. पुराणानुसार राजा दक्षाच्या यज्ञात, आपले पती भगवान शंकर यांचा अपमान झाल्यामुळे, आपण त्यांचा सल्ला न ऐकून जी चूक केली ह्या अपराधीपाणाच्या भावनेमुळे देवी सतीनी त्याच यज्ञकुंडात उडी मारून देहत्याग केला होता.

दुःखाने व्यापलेले भगवान शिव जेव्हा ते अर्ध भस्म झालेलं शरीर कैलासावर नेत होते तेव्हा आपत्तीची चाहूल लागून, भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या देहाला नष्ट केले.

 

===

हे ही वाचा ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

===

सुदर्शनाचा आघात होऊन ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले तिथे तिथे शक्तीपीठं निर्माण झाली. प्रत्येक शक्तीपिठाला त्या त्या अवयवा नुसार नाव देण्यात आले. प्रत्येक शक्तिपीठाची आपली एक विशिष्ट महती आहे, विशिष्ट स्थान आणि विशिष्ट उद्देश्य आहे.

प्रत्येक शक्तिपीठाच्या पूजाअर्चा पद्धती वेगळ्या आहेत, प्रसादाचे स्वरूप वेगळे आहे. आज आपण अशाच एका निराळ्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या शक्तिपीठात देवीची मूर्ती बघण्याचं कोणी धाडस केलं तर तो भक्त दृष्टिहीन होतो, आंधळा होतो.

आई भवानी दुष्टांचा संहार करून भक्तांचा उद्धार करणारी, जगत्जननी, प्रेमळ माता आहे, तर मग तिचीच मूर्ती बघितल्याने अंधत्व का येतं? याची गोष्ट खूप निराळी आहे.

ही गोष्ट देवभूमी उत्तराखंडात असलेल्या देवप्रयाग स्थित माता चंद्रबदनी मंदिराची आहे. स्कंदपुराणानुसार देवी सतीचे धड ह्या भागात पडले आणि त्यामुळे ह्या शक्तिपीठाचे नाव “माता चंद्रबदनी मंदिर” असे पडले.

 

chandrabadani temple inmarathi

 

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की गर्भगृहात मूर्तीच्या ऐवजी, दगडावर कोरलेलं देवीचं श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे. ह्या दगडी श्रीयंत्राची पूजा इथे केली जाते. कोणालाही, म्हणजे पूजाऱ्यालाही ह्या मंदिरात देवीच्या मूर्तीचं दर्शन घेण्यास मनाई आहे.

स्नान घालण्यापासून, आरतीपर्यंत सगळं इथेच डोळ्याला पट्टी बांधून केलं जातं.

देवीला न बघण्यामागे एक आख्यायिका आहे. असे म्हणतात एकदा एका पुजाऱ्याने एकट्यात देवीची मूर्ती बघण्याचे धाडस केले आणि त्याला आपले दोन्हीही डोळे गमवावे लागले. तो अचानक नेत्रहीन झाला.

ह्या मंदिरासंबंधी अजून एक मान्यता अशी आहे की मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी एक अदृश्य जलकुंड आहे आणि स्वतः जगदंबा माता तिथे स्नान करण्यास येते.

ह्या कुंडाचे दर्शन साध्या उघड्या डोळ्यांनी होत नसून, त्या कुंडाचे दर्शन घेण्यासाठी निर्मळ मनाने केलेल्या भक्तीची आणि साधना शक्तीची आवश्यकता असते.

हे मंदिर देवप्रयागपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या, चन्द्रकूट पर्वताच्या शिखरावर आहे. बांज‚ बुरांस‚ काफल आणि देवदार इत्यादी सारख्या घनदाट झाडांच्या वर्तुळात हे मंदिर आहे.

 

chandrabadni 2 inmarathi

===

हे ही वाचा भारतातील या मंदिरांत पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे…

===

आई भगवतीच्या ह्या मंदिराकडे नेणारे दोन मार्ग आहेत देवप्रयाग-टिहरी मोटर मार्ग आणि श्रीनगर-टिहरी मोटर मार्ग. मंदिरात पोहोचण्यासाठी उबडखाबड, खडतर वाटेवरून मोटार सायकलने जाता येतं. वाटेत विश्रांतीसाठी जामणीखाल नावाच्या छोट्या गावात आपण थांबू शकतो.

अनेक पुराणांमध्ये जसे स्कंदपुराण, देवी भागवत व महाभारतात ह्या शक्तीपीठाची वर्णनं आढळतात. प्राचीन ग्रंथानुसार ह्या शक्तिपीठाला भुवनेश्वरी सिद्धपीठ म्हणून सुद्धा संबोधित केले आहे.

लोककथेनुसार आदि जगत गुरु शंकराचार्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. पुरातत्व विभागाच्या संशोधनावरून कार्तिकेयपुर, बैराठच्या कत्यूरी आणि श्रीपुरच्या पंवार राजवंशी शासनकाळापूर्व हे मंदिर स्थापित केलेले आहे.

 

shankaracharya inmarathi

 

कोणत्याच राजाचा हस्तक्षेप ह्या मंदिरात आढळत नाही कारण मंदिराची बांधणी, कला कुसर अत्यंत वेगळी आहे.

तरी एक अनुमान लावल्यास ८ व्या शताब्दीपासून ते १२ व्या शताब्दी पर्यंतच्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झालेले असू शकते असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

कारण उत्तर भारतात ४ थ्या शताब्दीपासून ते १२ व्या शताब्दी पर्यंत मंदिरांचं युग होतं असं मानलं जातं. गढ़वालचं केदारनाथ, कालीमठ, आदिबद्री, गोपीनाथ, विश्वनाथ, पलेठी, गोमुख इत्यादी प्राचीन मंदिर एकाच शैलीच्या बांधकामाचे आहेत असे म्हटले जाते.

चंद्रबदनी मंदिर हे जागृत देवस्थानांपैकी एक आहे. इथे, मनोभावे बोललेला प्रत्येक नवस, भक्तांनी निर्मळ मनाने प्रगट केलेली इच्छा पूर्ण होते व नवस फेडायला भाविक कंदमूळ, फळं, देवीची आवडती लाल ओढणी, अगरबत्ती, धुपबत्ती, चांदीचे छत्र असे विविध प्रकारचे दान मंदिराला देतात.

नवरात्रात मोठा उत्सव असतो. त्यावेळी शैल पुत्री ब्रह्मचारिणी, चन्द्रघण्टा, कुष्माण्डा, स्कन्धमाता, कात्यायिनी, कालरात्रि, महागौर आणि सिधिदात्री ह्या देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा केली जाते व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे दर्शनास जमलेली असते.

 

chandrabadni temple 2 inmarathi

 

देवाच्या अनेक वेगवेगळ्या लीला असतात. प्रत्येक मंदिरात दर्शन घेण्याचे काही नियम असतात, भक्तांनी देवापुढे नतमस्तक होताना पाळण्याच्या काही मर्यादा असतात हे आपल्याला ह्या मंदिरात आल्यावर जाणवते.

हे मंदिर जितकं नैसर्गिक संपदेच्या सुंदरतेने नटलेलं आहे तसंच इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पण फार सुंदर आहे. पूर्वी ह्या मंदिरात नरबळी व पशुबळी देण्याची प्रथा होती. पण आता त्या सगळ्या प्रथांना बंद करून मंदिराने सात्विक मार्गाने देवीची सेवा करण्याचं ठरवलं आहे.

===

हे ही वाच नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?