' हनुमानाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या या तळ्याची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे

हनुमानाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या या तळ्याची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मनाच्या वेगापेक्षाही अधिक वेग असणारा, शक्ती आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींचा अनोखा मिलाप म्हणजे पवनपुत्र हनुमान आज याच हनुमानाचा जन्मदिवस!

वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जन्मस्थळाबद्दल.

 

hanuman anjeneri in marathi

 

रामायणात नाशिकला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवासातील अनेक वर्षांचा काळ त्यांनी नाशिकमध्ये व्यतीत केला. हे तर सर्वश्रुत आहेच. मात्र आज आम्ही तुम्हाला याच नाशिकजवळ असणाऱ्या हनुमानाच्या जन्मस्थळाची ओळख करून देणार आहोत.

 

anjeneri 5 in marathi

 

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असल्याची मान्यता आहे. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरूनच पडले असल्याचे बोलले जाते. नाशिकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल देखील अनेक वाद आहे.

अनेकांनी हनुमान यांचा जन्म कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये झाला असल्याचा दावा केला आहे. मात्र आज आपण या कोणत्याही वादात न पडता आज फक्त ‘अंजनेरी’ या जन्मस्थळाबद्दल जाणून घेणार आहोत.

 

hanuman inmarathi

हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील महत्वाच्या पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे. या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी फाट्यावर उतरावे लागते. तिथून सुरू होतो या जन्मस्थळाचा प्रवास.

अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच गुहेत जैनधर्मीय लेणी आपल्याला दिसून येतात. पुढे पठारावर पोहोचल्यावर काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दृष्टीस पडते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी देखील तिथे योग्य अशी सोय केली आहे.

 

anjeneri fort in marathi

 

थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्यावर चढत जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर काही मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येतो. ही गुहा दोन खोल्यांची असून, यात १० ते १२ जणांना राहता येऊ शकते एवढी मोठी आहे. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहे.

 

anjeneri 2 in marathi

 

समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुध्दा प्रशस्त आहे. किल्ल्याच्या घेरा फार मोठा आहे.

या पर्वताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे पर्वतावर हनुमानाच्या पायांचा ठसा असल्याची मान्यता देखील आहे. सोबतच असे सांगितले जाते, की सूर्याला गिळण्याचा प्रयत्न हनुमानाने याच पर्वतावर असताना केला होता. हा प्रयत्न करता असताना हनुमानाने एका पायाने जमिनीवर जोरात मारून उडी घेतली.

 

anjaneri sarovar in marathi

 

यामुळेच या अंजनेरी पर्वतावर जिथून हनुमानाने उडी घेतली आहे. तिथे पायाच्या आकाराचे एक तळे तयार झाले आहे. या तळ्यात नेहमी पाणी असते. या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करणे असे समजले जाते.

या किल्ल्यावर पूर्वी काहीच सोया नव्हती, मात्र कालांतराने सरकारने आणि काही संस्थांनी या पर्वतावर पर्यटकांसाठी, भक्तांसाठी आणि गिर्यारोहकांसाठी अनेक सोयी केल्या आहेत.

 

anjeneri 3 in marathi

 

या पर्वताचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वात दुर्मीळ झालेल्या ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ नावाची दुर्मीळ औषधी वनस्पती नाशिकमधील केवळ अंजनेरी गडावर आढळते. या वनस्पतीचा शोध २०१३ साली जुई पेठे नावाच्या इकोलॉजिकल रिसर्चर यांनी लावला. गवताच्या आकाराची व अत्यंत कमी उंची असलेली ही वनस्पती अंजनेरी गडावर आढळून येते.

निसर्गाने या अंजनेरी पर्वतावर मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. पावसाळ्यात या पर्वताचे सौंदर्य अधिकच खुलून येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?