' अयोध्येत राम मंदिराहून मोठ्या मानाचं “हे” हनुमान मंदिर! होते मुस्लिमांवर ही कृपा! – InMarathi

अयोध्येत राम मंदिराहून मोठ्या मानाचं “हे” हनुमान मंदिर! होते मुस्लिमांवर ही कृपा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

अयोध्येत रामचे दर्शन घेण्याआधी या मंदिराचे दर्शन घ्यावे लागते …ज्याचा जीर्णोद्धार चक्क एक मुस्लिम नवाबने केला होता….

अयोध्या आणि अयोध्यामधील राम मंदिर हा जगातील सर्व हिंदूंचाच जिव्हाळ्याचा विषय. अनेक दशकांपासून अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न अखेर २०२० मध्ये सुटला आणि कोर्टाने राम मंदिर तयार करायला परवानगी दिली.

 

ayodha name in marathi

 

तेव्हा तर दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी देशात साजरी झाली. अयोध्या म्हटले की, डोळ्यासमोर रामाचेच मंदिर येते, मात्र तिथे राम मंदिराएवढेच किंबहुना राम मंदिरापेक्षा जास्त महत्व असलेले आणि प्रथम वंदनीय असे एक मंदिर आहे. आज आम्ही त्याच बद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.

==

हे ही वाचा : रामभक्त “चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत का? मग ते राहतात कुठे?

==

 

हे मंदिर आहे पवनपुत्र हनुमान यांचे. हनुमानगढी नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर अयोध्येमधील सर्वात मोठे आणि महत्वाचे मंदिर आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया या मंदिराबद्दल अधिक आणि जास्त कोणाला माहित नसलेली माहिती.

 

hanuman in marathi

 

हनुमानगढीवर वास्तव करणाऱ्या वायुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना ७६ पायऱ्या चढून वर जावे लागते. त्यानंतर ६ इंचाची अंजनी मातेच्या कुशीतली हनुमानाची साजिरी आणि लोभसमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

राम मंदिराआधी ही हनुमानगढी आपल्याला लागते. मान्यतेनुसार जेव्हा राम रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येला आले तेव्हा त्यांनी हनुमानांना हनुमानगढी ही जागा राहायला दिली. याच जागेवर राहून त्यांनी राम मंदिरासोबतच संपूर्ण अयोध्येवर लक्ष दिले.

 

hanumangadhi 3 in marathi

 

सोबतच रामांनी सांगितले की, अयोध्यायेत माझ्या दर्शनाआधी तुझे दर्शन घेऊन आणि तुझी परवानगी घेऊनच भक्तांना माझ्या दर्शनाचा लाभ घेता येईल.

या मंदिराचा कोणताच इतिहास किंवा वर्णन रामायणात सापडत नाही, मात्र असे असूनही हनुमानगढी सदैव तिच्या असण्याची साक्ष देत भक्तांना श्रीरामांच्या दर्शनासाठी परवानगी देत आहे.

==

हे ही वाचा :  बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?

==

 

शरयू नदीच्या काठावर वसलेल्या अयोध्येमधील हनुमानगढीवरील ७६ पायऱ्या चढून गेल्यावर स्वागत करतात मंदिराचा भिंतींवर लिहिल्या गेलेल्या वायुपुत्राच्या शौर्यकथा सांगणाऱ्या हनुमान चालिसाच्या ओव्या. अंजनी मातेच्या कुशीतील सदैव फुलांमध्ये सजवलेले दक्षिणमुखी असलेले हे हनुमान मंदिर एक गुफा होती. मात्र काळानुरूप या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि हे मंदिर तयार झाले.

 

hanumangadhi 2 in marathi

 

हे मंदिर तयार होण्यामागे देखील एक रंजक कथा आहे. दहाव्या शतकाच्या मध्यात लखनऊ आणि आजूबाजूच्या परिसरात सुल्तान मंसूर अली हा प्रशासक होता. मधेच एक दिवस अचानक सुल्तान मंसूर अली याचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत होती, आणि त्याच्या वाचण्याच्या शक्यता देखील धूसर होत होत्या.

अशातच त्याला कोणीतरी हनुमानगढीवरील मंदिराबद्दल सांगितले. शेवटचा उपाय म्हणून तो देखील हनुमानाच्या मंदिरात त्याच्या मुलाला घेऊन आला. या मंदिरात त्याने त्याच्या मुलाच्या प्राणांची वायुपुत्राकडे भीक मागितली आणि, काय आश्चर्य सुल्तान मंसूर अलीचा मुलगा उठून बसत स्वतःच्या पायावर घरी गेला.

 

hanumangadhi in marathi

 

त्यानंतर सुल्तान मंसूर अली याने दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन हनुमानगढीवर मंदिर बांधण्याचा मानस व्यक्त केला. सोबतच एका ताम्रपत्रावर लिहून दिले की, या हनुमान मंदिरावर कोणत्याही राजा किंवा शासकाचा कोणताच हक्क नसेल, आणि या मंदिरावरील उत्पन्नावरून कोणताही कर वसूल केला जाणार नाही.

 

सोबतच ५२ बिघा जमीन ही हनुमानगढी आणि इमली वनसाठी उपलब्ध करून दिली. अयोध्याच्या सशस्त्र निर्वाणी अणी सेनेच्या महंत अभय रामदास यांच्या नेतृत्वामध्ये १८ व्या शतकात नागा साधूंनी हनुमानगढीला मुसलमानांच्या तावडीतून मुक्त केले.

 

hanuman nishan hanumangadhi 4 in marathi

 

आजही लंकेवरील विजयाचे प्रतीक म्हणून एक मोठा ध्वज, त्रिशूल आणि एक गदा अशा काही खुणा इथे ठेवण्यात आल्या आहेत.

===

हे ही वाचा : ८३ वर्षाच्या साधुने राम मंदिर निर्माणासाठी केलेली ही मदत थक्क करणारी आहे!

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?