' अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे! – InMarathi

अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

युद्धजन्य परिस्थिती असो किंवा कोणतीही महामारी, राजकारण किती महत्त्वाचं आहे, हे आपण गेल्या काही दिवसांपासून अनुभवत आहोत मग ते महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार असो, उत्तर प्रदेशचं योगी सरकार असो, दिल्लीचं केजरिवाल सरकार असो किंवा संपूर्ण देशाचा कारभार सांभाळणारं मोदी सरकार असो!

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही कशाप्रकारे बंगाल निवडणुका लढवल्या गेल्या, कशाप्रकारे कुंभमेळयाचं आयोजन आणि समर्थन केलं गेलं ते आपण अनुभवलं.

पंतप्रधान मोदींवरही “बंगालच्या निवडणूका लोकांच्या आरोग्यापेक्षा महत्वाच्या होत्या का?” हे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि सोशल मीडियावर यावर खूप चर्चा रंगल्या. कित्येक लोकप्रिय कलाकार, सेलिब्रिटीज, राजकारणी, पत्रकार यांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले!

पण सध्या सोशल मीडिया आणि ट्विटरवर जेष्ठ अभिनेते अनुपम खेर हे प्रचंड ट्रोल होत आहेत. मोदींच्या समर्थनार्थ एक ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे!

 

anupam kher inmarathi

 

झालं असं की एक जेष्ठ, सन्मानित आणि नावाजलेले पत्रकार शेखर गुप्ता यांनी सद्यपरिस्थितीवर कटाक्ष करणारं एक ट्विट केलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

===

हे ही वाचा लसीच्या किंमतीवर मत मांडणारा फरहान अख्तर होतोय ‘तुफान’ ट्रोल

===

सध्याच्या या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितिला त्यांनी Biggest post -partition crisis असं म्हंटलं असून एकंदरच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली!

 

shekhar gupta tweet inmarathi

 

शेखर गुप्ता यांच्या या ट्विटला अनुपम खेर यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं, शिवाय या उत्तरात त्यांनी संगितलं की कोरोनाशी लढण गरजेचं आहे आणि सरकारची आलोचना करणं हेदेखील गरजेचं आहे पण एवढयावरच लिहून थांबतील तर ते अनुपम खेर कुठले!

हे सगळं उत्तर देऊन त्यांनी शेवट अशा वाक्याने केला की “घबराइये मत आयेंगे तो मोदी ही!” बास हे एक वाक्य पुरेसं होतं आणि या अनुपम खेर यांच्या ट्विटवर आणि खासकरून त्यांच्या या शेवटच्या टोमण्यावर लोकं व्यक्त झाले.

 

anupam kher tweet main inmarathi

 

अनुपम खेर हे मोदी समर्थक आहेत आणि त्यांनी पदोपदी ते लोकांसमोर जाहीरही केलं आहे, एक कलाकार त्याचा पोलिटिकल स्टँड घेतोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे, पण कधी कधी हाच स्टँड त्यांच्यावर उलटा पडतो.

जसं अनुपम खेर यांनी हे ट्विट केलं तसं लगेच लोकांनी त्यांना या वाक्यावरून ट्रोल करायला सुरू केलं. बघूया अशाच काही खास, मजेशीर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रतिक्रिया!

या खालील ट्विटमधून एका माणसाने अनुपम यांना बाहेरची परिस्थिती काय आहे याची कल्पना द्यायचा प्रयत्न केला आहे!

 

anupam kher tweet 1 inmarathi

 

ते एक वाक्य लोकांच्या किती जिव्हारी लागलं असेल याचा तुम्ही अंदाज या खालच्या ट्विटवरून लावू शकता!

 

anupam kher tweet 2 inmarathi

 

खालील २ लोकं अनुपम खेर यांचे चाहते असूनही त्यांना अनुपम यांनी केलेलं हे विधान असंवेदनशील वाटलं जे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केलं आहे!

 

anupam kher tweet 3 inmarathi

===

हे ही वाचा अमृता फडणवीस होताहेत आता मॉडेलिंग केल्यामुळे ट्रोल…

===

anupam kher tweet 6 inmarathi

 

लोकांना काय काय सहन करावं लागतं याचा अंदाज या सेलिब्रिटीजना कधीच येणार नाही हे या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट जाणवतं!

 

anupam kher tweet 4 inmarathi

 

अनुपम खेर यांच्यासाठी हा शेरा काही नवीन नसावा कारण जेव्हापासून त्यांनी मोदी यांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्यावर ही अशी टिप्पणी होत आहे!

 

anupam kher tweet 5 inmarathi

 

कुणीतरी हॉस्पिटल आणि स्मशानभूमीबाहेरचं दाहक वास्तव दाखवून अनुपम यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे!

 

anupam kher tweet 7 inmarathi

 

या खालच्या ओळी वाचून खरंच आपल्याही मनाला हा प्रश्न चाटून जाईल की हे राजकारणी खरंच कधी सुधारतील का?

 

anupam kher tweet 8 inmarathi

 

वैयक्तिक टिप्पणी किंवा एखाद्याच्या व्यंगावरून बोलणं चुकीचं आहे पण अनुपम खेर यांच्या एका वाक्यामुळे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याची कल्पना येईल!

 

anupam kher tweet 9 inmarathi

 

anupam kher tweet 12 inmarathi

 

अनुपमजी यांना ही गोष्ट माहीत आहे का नाही ते माहीत नाही, पण सध्या आपल्या देशाची अवस्था काहीशी अशीच आहे, मन विषण्ण करणारी!

 

anupam kher tweet 10 inmarathi

 

राजकारण एका बाजूला आणि संवेदनशीलता एका बाजूला, अनुपम खेर यांनी मोदींचं समर्थन करणारं ते शेवटचं वाक्य नसतं वापरलं तर कदाचित हा वाद तिथेच संपला असता!

या भयावह महामारीच्या काळातही “मोदी पुन्हा येणार” हे वाक्य काही नेटकऱ्यांना फारसं पचलं नाही, रुचलं नाही आणि म्हणूनच लोक त्यांच्या परीने व्यक्त झाले.

हे व्यक्त होणं किंवा सेलिब्रिटीजनी असं स्टेटमेंट करणं योग्य का अयोग्य ते ठरवता येणं जरा कठीण आहे, पण हे सोशल मीडिया आहे इथे तुम्ही “आरे” केलंत की समोरून “काय रे??” असं हमखास विचारलं जातंच!

===

हे ही वाचा – केशव उपाध्येंनी दिलेल्या शुभेच्छांचा निखिल वागळेंकडून उर्मटपणे अव्हेर…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?